NMC Election 2022 : नागपुरात भाजपचा दबदबा कायम राहणार? वॉर्ड क्रमांक 25 यंदा कुणाचा?

हा बालेकिल्ला तसाच आबादीत ठेवण्याचं आव्हान फडणवीस आणि गडकरी यांच्यासमोर असणार आहे. तर भाजपच्या या अभेद किल्ल्याला सुरुंग लावण्यासाठी काँग्रेसही तेवढ्याच जोमाने मैदानात उतरणार आहे.

NMC Election 2022 : नागपुरात भाजपचा दबदबा कायम राहणार? वॉर्ड क्रमांक 25 यंदा कुणाचा?
नागपुरात भाजपचा दबदबा कायम राहणार?Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Aug 06, 2022 | 3:22 PM

नागपूर : राज्यात महानगरपालिकेच्या निवडणुकींनी (Municipal Corporation Election 2022) सध्या धुडघूस घातला आहे. सगळीकडे वातावरण हे निवडणुकांमय होऊन गेलं आहे. महत्त्वाच्या महानगरपालिका निवडणुकांपैकी एक मोठी महानगरपालिका म्हणजे यांना नागपूर महानगरपालिका, (NMC Election 2022) राज्याची उपराजधानी नागपूर काबीज करण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष नेहमीच जोमाने मैदानात उतरतात. भाजपचा या महानगरपालिकेत सध्या मोठा दबदबा आहे. तसेच नागपूर देवेंद्र फडणवीस यांचं आणि नितीन गडकरींचं राजकीय हब मानलं जातं. त्यामुळे हा बालेकिल्ला तसाच आबादीत ठेवण्याचं आव्हान फडणवीस आणि गडकरी यांच्यासमोर असणार आहे. तर भाजपच्या या अभेद किल्ल्याला सुरुंग लावण्यासाठी काँग्रेसही तेवढ्याच जोमाने मैदानात उतरणार आहे.

भाजपा    
शिवसेना
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
काँग्रेस
अपक्ष

मागचे निकाल कसे होते?

नागपूर महानगरपालिका निवडणुकीत 2017 मध्ये भारतीय जनता पक्ष विजयी झाला कारण नागपूरमधील 151 जागांपैकी पक्षाने 108 जागा जिंकल्या. काँग्रेस, शिवसेना, बसपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अनुक्रमे 29, 2, 10 आणि 1जागा जिंकली. उर्वरित एक जागा काँग्रेसने तिकीट नाकारल्यानंतर अपक्ष लढलेल्या आभा पांडे यांनी जिंकली.

भाजपा     
शिवसेना
राष्ट्रवादी काँग्रेस
काँग्रेस
अपक्ष

मागच्या वेळचे विजयी उमेदवार

नागपूर महानगरपालिकेतल्या वार्ड क्रमांक 25 ची समीकरणे पाहिली तर या वार्ड वरती पूर्णपणे भाजपचा दबदबा असल्याचे दिसून येते. या वार्डमधून भाजपच्या पहिल्या उमेदवार विजयी झाल्या त्या म्हणजे जयश्री रारोडकर, तसेच भाजपच्या दुसऱ्या विजय उमेदवारांनी या ठिकाणी बाजी मारली त्या म्हणजे वैशाली रोहनकर तर डी वाडीभस्मे हे भाजपचे तिसरे उमेदवार म्हणून या ठिकाणी विजयी झाले. तर काँग्रेसला या वार्ड मध्ये केवळ एक जागा जिंकता आली. पुरुषोत्तम हजारे यांच्या रूपाने काँग्रेस फक्त या वार्डमध्ये खातं तर खोलू शकले, मात्र तो आकडा मोठा करू शकली नाही. यावेळी तो आकडा मोठा करण्याचा प्रयत्न काँग्रेस करताना दिसून येईल.

भाजपा     
शिवसेना
राष्ट्रवादी काँग्रेस
काँग्रेस
अपक्ष

अशी आहे या वॉर्डची व्यप्ती

गेल्या निवडणुकीची माहिती पाहिल्यास या वॉर्डच्या सीमांचा आणि व्यापत्तीचाही अंदाज बांधता येतो. ईतिारी सराफा बाजार, घासबाजार, गंगा जमुना, चिंतेश्वर मंदीर, जुना मोटार स्तटॅन्ड, कुंभारपूरा, जुनी मंगळीरी,लाडपुरा, रामपेठ, आयचीत मंदीर परीसर, निाबपुरा, वाशिजीनगर, भुतेश्वर नगर, गंगाबाई घाट, नयापुरा, वढिरपुरा, अशी या वॉर्डची व्याप्ती आहे. मात्र यावेळी वॉर्डची पुनररचाना होऊन, वॉर्डची संख्या वाढल्याने ही समीकरणं काहीशी बोलू शकतात. त्यामुळे राजकीय समीकरणेही काहीशी बदलू शकतात. ती कशी बदलतात? हे निवडणुकीचे निकालच सांगतील.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.