चितेला अग्नी देण्याचा अधिकार वारसालाच, महावितरणाच्या आजच्या स्थितीचे खरे ‘वारस’ चंद्रशेखर बावनकुळे : ऊर्जामंत्री
"बावनकुळे यांच्या कार्यकाळातच ऊर्जा खात्यातील महावितरण मरणपंथाला लागली. त्यामुळे वीजबिलाच्या प्रतिकात्मक चितेला त्यांनी अग्नी देणे संयुक्तिक होते", असा घणाघात ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केला आहे (Nitin Raut slams Chandrashekhar Bawankule).
मुंबई : “माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज प्रतिकात्मक चितेवर वीजबिलांना अग्नी दिल्याचे दृश्य मी टीव्हीवर बघितले. चितेला अग्नी देण्याचा अधिकार वारसालाच असतो. महावितरणाच्या आजच्या स्थितीचे खरे ‘वारस’ चंद्रशेखर बावनकुळे हेच आहेत. ऊर्जा खात्यातील महावितरण त्यांच्याच कार्यकाळात मरणपंथाला लागली. त्यामुळे वीजबिलाच्या प्रतिकात्मक चितेला त्यांनी अग्नी देणे संयुक्तिक होते”, असा घणाघात ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केला आहे (Nitin Raut slams Chandrashekhar Bawankule).
नितीन राऊत यांनी ट्विटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत त्यांनी बावनकुळे यांच्यावर निशाणा साधला. “बावनकुळे यांनी महावितरणला रुग्णशय्येवर नेले असले तरी आम्ही त्याला वाऱ्यावर सोडणार नाही. महावितरणच्या आजारावर उपचार आम्हीच करु. त्याला नवसंजीवनी देऊ. महावितरण पुन्हा धडधाकट करणे हेच आमचे पहिले प्राधान्य राहणार आहे”, असं नितीन राऊत म्हणाले (Nitin Raut slams Chandrashekhar Bawankule).
माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज प्रतिकात्मक चितेवर वीजबिलांना अग्नी दिल्याचे दृश्य मी टीव्हीवर बघितले. चितेला अग्नी देण्याचा अधिकार वारसालाच असतो आणि महावितरणच्या आजच्या स्थितीचे खरे ‘वारस’ बावनकुळे हेच आहेत. @cbawankule pic.twitter.com/PEAlkdaBLt
— Dr. Nitin Raut (@NitinRaut_INC) November 23, 2020
दरम्यान, वाढीव वीज बिलाविरोधात भाजपने सोमवारी (23 नोव्हेंबर) राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन केले. नागपुरातही माजी मंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे रस्त्यावर उतरले होते. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. “महाराष्ट्र सरकारने राज्यातील आर्थिक, दुर्बल आणि मध्यमवर्गीय लोकांचं वीजबिल माफ करू, अशी घोषणा केली होती. परंतु हे सरकार आता पलटलं आहे. या सरकारनं दीड कोटी ग्राहकांवर अन्याय करण्याचा घाट घातला आहे”, असा आरोप चंद्रशेखर वाबनकुळेंनी केला.
कोट्यवधी जनता वाढीव वीजबिलामुळे भरडलेली आहे. या सरकारनं वीजबिल माफ केलं नाही, म्हणून आम्ही वीजबिलांची होळी केली. महाराष्ट्रात 2 हजार ठिकाणी वीजबिलांची होळी होणार आहे. तरीही सरकार ऐकलं नाही आणि कोणी वीज कापायला आले तर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते झेंडे घेऊन त्यांना विरोध करतील, असा इशाराही चंद्रशेखर बावनकुळेंनी दिला.
संबंधित बातम्या
वाढीव वीजबिलाविरोधात मनसेची पोस्टरबाजी; पोलीस, बेस्ट प्रशासनाने होर्डिंग्ज हटवले
वीजबिल माफीसाठी गरज पडल्यास खळ्ळखट्यॅक आंदोलन करणार, मनसे आक्रमक