VIDEO | नितीन गडकरींचा कोकण विकास मंत्र, नारायण राणे पूर्ण करणार?

"आम्ही अशी एक योजना तयार केली होती, तामिळनाडूच्या मच्छिमारांसाठी, ते श्रीलंकेत जायचे, तर आम्ही एक बोट तयार केली, कोचीन शिपयार्डमध्ये ती 100 नॉटिकल मैल जाते, तिच्यात बर्फही तयार होतो. कोल्ड स्टोरेज आहे." अशी माहिती नितीन गडकरी देत होते.

VIDEO | नितीन गडकरींचा कोकण विकास मंत्र, नारायण राणे पूर्ण करणार?
नारायण राणे, नितीन गडकरी
Follow us
| Updated on: Jul 30, 2021 | 10:48 AM

नवी दिल्ली : दिल्लीत यायचं नव्हतं, मात्र आपण जबरदस्तीने आलो, अशा शब्दात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी आपल्या राजकीय जीवनासंदर्भात सांगितलं. राजधानी दिल्लीत महाराष्ट्र्र सदन येथे महाराष्ट्रातील नवनिर्वाचित मंत्र्यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. नारायण राणे (Narayan Rane) आणि कपिल पाटील (Kapil Patil) यांच्यामुळे कोकणाच्या विकासामध्ये महाराष्ट्राला खूप चालना मिळेल, असा विश्वास गडकरींनी यावेळी व्यक्त केला.

काय म्हणाले नितीन गडकरी?

“राणे साहेब कोकणातून आले आहेत. मला आज पहिल्यांदा कळलं, कपिल पाटील म्हणाले, की आजपर्यंत ठाण्यातून कोणी मंत्रीच झालं नाही. आश्चर्यच होतं. पण कपिल पाटलांना ठाण्याचा विकास करण्याची संधी मिळाली आहे. ठाण्याचा पार्ट हा कोकणाचाच भाग आहे. त्यामुळे राणे साहेब आणि तुम्ही (कपिल पाटील) मिळून, मला विश्वास आहे… त्या भागात पोर्ट्स (बंदरं) मोठमोठी आहेत. ब्ल्यू इकॉनॉमी आहे. राणेंना मी विनंती केली, की मच्छिमारांच्या बोट फक्त 10 नॉटिकल मैल जातात. मी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयातून अशी एक योजना तयार केली होती, तामिळनाडूच्या मच्छिमारांसाठी, ते श्रीलंकेत जायचे, तर आम्ही एक बोट तयार केली, कोचीन शिपयार्डमध्ये ती 100 नॉटिकल मैल जाते, तिच्यात बर्फही तयार होतो. कोल्ड स्टोरेज आहे.” अशी माहिती नितीन गडकरी देत होते.

गडकरींच्या मनात योजना काय?

“हे जे ट्रॉलर आहे, ते एक कोटी 20 लाखाचं आहे. त्यावर सबसिडी (अनुदान) आहे, एमएसएमईतूनही देऊ शकतो, जर आपण समुद्रात 100 नॉटिकल मैल जाऊ शकलो, तर आपलं मत्स्य उत्पादन सहा ते सात पटीने वाढू शकतं. त्याचं पॅकेजिंग आणि प्रोसेसिंग केलं, तर महाराष्ट्राची निर्यात आणखी खूप वाढेल. जेएनपीटी हे देशातील सर्वात मोठं कंटेनर पोर्ट महाराष्ट्रात आहे. बीपीटीची विकासाची कामं आता भरपूर आहेत, आता आपण रोरो रोपॅक सुरु केलं आहे. राणे साहेबांना विशेष रुपाने कपिल पाटील आणि राणेंमुळे कोकणाच्या विकासामध्ये महाराष्ट्राला खूप चालना मिळेल असा मला विश्वास आहे” असंही गडकरी म्हणाले.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

जेव्हा गडकरींनी दिल्लीत ‘भारत सरकार’चा बोर्ड उखडला आणि ‘महाराष्ट्रा’चा लावला, मराठी माणसाच्या अभिमानाच्या जागेचा किस्सा

(Nitin Gadkari talks on Konkan Development encourages Narayan Rane Kapil Patil)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.