Nilesh Rane | राष्ट्रवादीवाल्यांना मस्ती, त्यांना जशास तसं उत्तर देऊ : निलेश राणे
भाजपचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या जहरी टीकेवर माजी खासदार निलेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली (Nilesh Rane on Gopinath Padalkar statement).
रत्नागिरी : भाजपचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या जहरी टीकेवर माजी खासदार निलेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली (Nilesh Rane on Gopinath Padalkar statement). “गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या टीकेवर मी खोलवर जाणार नाही. पण, राष्ट्रवादीवाल्यांकडून भाजपवाल्यांना धमक्या दिल्या जात आहेत. राष्ट्रवादीकडे गृहखातं आहे. त्यामुळे राष्ट्रवादीवाल्यांना ही मस्ती आहे. भाजपच्या आमदार किंवा कार्यकर्त्याला हात जरी लागला तरी आम्ही जशास तसे उत्तर देवू”, असं निलेश राणे म्हणाले.
“महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष आमचा आहे. आज तुम्ही जिथे आहात तिथे उद्या आम्ही असू शकतो, हे लक्षात ठेवावं. धमकीची भाषा आमच्यासोबत करायची नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर किती टीका झाली? आम्ही कुणालाही धमकी दिली नाही. आमच्या कार्यकर्त्यांना दिलेली धमकी सहन केली जाणार नाही”, असा घणाघात निलेश राणे यांनी केला (Nilesh Rane on Gopinath Padalkar statement).
“राज्य सरकार केंद्राकडे भीक मागत आहे. राज्य सरकारकडे उपाययोजना नाहीत. उद्योगपती रतन टाटांनी दिलेले 1500 कोटी रुपये कुठे आहेत? मुकेश अंबानींचे 500 कोटी रुपये कुठे आहेत? ते सांगा. पैसे कुठे वापरले ते सांगा. राज्य सरकारकडे पैशांचे नियोजन करण्यासाठी उपाययोजना नाहीत”, अशी टीका त्यांनी केली.
हेही वाचा : शरद पवारांवरील जहरी टीका भोवण्याची चिन्हं, पडळकरांवर कारवाईचा गृहराज्यमंत्र्यांचा इशारा
दरम्यान, गोपीनाथ पडळकर यांच्या वक्तव्याविरोधात राष्ट्रवादीत संतापाची लाट उमटली. पडळकरांविरोधात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आज (25 जून) दिवसभर महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये आंदोलने केली. पडळकरांनी माफी मागावी, अशी मागणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आली. मात्र, पडळकरांकडून अद्यापही कोणत्याही प्रकारचं स्पष्टीकरण आलेलं नाही.
याप्रकरणी गोपीनाथ पडळकरांवर कडक कारवाई करण्याचा इशारा गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिला आहे. भाजपच्या नेत्यांनी त्यांना समज द्यावी, अन्यथा कडक कारवाई करणार असल्याचे संकेत शंभुराज देसाई यांनी दिले आहेत. त्यामुळे भाजप आपल्या नवनिर्वाचित आमदारावर कारवाई करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पडळकर काय म्हणाले?
“शरद पवार हे या महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे. कारण गेल्या अनेक वर्षापासून ते महाराष्ट्राचं नेतृत्त्व करतात. राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची भूमिका त्यांची राहिलेली आहे. ही भूमिका यापुढेही ते कायम ठेवतील”, असं गोपीचंद पडळकर म्हणाले.
देवेंद्र फडणवीस सरकारने धनगर समाजाला तरतूद केलेले एक हजार कोटी या महाविकास आघाडी सरकारने दिले नाहीत. शरद पवार हे नाशिकला अवकाळी झाल्यानंतर गेले, कोकणात वादळानंतर गेले, पण अद्याप त्यांना मदत मिळाली नाही. हा सगळा फार्स सुरु आहे, असा घणाघात गोपीचंद पडळकर यांनी केला.
दरम्यान, शरद पवारांवर गोपीचंद पडळकर यांनी केलेली वैयक्तिक टीका ही भाजपची भूमिका नाही, असं विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी स्पष्ट केले आहे.
हेही वाचा : दु:ख आणि चीड, पडळकरांचं वय नाही तेवढं पवारसाहेबांचं काम : रोहित पवार