Pankaja Munde : रोहिणी खडसे आल्या, तुम्हीही राष्ट्रवादीत या; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची थेट पंकजा मुंडेंना ऑफर

Amol Mitkari : अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी झाला नसता तर भाजपची राष्ट्रपती राजवट उठली नसती. संताजी, धनाजीने औरंगजेबच्या तंबूचे कळस काटले होते. मात्र अजितदादांनी भाजपचे कळस कधी काटले हे भाजपाला कळालं नाही, असा दावाही त्यांनी केला.

Pankaja Munde : रोहिणी खडसे आल्या, तुम्हीही राष्ट्रवादीत या; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची थेट पंकजा मुंडेंना ऑफर
Pankja Munde : गुरुजींनी मला घडविण्यासाठी छडी देखील मारली, शिक्षकदिनी पंकजा मुडेंनी सांगितल्या शाळेतल्या आठवणी Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 29, 2022 | 9:10 AM

जळगाव: गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसे यांच्या पुण्याईने भाजप पक्ष वाढला. मात्र सुडाचं राजकारण करून त्यांच्याच मुलीचा पराभव करण्यात आला. रोहिणी खडसेंना (rohini khadse) हे लक्षात आलं. मात्र पंकजा मुंडे यांच्याही लक्षात यायला पाहिजे. आता 12 आमदारांची यादी राज्यपाल लवकर मंजूर करतील. 12 आमदारांच्या यादीत पंकजा मुंडेंचं नाव नाही. त्यामुळे पक्ष वाढवणाऱ्यांचे पंख कसे छाटतात दिसते आहे. एक प्रकारे रोहिणी खडसे या राष्ट्रवादीत आल्या. तशाच पंकजा मुंडेंनीही (pankaja munde)पाऊल उचलावं, अशी थेट ऑफर राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी पंकजा मुंडे यांना दिली आहे. तसेज अजित पवारांचा पहाटेचा शपथविधी झाला नसता तर भाजपची महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट उठली नसती, असा गौप्यस्फोटही मिटकरी यांनी केला आहे. मिटकरी यांच्या या दाव्यावर अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

रोहिणी खडसे यांनी बोदवडमध्ये संवाद रॅलीचं आयोजन केलं होतं. या संवाद यात्रेला संबोधित करताना अमोल मिटकरी यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना थेट राष्ट्रवादीत येण्याची ऑफर दिली. यावेळी त्यांनी भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावरही टीका केली. आताचे ग्रामविकास मंत्री आणि मागील जलसंपदामंत्री ते म्हणत होते, दारूच्या बाटलीला बाईचे नाव द्या. आठवते का? काय म्हणत होते?, अशी टीका मिटकरी यांनी गिरीश महाजन यांच्यावर केली. आता कोण मंत्री आहे. कुठल्या खात्याचा मंत्री आहे आम्हालाही कळत नाही. मंत्रिमंडळाचा विस्तार रखडलेला आहे. अपक्ष नाराज आहेत. लोकांनी त्यांना मंत्रिपद दिलं. त्यांच्याबद्दल जनतेच्या मनात रोष आहे, असंही ते म्हणाले.

सतेच्या जोरावर गर्दी खेचू शकत नाही

यावेळी त्यांनी राज्याचे मंत्री संदीपान भुमरे यांच्यावरही टीका केली. संदीपान भुमरे कॅबिनेट मंत्री आहेत. ते पैठणला गेले. त्यांच्या सभेला फक्त 115 लोक होते. आमची राष्ट्रवादीची सभा दाखवा. किती लोक आहेत हे कळू द्या.सत्तेच्या जोरावर तुम्ही सभेला जनता आणू शकत नाही. तुम्ही फक्त 50 खोके घेऊन ओके होऊ शकता, असा टोला त्यांनी लगावला.

हे सुद्धा वाचा

चुपचाप उपमुख्यमंत्री बनो

शिंदे साहेबांकडे चांगलं नगर विकास खात होतं. ते कशाला गेले हेच कळत नाही? देवेंद्रजींना वाटत होतं की मुख्यमंत्री आपण होऊ. मात्र झालं उलटचं. त्यांनी म्हटलं होतं मी उपमुख्यमंत्री होणार नाही. सरकारमध्ये बाहेर राहून काम करेल. आला की नाही जेपी नडांचा फोन. हमको पुछा क्या? ज्यादा आगे जा रहा क्या? चुपचाप उपमुख्यमंत्री बनो, असं म्हटलं गेलं. उपसरपंचाचा सरपंच होणे हे प्रमोशन असतं. सरपंचाचा उपसरपंच होणार हे डिमोशन असतं. मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्री व्हावे लागले. ही महाराष्ट्रातल्या इतिहासातील पहिली घटना आहे, अशी टोलेबाजीही त्यांनी केली.

भाजपचे कळस कापले

अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी झाला नसता तर भाजपची राष्ट्रपती राजवट उठली नसती. संताजी, धनाजीने औरंगजेबच्या तंबूचे कळस काटले होते. मात्र अजितदादांनी भाजपचे कळस कधी काटले हे भाजपाला कळालं नाही, असा दावाही त्यांनी केला.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.