आघाडीचे नेते बांधावर जाऊन फोटो काढणार अन् शेतकऱ्यांना मदत केंद्राने करायची?; निलेश राणेंचा खोचक सवाल

महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते आज (19 ऑक्टोबर) पाऊस नुकसान पाहणी दौरा करत आहेत. मात्र, या दौऱ्यावर निलेश राणे यांनी टीका केली आहे (Nilesh Rane slam Maha Vikas Aghadi Government).

आघाडीचे नेते बांधावर जाऊन फोटो काढणार अन् शेतकऱ्यांना मदत केंद्राने करायची?; निलेश राणेंचा खोचक सवाल
निलेश राणे
Follow us
| Updated on: Oct 19, 2020 | 10:56 AM

मुंबई : महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते आज (19 ऑक्टोबर) पाऊस नुकसान पाहणी दौरा करत आहेत. मात्र, या दौऱ्यावर माजी खासदार निलेश राणे यांनी टीका केली आहे. “महाविकास आघाडीचे नेते शेतीच्या बांधावर जाऊन फोटो काढणार आणि शेतकऱ्यांना केंद्र सरकार मदत करणार?”, असा खोचक सवाल निलेश राणे यांनी केला आहे (Nilesh Rane slam Maha Vikas Aghadi Government).

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उस्मानाबाद दौऱ्यादरम्यान आज सकाळी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना भरीव मदत मिळावी यासाठी महाविकास आघाडीच्या सर्व खासदारांना घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार, असं सांगितलं. मात्र, यावर निलेश राणे यांनी टीका केली.

“महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना भरीव मदतीसाठी महाविकास आघाडीच्या सर्व खासदारांना घेवून पंतप्रधान मोदी यांची भेट घेणार असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे. आता असं झालंय, महाविकास आघाडीचे नेते बांधावर जाऊन फोटो काढणार आणि शेतकऱ्यांना केंद्र सरकार मदत करणार”, असा चिमटा निलेश राणे यांनी ट्विटरवर काढला (Nilesh Rane slam Maha Vikas Aghadi Government)..

दरम्यान, राज्यातील दिग्गज नेते पाऊस नुकसान पाहणी दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार मराठवाडा दौऱ्यावर आहेत. त्यांचा मराठवाडा दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. शेतीच्या बांधावर जाऊन शरद पवार शेतकऱ्यांना धीर देत आहेत.

कृषीमंत्री दादा भुसे सोलापूर जिल्ह्यात पाहणी करत आहेत. त्याचबरोबर मदत आणि पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवारदेखील सोलापूर जिल्ह्यात पाहणी करत आहेत.

दुसरीकडे विरोधी पक्षनेतेदेखील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत आहेत. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आज बारामती आणि मराठवाडा दौऱ्यावर आहेत.

संबंधित व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

गप्प बसवत नाही म्हणून मी सर्वात आधी येतो! संकटकाळातील दौऱ्यांबाबत विचारलेल्या प्रश्नावर पवारांचं मिश्किल उत्तर

खडसेंची भाजपने दखल घेतली नाही; राजकीय निर्णय काय घ्यावा तो त्यांचा प्रश्न: पवार

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.