Pankaja Munde : संधी मिळाल्यास सोनं करेल, विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांचं मोठं विधान

विधानपरिषदेच्या 10 सदस्यांसाठी येत्या 20 जून रोजी निवडणूका होणार आहेत. याकरिता भाजपकडून पंकजा मुंडे निवडणुकीला उभ्या राहू शकतात, अशी चर्चा सुरु आहे.

Pankaja Munde : संधी मिळाल्यास सोनं करेल, विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांचं मोठं विधान
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 03, 2022 | 12:09 PM

बीडः विधान परिषद (Maharashtra Legislative council) निवडणुकीला उभं राहण्याची संधी मिळाली तर त्याचं मी सोनं करेल, अशी प्रतिक्रिया भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी दिली आहे. विधानपरिषदेच्या 10 सदस्यांसाठी येत्या 20 जून रोजी निवडणूका होणार आहेत. याकरिता भाजपकडून पंकजा मुंडे निवडणुकीला उभ्या राहू शकतात, अशी चर्चा सुरु आहे. याविषयी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला पंकजा मुंडेंनी उत्तर दिलं. गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्या आठव्या स्मृतीदिनाचा कार्यक्रम बीडमधील गोपीनाथ गडावर आयोजित करण्यात आला आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांची विशेष उपस्थिती या कार्यक्रमाला असेल. दुपारी तीन वाजता मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होईल. गोपीनाथ गडावर या कार्यक्रमासाठी हजारो कार्यकर्ते बसतील, अशी आसन व्यवस्था करण्यात आली आहे.

संधीविषयी काय म्हणाल्या पंकजा मुंडे?

गोपीनाथ गडावरील कार्यक्रमात मुख्य भाषणात पंकजा मुंडे याक बोलणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. विधान परिषदेच्या उमेदवारीवर त्या काही भाष्य करतील का, याकडेही सर्वांच्या नजरा आहेत. हाच प्रश्न पत्रकारांनी विचारला असता पंकजा मुंडे म्हणाल्या, ‘ मी संधीची अपेक्षा करत नाही. संधीसाठी मी प्रयत्न करत नाही. तसं तुम्हाला दिसणार नाही. माझा तो स्वभाव नाही. संधी मिळावी म्हणून वाट पाहणाऱ्या राजकारण्यांमध्ये माझा नंबर नाहीये. जे मिळतं त्याचं सोनं करते. संधी मिळाल्यास संधीचं सोनं करेल. हेच माझं काम आहे. हेच माझ्यावर संस्कार आहेत. साहेबांनी जे पद भूषविलं. त्या पदाला साहेबांनी उंचीवर नेलं. ते महत्त्वाचं आहे. म्हणजे संधीचं सोनं करावं हे माझे संस्कार आहेत. त्यामुळे संधीची वाट बघण्याची माझी प्रवृत्ती नाही.

हे सुद्धा वाचा

भाजपडून कोण-कोणती नावं चर्चेत?

विधानपरिषदेवरील भाजपच्या पाच जागा रिक्त होणार आहेत. भाजपकडून विधानपरिषदेवर प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांची नावं निश्चित मानली जात आहेत. प्रवीण दरेकर हे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते आहेत तर देवेंद्र फडवणीस यांच्या जवळचे म्हणून प्रसाद लाड यांचंही नाव निश्चित मानलं जात आहे. तर राम शिंदे, पंकजा मुंडे आणि चित्रा वाघ, संजय पांडे यांची चर्चा सुरु आहे. येत्या 20 जून रोजी ही निवडणूक पार पडणार आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.