…तर ठाकरे आणि सोनू निगमची स्टोरी अख्य्या महाराष्ट्राला सांगणार, निलेश राणे यांचा इशारा

माजी खासदार निलेश राणे यांनी ट्विटरवर वरुण सरदेसाई आणि ठाकरे कुटुंबावर सडकून टीका केली आहे (Nilesh Rane slams Varun Sardesai).

...तर ठाकरे आणि सोनू निगमची स्टोरी अख्य्या महाराष्ट्राला सांगणार, निलेश राणे यांचा इशारा
Follow us
| Updated on: Mar 16, 2021 | 3:16 PM

मुंबई : भाजप आमदार नितेश राणे यांनी युवा सेनेचे नेते वरुण सरदेसाई यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर सरदेसाई यांनी राणे यांच्याविरोधात अब्रुनुकसाणीचा दावा केलाय. याच मुद्द्यावरुन नितेश राणे यांचे भाऊ आणि माजी खासदार निलेश राणे यांनी ट्विटरवर सरदेसाई आणि ठाकरे कुटुंबावर सडकून टीका केली आहे (Nilesh Rane slams Varun Sardesai).

निलेश राणे नेमकं काय म्हणाले?

“ठाकरेंचा नातेवाईक वरून खालून सरदेसाई सारखा बेवडा, जूगारडा, मटका छाप म्हणतो अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार. पण मुळात त्यासाठी अब्रू असावी लागते. ठाकरे म्हणे सुसंस्कृत, ह्यापेक्षा मोठा विनोद नाही. ठाकरेंचा सुसंस्कृतपणा ऐकायचा असेल तर जयदेव ठाकरेंना किव्हा सोनू निगमला विचारा”, असा टोला निलेश राणे यांनी ट्विटरवर लगावला.

निलेश राणे यांनी यापुढे जाऊन शिवसेनेवर शेलक्या शब्दात टीका केलीय. “ठाकरे आणि त्यांच्या कुत्र्यांनी जास्त नाटक केलं तर ठाकरे आणि सोनू निगमची स्टोरी अख्या महाराष्ट्राला सांगून टाकणार”, असा इशारा निलेश राणे (Nilesh Rane slams Varun Sardesai) यांनी दिला.

नितेश राणेही म्हणाले, ‘धमकी कुणाला देताय?’

वरुण सरदेसाई यांनी अब्रुनुकसाणीचा दावा केल्यानंतर नितेश राणे यांनी देखील निशाणा साधला. “अब्रुनुकसाणीचा दावा ठोकल्यानंतर धमकी नेमकी कुणाला देताय? आमची पार्श्वभूमी आणि शिक्षण हे सांगण्यासाठी आम्ही समाजकारण आणि राजकारणात नाही आहोत. अशा पद्धतीच्या नोटीसींना भीक घालत नाही”, असा घणाघात नितेश राणे यांनी केले.

नितेश राणे यांचे वरुण सरदेसाईंवर आरोप काय?

सचिन वाझे प्रकरणी कालच भाजपचे आमदार नितेश राणे यांनी वरुण सरदेसाई यांच्यावर आरोप केले होते. आयपीएल बेटिंगप्रकरणात वाझेंनी सट्टेबाजांना खंडणी मागितली होती. तर सरदेसाई यांनी वाझेंकडे पैशाची मागणी केली होती, असा आरोप राणे यांनी केला होता. त्यावर सरदेसाई यांनी पत्रकार परिषद घेऊन सात दिवसात पुरावे जाहीर करा अथवा माफी मागा, नाही तर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार, असा इशारा सरदेसाई यांनी दिला होता.

वरुण सरदेसाईंनी पत्रकार परिषदेत म्हणाले होते?

राणेंवर मर्डर, अपहरणाचे गंभीर गुन्हे दाखल आहे, खुद्द फडणवीसांनीच हे मांडलय, आज ते भाजपमध्ये गेलेत तर महाविकास आघाडीतील विविध नेत्यांवर आरोप करत आहेत. गेले काही दिवस ते माझ्यावर वैयक्तिकरीत्या आरोप करत आहेत. राणे कुटुंबीयांना जनता अजितबात गांभीर्यानं घेत नाही. त्यांना भीक घालत नाही, असे वरुण सरदेसाई यांनी म्हटले होते.

त्यांनी जे आरोप केलेत, ते सिद्ध करावेत नाही तर कायदेशीर प्रक्रियेला तयार राहावे, त्यांनी पत्रकार परिषद घेऊन माझ्यावर अतिशय घाणेरडे आरोप केलेत. ते सगळे आरोप तथ्यहीन असून, त्या आरोपांमुळे मी आमदार नितेश राणे यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकत आहे, असेही वरुण सरदेसाई यांनी सांगितले होते.

संबंधित व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

संदीप देशपांडेंविरोधात वरुण सरदेसाईंचा अब्रुनुकसानीचा दावा; देशपांडेंना आरोप भोवणार?

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.