सिंधुदुर्ग पोलिसांनी नारायण राणेंना नोटीस बजावली, कोणत्या वर्तणुकीवर घेतला आक्षेप? वाचा नोटिसीचा मजकूर सविस्तर!

सिंधुदर्ग पोलीस नितेश राणे यांच्या शोधात असताना ते कुठे आहेत, असा प्रश्न नारायण राणे विचारला असता, हे सांगायला आम्ही मूर्ख आहोत का? असा सवाल नारायण राणे यांनी केला. याबाबत पोलिसांनी नारायण राणे यांना नोटीस बजावली आहे.

सिंधुदुर्ग पोलिसांनी नारायण राणेंना नोटीस बजावली, कोणत्या वर्तणुकीवर घेतला आक्षेप? वाचा नोटिसीचा मजकूर सविस्तर!
नारायण राणे
Follow us
| Updated on: Dec 29, 2021 | 3:35 PM

सिंधुदुर्गः केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना कणकवली पोलिसांनी नोटीस बजावली असून दुपारी 3 वाजता हजर राहण्याच आदेश दिले आहेत. या नोटिसीत नेमका काय मजकूर आहे ते पाहुयात..

पोलिसांनी बजावलेली नोटीस पुढीलप्रमाणे-

प्रति,

सी.आर.पी.सी कलम 160 (1) अन्वये नोटीस

श्री. नारायण तातु राणे, (केंद्रीय मंत्री, भारत सरकार) रा. ओम गणेश बंगला, कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग यांना

विषय:- गुन्ह्याचे तपासकामी कणकवली पोलीस ठाणे येथे हजर राहणेबाबत.

संदर्भ :- कणकवली पोलीस स्टेशन, जिल्हा सिंधुदुर्ग गुन्हा रजि, क्रमांक 387/2021 IPC कलम 307, 120 (ब), 34 प्रमाणे.

आपणास या नोटीसीद्वारे सुचित करण्यात येते की, कणकवली पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नं.387/2021 भा.द.वि.कलम 307,120 (ब), 34 या गुन्ह्यात श्री. नितेश नारायण राणे हे पाहीजे आरोपी असून त्यांचा ठावठिकाणा अथक प्रयत्न करुन सुद्धा मिळुन येत नाही व सदर आरोपीचा शोध जारी आहे.

आपण काल दि.  28.12.2021 रोजी पत्रकार परीषद घेतली होती. सदर गुन्हयाबाबत आक्षेपार्ह विधाने केली होती. तसेच एका पत्रकाराने आपणास पाहीजे आरोपी श्री. नितेश राणे यांच्या ठाव ठिकाणाबद्दल प्रश्न विचारला असता आपण श्री. नितेश राणे हे कोठे आहेत ते सांगायला आम्ही मुर्ख आहोत का? असे विधान केले. तसेच सदरील बाबतीत आज दि.29.12.2021 रोजी रत्नागिरी टाईम्स आणि इतर वृत्तपत्रातून आपले सदर विधान प्रसिद्ध झाले आहे.

वरील सर्व बाबींचा सर्वकष विचार करता असे दिसते की, श्री. नितेश राणे या आरोपीचा ठाव ठिकाणा आपणास पुर्णपणे माहीती आहे.

तरी सदरील नोटीस मिळताच आपण पाहीजे आरोपी श्री. नितेश राणे यास आमचे समोर हजर करावे. तसेच आपल्या पत्रकार परीषदेनुसार आपल्याला माहीती असलेल्या गुन्हयाच्या तपशिलाबाबत जबाब नोंदविण्यासाठी दि. 29.12.2021 रोजी 15.00 वाजता कणकवली पोलीस ठाणे येथे आमचे समोर स्वतः हजर रहावे.

● निरीक्षक पोलीस कणकवली

(सचिन ए. हुंदळेकर) पोलीस निरीक्षक कणकवली पोलीस

इतर बातम्या-

Video| नारायण राणेंना कणकवली पोलिसांची नोटीस; 3 वाजता हजर राहण्याचे आदेश

Nashik| 6 नगरपरिषदांवर प्रशासक; तर 6 नगरपंचायतींच्या 11 जागांसाठी आजपासून अर्ज भरायला सुरुवात

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.