Chandrashekhar Bawankule : 25 लाख युवा वॉरिअर्सच्या माध्यमातून लोकसभा, विधानसभा जिंकणार; बावनकुळेंची मुंबईतून डरकाळी

Chandrashekhar Bawankule : मुंबई महानगरपालिकेवर विजयाचा झेंडा लावल्याशिवाय थांबणार नाही, असा निर्धार आशिष शेलार यांनी व्यक्त केला. यावेळी भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीमध्ये समावेश झाल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला.

Chandrashekhar Bawankule : 25 लाख युवा वॉरिअर्सच्या माध्यमातून लोकसभा, विधानसभा जिंकणार; बावनकुळेंची मुंबईतून डरकाळी
25 लाख युवा वॉरिअर्सच्या माध्यमातून लोकसभा, विधानसभा जिंकणार; बावनकुळेंची मुंबईतून डरकाळीImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 17, 2022 | 10:06 PM

मुंबई: भाजपच्या (bjp) प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी मुंबईत येऊन निवडणुकीचं रणशिंग फुंकलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm modi) यांच्या नेतृत्वात देशाला एकविसाव्या शतकात सर्वोच्च स्थानावर न्यायचे आहे. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला राज्यातील प्रत्येक बूथवर 50 युवा वॉरिअर्स उभे करायचे आहेत. या 25 लाख युवा वॉरिअर्सच्या जोरावर आगामी 2024 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचंड मोठे यश मिळवायचे आहे, अशी गर्जना चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. आपल्याला आगामी काळात मुंबई महापालिका जिंकायची आहे. सर्व निवडणुकांमध्ये भाजपाच नंबर वनचा राहील यासाठी मेहनत करायची आहे. यापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मिळालेल्या यशाची परंपरा टिकवायची आहे, असं आवाहनही बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना केले.

पावसांच्या धारात, वाद्यांच्या जल्लोषात आणि घोषणांच्या दणदणाटात भाजपचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे कार्यकर्त्यांनी भाजपा प्रदेश कार्यालयात जंगी स्वागत केले. मुंबई भाजपाचे नवनियुक्त अध्यक्ष आशिष शेलार यांचेही कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले. यावेळी ते बोलत होते. भाजपचा प्रदेशाध्यक्ष म्हणून पक्षाची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल बावनकुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे आभार मानले. यावेळी त्यांनी लोकसभा, विधानसभेसह मुंबई महापालिका जिंकण्यासाठी सज्ज राहण्याचं आवाहन कार्यकर्त्यांना केलं.

हे सुद्धा वाचा

भाजप मुंबई महापालिका जिंकणार

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यांनी भाजप विजयी होण्याची आशा व्यक्त केली. बावनकुळे व आशिष शेलार यांच्या नेतृत्वात भाजप निवडणुका लढेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेसोबत भाजपा आगामी काळात मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील सर्व निवडणुकीत विजयाचा झेंडा फडकवेल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

घराणे आवश्यक नाही, गुणवत्ता महत्त्वाची

चंद्रशेखर बावनकुळे सामान्य पार्श्वभूमीतून पुढे आले आहेत. भाजपाचा अध्यक्ष किंवा मुख्यमंत्री होण्यासाठी घराण्याची पार्श्वभूमी नव्हे तर मेहनत आणि गुणवत्ता आवश्यक असते. पक्षामध्ये नेतृत्वावर विश्वास ठेऊन श्रद्धेने काम करत रहावे याचे बावनकुळे हे उदाहरण आहे. मेहनत घेणारे नेतृत्व राज्याचे अध्यक्ष म्हणून मिळाले आहे, असं सांगतानाच आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूक जिंकण्यासाठी पक्षाच्या नेतृत्वाने आशिष शेलार यांच्यावर जबाबदारी दिली असून ते पक्ष नेतृत्वाच्या विश्वासाला पात्र ठरतील, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

महापालिकेवर विजयाचा झेंडा फडकवणारच

यावेळी मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनीही संवाद साधला. मुंबई महानगरपालिकेवर विजयाचा झेंडा लावल्याशिवाय थांबणार नाही, असा निर्धार आशिष शेलार यांनी व्यक्त केला. यावेळी भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीमध्ये समावेश झाल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला.

चंद्रशेखर बावनकुळे यांचे मुंबई विमानतळावर कार्यकर्त्यांनी उत्साहात स्वागत केले. त्यानंतर त्यांनी व आशिष शेलार यांनी विमानतळाजवळील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मृतीस्थळ, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे स्मारक, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक आणि चर्चगेट येथील अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा येथे अभिवादन केले.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.