धनुभाऊंचा पंकजाताईंना मेसेज! कोरोना पॉझिटिव्ह बहिणीचा धनुभाऊंना काय रिप्लाय?
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनाही दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. त्या सध्या मुंबईतील निवासस्थानीच क्वारंटाईन आहेत. तशी माहिती पंकजा यांनी स्वत: ट्विटरद्वारे दिली आहे. पंकजा मुंडे यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाल्याचं समजल्यानंतर त्यांचे बंधू आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे,
बीड : राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव (Corona Outbreak) मोठ्या प्रमाणात वाढत आहे. नेत्यांच्या मुलांची लग्न आणि हिवाळी अधिवेशनानंतर (Winter Session) राज्यातील विविध पक्षांचे नेते आणि मंत्री कोरोना पॉझिटिव्ह येत आहेत. भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनाही दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. त्या सध्या मुंबईतील निवासस्थानीच क्वारंटाईन आहेत. तशी माहिती पंकजा यांनी स्वत: ट्विटरद्वारे दिली आहे. पंकजा मुंडे यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाल्याचं समजल्यानंतर त्यांचे बंधू आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे, तशी माहिती स्वत: धनंजय मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
पंकजा मुंडे यांना आपण मेसेज केला आहे. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तेव्हा त्यांनी तब्येत चांगली असल्याचं सांगितलं. मात्र, त्यांना दुसऱ्यांदा कोरोना झाला आहे. पोस्ट कोव्हिड इफेक्ट घातक ठरू शकतात. काळजी घेणं फार गरजेचं आहे. नंतरच्या काळात फार त्रास होतो. मी फोन तर नाही करु शकलो, पण काळजी घेतली पाहिजे, हे नक्कीच मी पंकजाताईंना सांगितलं, असं धनंजय मुंडे म्हणाले.
पंकजा मुंडेंची ट्विटरवरुन माहिती
दरम्यान, पंकजा मुंडे यांनी काल ट्वीट करुन कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली. ‘कोरोनाबाधीत लोकांच्या संपर्कात आल्याचे जाणवल्याबरोबर मी बिलग झाले आहे. चाचणी केली, लक्षणं आणि कोरोना दोन्ही आहे. सर्वांनी काळजी घ्यावी’, असं ट्वीट पंकजा मुंडे यांनी केलं आहे.
Corona बाधीत लोकांच्या संपर्कात आल्याचे जाणवल्या बरोबर मी विलग झाले आहे.. चाचणी केली…लक्षणं आणि Corona दोन्ही आहे… सर्वानी काळजी घ्यावी..
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) January 1, 2022
पंकजा मुंडेंना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण
यापूर्वी एप्रिल 2021 मध्ये पंकजा मुंडे या कोरोना पॉझिटिव्ह आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी आपली प्रकृती चांगली असून घरीच उपचार सुरु असल्याची माहिती दिली होती. माझ्या कोरोनाचा चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मी आधीच सावधगिरी बाळगून स्वत:ला विलग केलं होतं. मी गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुळे मृत्यू झालेल्या बऱ्याच कुटुंबियांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. त्याच वेळी कदाचित मला कोरोनाचा प्रादुर्भाव झाला असेल. त्यामुळे या काळात जे कोणी माझ्या संपर्कात आले आहेत. त्यांनी स्वत:ची कोरोना चाचणी करुन घ्यावी. तसेच काळजी घ्या, असं ट्वीट त्यांनी त्यावेळी केलं होतं.
I m tested Corona positive…I m already Isolated taking precautions.. I met so many people n families of Corona victims I must have caught there ..those who were with me plz get ur tests done..take care ..
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) April 29, 2021
इतर बातम्या :