Nitesh Rane arrest : भाजप आमदार नितेश राणेंना अखेर 2 दिवसांची पोलीस कोठडी! दिवसभरात नेमकं काय घडलं?

सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने नितेश राणे यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. कोर्टानं पोलीस कोठडी सुनावल्यानंतर कणकवली पोलिस नितेश राणे यांना पोलीस स्टेशनला घेऊन गेले आहेत. मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या मोठ्या राजकीय नाट्यानंतर अखेर नितेश राणे यांना मोठा झटका बसल्याचं पाहायला मिळत आहे.

Nitesh Rane arrest : भाजप आमदार नितेश राणेंना अखेर 2 दिवसांची पोलीस कोठडी! दिवसभरात नेमकं काय घडलं?
पोलिस कोठडी सुनावल्यानंतर नितेश राणे यांना अटक करताना पोलिस
Follow us
| Updated on: Feb 02, 2022 | 6:24 PM

सिंधुदुर्ग : भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांना मोठा झटका बसला आहे. कारण नगर पंचायत निवडणुकीदरम्यान शिवसेनेचे स्थानिक नेते संतोष परब हल्ला प्रकरणात नितेश राणे यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी (Police Custody) सुनावण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने (Sindhudurga District Court) नितेश राणे यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. कोर्टानं पोलीस कोठडी सुनावल्यानंतर कणकवली पोलिस नितेश राणे यांना पोलीस स्टेशनला घेऊन गेले आहेत. मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या मोठ्या राजकीय नाट्यानंतर अखेर नितेश राणे यांना मोठा झटका बसल्याचं पाहायला मिळत आहे.

दरम्यान, आज दिवसभरात मोठ्या घडामोडी पाहायला मिळाल्या. जिल्हा सत्र न्यायालयाने काल जामीन अर्ज फेटाळून लावल्यानंतर नितेश राणे यांनी उच्च न्यायालयात धाव घेत जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र, आज दुपारी नितेश राणे यांनी हायकोर्टातील जामीन याचिका मागे घेतली. तशी माहिती त्यांचे वकील सतीश मानेशिंदे यांनी दिली होती. त्यानंतर नितेश राणे हे दिवाणी न्यायालयात शरण गेले. त्यावेळी ‘काल सेशन कोर्टाने जो निर्णया दिलेला आहे, त्या निर्णयाचा आदर ठेवून मी आता सरेंडर होण्यासाठी जातोय. आतापर्यंत राज्य सरकारनं वेगवेगळ्या बेकायदेशीर पद्धतीने मला अटक करण्याचा प्रयत्न केला पण मी आज स्वत:हून कोर्टाच्या निर्णयाचा आदर ठेवून मी स्वत: सरेंडर होण्यासाठी जात आहे’, असं नितेश राणे म्हणाले होते.

नितेश राणेंचं सूचक ट्वीट

नितेश राणे शरण आल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात जामीनासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. नितेश राणे यांना पोलीस कोठडी दिली जावी अशी मागणी यावेळी सरकारी पक्षाच्या वकीलांकडून करण्यात आली. दरम्यान, दुपारी नितेश राणे यांनी एक सूचक ट्वीट देखील केलं. यामध्ये त्यांनी समय बडा बलवान है.. असं म्हटलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी अमित शाह आणि पी चिदंबरम यांच्या अटक झाली त्यावेळचे फोटो पोस्ट केले होते.

कोर्टाकडून 2 दिवसांची पोलीस कोठडी

एकीकडे नितेश राणे यांच्या वकिलांकडून जामिनासाठी आवश्यक असलेली प्रक्रिया पूर्ण करत होते. तेव्हा सरकारी वकिलांकडून नितेश राणे यांची पाच दिवसांची पोलीस कोठडी मागितली. त्यामुळे नितेश राणेंना जामीन मिळणार की नाही? असा प्रश्न काही काळ निर्माण झाला होता. दोन्ही बाजूचा युक्तीवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने नितेश राणे यांना दोन दिवसांची अर्थात 4 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यानंतर कणकवली पोलीस नितेश राणेंना घेऊन पोलीस ठाण्यात गेले.

इतर बातम्या :

Nitesh Rane Arrest : नितेश राणेंना मोठा झटका, 4 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी! सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाचा निकाल

परमबीर सिंहांनी ईडीला दिलेल्या जबाबात सनसनाटी खुलासे! अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये परब आणि देशमुखांचा हात?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.