Video | ‘हा तर निर्लज्जतेचा कळस’ फडणवीसांची टीका, ‘मोदींच्या केसालाही कुणी धक्का लावू शकत नाही!’
पंतप्रधानांच्या जीवाशी खेळ करणाऱ्यांना या देशातील जनता कधीच माफ करणार नाही, असं फडणवीस म्हणालेत. एवढी मोठी घटना घडूनही त्या राज्याचे मुख्यमंत्री फोन उचलत नाहीत, याची जेवढी निंदा केली जावी, तेवढी कमीच असेल, असंही ते म्हणालेत.
मुंबई : महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पंजाबमधील राजकीय (Punjab Politics) घडामोडींवर महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. मोदींसोबत (PM Narendra Modi) पंजाबमध्ये जे घडलं त्यावरुन त्यांनी काँग्रेसवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. काँग्रेस नेत्यांची (Congress leaders) वक्तव्य हा निर्लज्जपणाचा कळस असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. पत्रकारांनी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलंय.
‘ती वक्तव्य निर्लज्जपणाचा कळस’
पंजाब मधील आंदोलक हे काँग्रेसचे कार्यकर्ते होते. असा आरोप फडणवीसांनी केला. त्यांना पोलिसांनी परवानगी दिली होती, असाही दावा त्यांनी केलाय. त्यामुळे पंतप्रधानांचा ताफा 20 मिनिटे थांबून होता. माजी मुख्यमंत्री अमरीनंदर सिंग यांनी सांगितलं की, तिथून पाकिस्तानची सीमा 10 किलोमीटर अंतरावरच होती. आमची राष्ट्रपतींना विनंती आहे, याची दखल देशपातळीवर घेतली जावी. पंतप्रधानांवरील हल्ला हा देशावरील हल्ला असतो. काँग्रेस नेते ज्या बेशरमपणे पंतप्रधानांच्या सुरक्षेबाबत बोलत आहेत, ती निर्लज्जता आहे. जनतेचा आशीर्वाद घेऊन मोदी आले आहेत. या आशीर्वादामुळे मोदींच्या केसालाही धक्का लागणार नाही, असं वक्तव्य फडणवीस यांनी केलं होतं.
काँग्रेसला फळं भोगावी लागणार?
पंतप्रधानांच्या जीवाशी खेळ करणाऱ्यांना या देशातील जनता कधीच माफ करणार नाही, असं फडणवीस म्हणालेत. एवढी मोठी घटना घडूनही त्या राज्याचे मुख्यमंत्री फोन उचलत नाहीत, याची जेवढी निंदा केली जावी, तेवढी कमीच असेल, असंही ते म्हणालेत. काँग्रेसचं घे घाणेरडं राजकारण आता जनतेपासून लपून राहिलेलं नाही. काँग्रेसचे नेते जी वक्तव्य आता करत आहेत, ती म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत. पंजाबमध्ये कॉंग्रेस जो खेल करू इच्छित आहे, तसाच खेळ 80 च्या दशकात कॉंग्रेसने केला होता. याचे गंभीर परिणाम काँग्रेसला भोगावे लागतील, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय.
मोदींसोबत नेमकं काय झालं पंजाबमध्ये?
पंजाबमधील एका ठिकाणी मोदींच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र अचानक ही सभा रद्द करावी लागली होती. मोदींचा ताफा पंधरा ते वीस मिनिटं एका फ्लायओव्हरवर अडकला होता. ही मोदींच्या सुरक्षेतली सगळ्यात मोठी चूक असल्याचं बोललं जातंय. दरम्यान, यामुळे मोदींची सभा रद्द करुन त्यांनी माघारी परतावं लागलं होतं. त्यानंतर आता सर्वच थरातून ही घटना वादात आली आहे. आगामी पंजाब विधानसभा निवढणुकांच्या पार्श्वभूमीवर या घटनेचे पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. याचप्रकरणी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची पंतप्रधान नरेंद्र यांनी भेटही घेतली आहे.
President Ram Nath Kovind met PM Narendra Modi at Rashtrapati Bhavan today and received from him a first-hand account of the security breach in his convoy in Punjab yesterday. The President expressed his concerns about the serious lapse: Rashtrapati Bhavan pic.twitter.com/pC6IVYkYXB
— ANI (@ANI) January 6, 2022
इतर बातम्या –
PM MODI PUNJAB | समजून घ्या, नेमकं मोदींसोबत पंजाबमध्ये काय झालं? सुरक्षेतली चूक की आणखी काही?
CCTV | भररस्त्यात अडवून बेदम मारहाण, मग चाकूने भोसकलं, नांदेडमध्ये तरुणाच्या हत्येने खळबळ