Maharashtra Assembly Session : पन्नास खोके, पन्नास खोके, खाऊन खाऊन माजलेत बोके; विरोधकांच्या घोषणांनी विधानसभा परिसर दणाणला

Maharashtra Assembly Session : विरोधी पक्षनेते अजित पवार आणि विधना परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली आज महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर येत ईडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

Maharashtra Assembly Session : पन्नास खोके, पन्नास खोके, खाऊन खाऊन माजलेत बोके; विरोधकांच्या घोषणांनी विधानसभा परिसर दणाणला
पन्नास खोके, पन्नास खोके, खाऊन खाऊन माजलेत बोके; विरोधकांच्या घोषणांनी विधानसभा परिसर दणाणला Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 23, 2022 | 12:44 PM

मुंबई: विरोधी पक्षाच्या आमदारांनी आज सुद्धा सत्ताधाऱ्यांना वेठीस धरलं. खासकरून शिंदे गटाच्या आमदारांना विरोधकांनी आजही चांगलंच जेरीस आणलं. विरोधकांनी विधानभवनाच्या (Maharashtra Assembly Session) पायरीवर उभं राहून शिंदे गटाच्या आमदारांच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या. फिफ्टी फिफ्टी, चलो गुवाहाटी चलो गुवाहाटी… ईडी सरकार हाय हाय… पन्नास खोके, पन्नास खोके, खाऊन खाऊन माजलेत बोके… आणि आले रे आले, गद्दार आले, अशा घोषणा देत विरोधकांनी संपूर्ण विधान भवन परिसर दणाणून सोडला. त्यामुळे शिंदे गटाच्या आमदारांची चांगलीच कोंडी झाली. अधिवेशन सुरू झाल्याच्या पहिल्या दिवसांपासून विरोधकांनी नव नवीन घोषणा देत शिंदे गटाच्या (shinde camp) आमदारांना डिवचण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे शिंदे गटाचे आमदारही वैतागले आहेत. राज्याचे मंत्री आणि शिंदे समर्थक आमदार शंभुराज देसाईही (shambhuraj desai) परवा चांगलेच चिडले होते. मात्र, त्यानंतरही विरोधकांची घोषणाबाजी अजून काही थांबलेली नाही.

अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर विरोधकांनी कामकाजात भाग घेतला. मात्र, त्यानंतर दीड तासांनी विधानसभेच्या पायरीवर जमून सरकार विरोधात घोषणाबाजी करतानाच शिंदे गटाच्या आमदारांचीही खिल्ली उडवणाऱ्या घोषणा दिल्या. ओला दुष्काळ जाहीर करा, नाही तर खुर्च्या खाली करा, अतिवृष्टीग्रस्तांना तात्काळ मदत करा… पन्नास खोके, एकदम ओके… ईडी ज्याच्या घरी तो भाजपच्या दारी… स्थगिती सरकार हाय हाय… आले रे आले गद्दार आले… अशा घोषणा देत आज पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर सरकारविरोधात जोरदार निदर्शने केली.

हे सुद्धा वाचा

चौथ्या दिवशीही विरोधक आक्रमक

विरोधी पक्षनेते अजित पवार आणि विधना परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली आज महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर येत ईडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. अधिवेशनाचा आजचा चौथा दिवस असून महाविकास आघाडीमधील सर्व आमदारांनी ईडी सरकारविरोधात आंदोलन करत सरकारला धारेवर धरण्याचे काम केले.

गोविंदांच्या मदतीची रक्कम कुठाय?

दरम्यान, शिवसेनेचे आमदार अजय चौधरी यांनी मृत गोविंदाला देण्यात आलेल्या मदतीवर सरकारवर टीका केली. गोविंदाना मदत जाहीर केलेली ती मिळालेली नाही. गोविंदाना सरकार मदत कधी करणार? की फक्त कागदोपत्री मदत आहे. मृतांना 10 लाखाची मदत दिली जाईल. दोन अवयव जखमी झालेल्यांना साडेसात लाखाची मदत दिली जाईल. एका अवयवाला दुखापत झाल्यास 5 लाख मदत देणार हे सरकारने जाहीर केल आहे. पण मदत अद्यापही दिलेली नाही, अशी टीका अजय चौधरी यांनी केली आहे.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.