Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोदी हे हिटलर आणि खोमेनीचे मिश्रण, ते देशाला…; संजय राऊत यांचा हल्लाबोल

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दैनिक 'सामना'तील 'रोखठोक' या सदरातून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला चढवला आहे. राऊत यांनी मोदी यांची तुलना खोमेनी आणि हिटलरशी केली आहे.

मोदी हे हिटलर आणि खोमेनीचे मिश्रण, ते देशाला...; संजय राऊत यांचा हल्लाबोल
pm narendra modiImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 07, 2023 | 7:03 AM

मुंबई : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला चढवला आहे. नऊ वर्ष राज्य करूनही पंतप्रधान नरेंदऔ मोदी यांना निवडणुका जिंकण्यासाठी श्रीरामापासून बजरंगबलीपर्यंतचे हिंदू देव लागतात. लोकांना धर्मकारणात धुंद करून नशेबाज करायचे आणि निवडणुका जिंकायच्या. हिटलर आणि खोमेनीचे हे मिश्रण आहे. देशाला ते परवडणारे नाही. देश अशाने संपून जाईल. पुन्हा कुणाचा तरी गुलाम होईल. त्यामुळे लोकांनी एकवटायला हवे. निर्भय व्हावे लागेल, असं आवाहन संजय राऊत यांनी केलं आहे.

संजय राऊत यांनी दैनिक ‘सामना’तील ‘रोखठोक’ या सदरातून हा हल्ला चढवला आहे. भारतीय राज्य घटना दुटप्पीपणा करणार नाही. पण राजकारणी बिघडतील. त्यातून सगळं बिघडेल, असा धोका डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वर्तवला होता. आंबेडकरांचे हे म्हणणे मोदी आणि शाह यांनी सत्यात उतरवले आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. धर्माचे राजकारण आणि व्होट बँकेचे राजकारण घटना रोखू शकत नाही. देशाचा आजचा गोंधळ सावरण्यास घटना अपुरी पडत आहे, असंही राऊत यांनी म्हटलं आहे.

हे सुद्धा वाचा

‘रोखठोक’ आसूड जसेच्या तसे…

या देशात नवे हिंदुत्वाचे वातावरण तयार करण्यात आले आहे. त्यातून दोन खोमेनी निर्माण झाले आहेत. त्यातूनच आता असंख्या खोमेनी निर्माण करून देश इराण, सीरिया आणि अफगाणिस्तानच्या पद्धतीने चालवला जाईल.

संसदीय लोकशाहीच्या मुखवट्याखाली हुकूमशाही चालते आणि हुकूमशहा हवा म्हणून हिंदुत्वाचे कार्ड चालवले जाते. सामान्य मतदारांनी विचार करण्याचा हा काळ आहे. आपण सार्वभौम आहोत. इतका गैरसमज जरी सध्या दूर झाला तरी पुरे आहे.

राजकीय पक्षांना टिकू द्यायचे नाही. सर्व सत्ता दोघांकडे असावी हा विचार म्हणजे घोटाळा आहे. देशात गवतासारख्या वाढणाऱ्या आणि फुटणाऱ्या राजकीय पक्षांच्या आणि नेत्यांच्या तावडीतून देशाला सोडवण्याची गरज असताना पंतप्रधान फोडाफोडीस उत्तेजन देत आहे.

सरकारला अडचणीचे ठरणारे निर्णय सुप्रीम कोर्ट घेत नाही. तारखांची शर्यत सुरूच ठेवते. मुंबईसह 14 महापालिकांच्या निडवणुका रोखण्याचे कारण नव्हते. कोर्ट निवडणुका घेऊ देत नाही. हे सरकारला आणि भाजपला हवेच आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावर गेली 15 वर्ष तारखांशिवाय काहीच घडत नाही. महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावरचा निर्णय अधांतरी आहे. सर्व काही घटनेनुसार होईल याची खात्री कोणीच देऊ शकत नाही.

सुनीता विल्यम्स 'ग्रह'वापसी, बघा अवकाशातून पृथ्वीवर परण्याचा प्रवास
सुनीता विल्यम्स 'ग्रह'वापसी, बघा अवकाशातून पृथ्वीवर परण्याचा प्रवास.
संभाजीनगरचे जिल्हाधिकारी औरंगजेबच्या कबरीजवळ दाखल
संभाजीनगरचे जिल्हाधिकारी औरंगजेबच्या कबरीजवळ दाखल.
ते काही आक्रमक झाले नाही, भेदरले होते; ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका
ते काही आक्रमक झाले नाही, भेदरले होते; ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका.
अमरावतीत पोलीस अलर्ट मोडवर; संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवला
अमरावतीत पोलीस अलर्ट मोडवर; संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवला.
'...मोदींकडे मागणी करा', कबरीच्या वादावर ठाकरेंचं पहिल्यांदाच भाष्य
'...मोदींकडे मागणी करा', कबरीच्या वादावर ठाकरेंचं पहिल्यांदाच भाष्य.
डिसीपी निकेतन कदम यांनी सांगितला नागपूरचा थरार
डिसीपी निकेतन कदम यांनी सांगितला नागपूरचा थरार.
'अबू आझमी उद्धव ठाकरेंचा कोण लागतो?', भाजपच्या नेत्याचा आक्रमक सवाल
'अबू आझमी उद्धव ठाकरेंचा कोण लागतो?', भाजपच्या नेत्याचा आक्रमक सवाल.
मुख्यमंत्र्यांचा मी लाडका आहे, ते मला काय बोलतील? नितेश राणेंचं विधान
मुख्यमंत्र्यांचा मी लाडका आहे, ते मला काय बोलतील? नितेश राणेंचं विधान.
नागपुरच्या राड्यात 33 पोलिसांसह 4 DCP जखमी, हिंसेला सुरूवात कुठून ?
नागपुरच्या राड्यात 33 पोलिसांसह 4 DCP जखमी, हिंसेला सुरूवात कुठून ?.
नागपूरच्या राड्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केला 'छावा' चित्रपटाचा उल्लेख
नागपूरच्या राड्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केला 'छावा' चित्रपटाचा उल्लेख.