AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde Breaking: आता शिवसेनेचे आणखी एक मंत्री उदय सामंतही नॉट रीचेबल, सकाळपासून संपर्क नाही

उदय सामंतही त्यांना जाऊन मिळाल्यास बंडखोरांचे बळ आणखी वाढण्याची शक्यता आहे. उदय सामंत हे गुवाहाटीसाठी रवाना झाल्याचे सांगण्यात येते आहे.

Eknath Shinde Breaking: आता शिवसेनेचे आणखी एक मंत्री उदय सामंतही नॉट रीचेबल, सकाळपासून संपर्क नाही
Samant unreacheableImage Credit source: social media
| Edited By: | Updated on: Jun 26, 2022 | 3:22 PM
Share

मुंबई- शिवसेनेला (Shivsena)आणखी एक धक्का बसला आहे. एकनाथ शिंदे  (Eknath Shinde)यांच्या बंडात आता राज्यातील आणखी एक मंत्री गेला असण्याची शक्यता आहे. राज्याचे उच्चशिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant)हे सकाळपासून नॉट रिचेबल आहेत. कालच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला ते उपस्थित होते, मात्र त्यानंतर आज सकाळपासून त्यांचा संपर्क झालेला नाही. एकनाथ शिंदे यांच्या गटात सध्या 37 हून जास्त शिवसेना आमदार आणि 9 हून जास्त अपक्ष आमदार असल्याचे सांगण्यात येते आहे. आता त्यात उदय सामंतही त्यांना जाऊन मिळाल्यास बंडखोरांचे बळ आणखी वाढण्याची शक्यता आहे. उदय सामंत हे विमानाने गुवाहाटीला रवाना झाले असल्याची माहिती आहे. एका बाजूला उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राूत हे शिवसैनिकांना आणि शिवसेना नेत्यांना एकीचे आवाहन करीत असताना पक्षातील फूट मात्र थांबण्यास तयार नाही हेच यातून दिसते आहे. संजय राऊत हे कठोर शब्दांत बंडखोर आमदारांवर टीका करीत आहेत, मात्र तरीही शिवसेनेचे एक मंत्रीच गुवाहटीला गेल्याच्या माहितीने शिवसेनेला मोठा धक्का बसल्याचे मानण्यात येते आहे.

कोण आहेत उदय सामंत

उदय सामंत हे रत्नागिरीचे आमदार आहेत. तसेच सध्या ते शिवसेनेकडून उच्च तंत्रशिक्षण मंत्री आहेत. त्यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. 2014साली त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. 2004, 2009, 2014आणि 2019या चारही निवडणुका रत्नागिरीतून त्यांनी जिंकलेल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील तरुण नेतृत्व म्हणून उदय सामंत यांच्याकडे पाहिले जाते.

शिवसेनेचे आता 39आमदार शिंदे यांच्या गटात

उदय सामंत यांच्या गुवाहाटीत जाण्याने आता शिंदेंसोबतच्या शिवसेना आमदारांची संख्या 39होणार आहे. शिवसेनेचे कोण कोण आमदार सोबत?

एकनाथ शिंदे उदय सामंत शहाजी पाटील अब्दुल सत्तार शंभुराज देसाई अनिल बाबर तानाजी सावंत संदीपान भुमरे चिमणराव पाटील प्रकाश सुर्वे भरत गोगावले विश्वनाथ भोईर संजय गायकवाड प्रताप सरनाईक राजकुमार पटेल राजेंद्र पाटील महेंद्र दळवी महेंद्र थोरवे प्रदीप जयस्वाल ज्ञानराज चौगुले श्रीनिवास वनगा महेश शिंदे संजय रायमूलकर बालाजी कल्याणकर शांताराम मोरे संजय शिरसाट गुलाबराव पाटील प्रकाश आबिटकर योगेश कदम आशिष जयस्वाल सदा सरवणकर मंगेश कुडाळकर दीपक केसरकर यामिनि जाधव लता सोनावणे किशोरी पाटील रमेश बोरणारे सुहासे कांदे बालाजी किणीकर

अपक्ष कोण कोण शिंदेंसोबत?

बच्चू कडू राजकुमार पटेल राजेंद्र यड्रावकर चंद्रकांत पाटील नरेंद्र भोंडेकर किशोर जोरगेवार मंजुळा गावित विनोद अग्रवाल गीता जैन

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.