Maharashtra Cabinet Expansion : शिंदेच्या मंत्रिमंडळात केसरकर, पाटील, सत्तार, राठोड, चंद्रकांतदादा, मुनगंटीवार, महाजन, लोढा; 18 मंत्र्यांनी घेतली पद आणि गोपनीयतेची शपथ
Maharashtra Cabinet Expansion : भाजपने महापालिका निवडणुका समोर ठेवून आमदारांची मंत्रिपदी वर्णी लावली आहे. भाजपने मुंबईतून मंगलप्रभात लोढा, कल्याण डोंबिवलीतून रवींद्र चव्हाण, पुणे आणि कोल्हापूर समोर ठेवून चंद्रकांत पाटील आणि औरंगाबाद महापालिका समोर ठेवून अतुल सावे यांना मंत्रिपद दिलं आहे.
मुंबई: राज्यात सत्ता स्थापन केल्यानंतर तब्बल 38 दिवसानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार(Maharashtra Cabinet Expansion) झाला. राजभवनात आज 18 मंत्र्यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (bhagat singh koshyari) यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. शिंदे गटाकडून दीपक केसरकर, गुलाबराव पाटील, उदय सामंत, अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे, दादा भुसे, शंभुराज देसाई, तानाजी सावंत आणि संजय राठोड यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. तर भाजपकडून चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, मंगलप्रभात लोढा, राधाकृष्ण विखेपाटील, सुरेश खाडे, विजयकुमार गावित, अतुल सावे आणि रवींद्र चव्हाण यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह असंख्य मान्यवर उपस्थित होते. आज संध्याकाळपर्यंत या सर्व मंत्र्यांचे खातेवाटप केलं जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. मात्र, दोघांनीही मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतरही राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही. तब्बल 38 दिवस उलटूनही मंत्रिमंडळाचा विस्तार न झाल्याने विरोधकांकडून सरकारवर जोरदार टीका करण्यात येत होती. त्यानंतर अखेर आज शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला. आज शिंदे गटाकडून 9 आणि भाजपकडून 9 जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. राजभवनातील दरबार हॉलमध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सर्व मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यात शिंदे गटाकडून दीपक केसरकर, गुलाबराव पाटील, उदय सामंत, अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे, दादा भुसे, शंभुराज देसाई, तानाजी सावंत आणि संजय राठोड यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. तर भाजपकडून चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, मंगलप्रभात लोढा, राधाकृष्ण विखेपाटील, सुरेश खाडे, विजयकुमार गावित, अतुल सावे आणि रवींद्र चव्हाण यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली.
अपक्षांना संधी नाही
आजच्या मंत्रिमंडळ विस्तारात अपक्षांना स्थान देण्यात आलेलं नाही. शिंदे गटाने एकाही अपक्ष आमदाराला मंत्रिपद दिलं नाही. पुढील विस्तारात या अपक्षांना मंत्रीपदाची शपथ दिली जाणार आहे. त्यामुळे बच्चू कडू यांचा चांगलाच हिरमोड झाला आहे.
ती एक गोष्ट Fadnavis येणाऱ्या प्रत्येक मंत्र्याला सांगत राहीले, शिंदेंना मान!#MaharashtraCabinet #CabinetExpansion2022 #ShindeFadnavis #EknathShinde #DevendraFadnavis pic.twitter.com/ASKU8cswB4
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 9, 2022
भाजपचं मिशन महापालिका
दरम्यान, भाजपने महापालिका निवडणुका समोर ठेवून आमदारांची मंत्रिपदी वर्णी लावली आहे. भाजपने मुंबईतून मंगलप्रभात लोढा, कल्याण डोंबिवलीतून रवींद्र चव्हाण, पुणे आणि कोल्हापूर समोर ठेवून चंद्रकांत पाटील आणि औरंगाबाद महापालिका समोर ठेवून अतुल सावे यांना मंत्रिपद दिलं आहे. त्यामुळे भाजप या महापालिकेवर आपली सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं स्पष्ट झालं आहे.
शिंदे गटाचे मंत्री
दीपक केसरकर गुलाबराव पाटील उदय सामंत अब्दुल सत्तार संदीपान भुमरे दादा भुसे शंभुराज देसाई तानाजी सावंत संजय राठोड
भाजप गटाचे मंत्री
चंद्रकांत पाटील सुधीर मुनगंटीवार गिरीश महाजन मंगलप्रभात लोढा राधाकृष्ण विखे पाटील सुरेश खाडे विजय कुमार गावित अतुल सावे रवींद्र चव्हाण