मंत्रालयात झारीतले शुक्रराचार्य खूप, OBC आरक्षणावर गदा येत असेल तर लढावंच लागेल : छगन भुजबळ

ओबीसी आरक्षणावर गदा येत असेल तर त्यासाठी लढावंच लागेल, असं राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं. (Not opposed to Maratha reservation: Chhagan Bhujbal )

मंत्रालयात झारीतले शुक्रराचार्य खूप, OBC आरक्षणावर गदा येत असेल तर लढावंच लागेल : छगन भुजबळ
Follow us
| Updated on: Nov 28, 2020 | 2:05 PM

पुणे: मंत्रालयात झारीतले शुक्राचार्य खूप आहेत. त्यामुळे अनेक अडचणी येतात, असं सांगतानाच ओबीसी आरक्षणावर गदा येत असेल तर त्यासाठी लढावंच लागेल, असं राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं. (Not opposed to Maratha reservation: Chhagan Bhujbal )

राष्ट्रपिता महात्मा फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त छगन भुजबळ भिडेवाड्यात आले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ओबीसी आणि मराठा आरक्षणाबाबतची मतं पुन्हा एकदा मांडली. मंत्रालयात झारीतले शुक्राचार्य खूप आहेत. त्यामुळे अनेक अडचणी येत आहेत. राज्यात 54 टक्के ओबीसी समाज आहे. त्यांचं आरक्षण जैसे थे राहिलं पाहिजे. आमचा मराठा आरक्षणाला विरोध नाही. कधी नव्हता. मराठा समाजाला त्यांचं आरक्षण मिळालंच पाहिजे. पण ओबीसींच्या आरक्षाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे, असं भुजबळ म्हणाले. मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरक्षणाच्या दुसऱ्या कायद्याला भुजबळांनी पाठिंबा दिला. तसेच आरक्षणाचा प्रश्न सुप्रीम कोर्टात जाणं हे काही नवीन नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

मराठा समाजाला ओबीसींमधून 5 टक्के आरक्षण देण्याची काही लोक मागणी करत आहे. काही लोक आम्ही ओबीसीच नाहीत असं म्हणत आहेत. तर काही लोक म्हणतात मराठा समाजाला ओबीसींमध्ये समाविष्ट करा. वेगवेगळ्या मागण्या पुढे येत आहेत. अशा परिस्थितीत संघर्ष निर्माण होऊ शकतो. तसं वातावरण आहे, असंही ते म्हणाले. आपल्या आरक्षणावर, हक्कांवर गदा येत असेल तर त्यासाठी लढायलाच हवे. महात्मा फुलेंनी आपल्याला लढायला शिकवले. त्यासाठी आपल्याला भिडेवाड्यातून प्रेरणा घ्यायची आहे, असंही ते म्हणाले.

त्यांना भिडेवाड्यात जावं असं का वाटलं नाही?

दगडूशेठ हलवाई गणपतीला 10 हजार महिला एकत्र येतात. एका सुरात अथर्व शीर्ष म्हणतात. पण इथून पुढे भिडेवाडा आहे. याच शाळेत महात्मा फुलेंनी पहिली शाळा सुरू केली. ते आपलं प्रेरणास्थळ आहे. तिथे जाऊन दर्शन घ्यावं, असं या 10 हजार महिलांपैकी एकीलाही वाटू नये, यांची खंत वाटते, असंही ते म्हणाले.

संबंधित बातम्या:

केंद्रीय संस्थांचा धाक दाखवला जातोय, मंत्री छगन भुजबळांचा विरोधकांवर हल्लाबोल

 ईडी केंद्र सरकारचं बाहुलं, छगन भुजबळ यांचं टीकास्त्र

राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता : छगन भुजबळ

(Not opposed to Maratha reservation: Chhagan Bhujbal )

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.