विदर्भात राजकीय वातावरण पेटलं, यवतमाळात राष्ट्रवादीनं जाळला राणेंचा पुतळा, वर्धेत ठाकरेंच्या समर्थनार्थ पोस्टरबाजी

उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ वर्धेच्या ठाकरे मार्केट येथे शिवसेना, युवासेना आणि महिला आघाडीने रस्त्यावर उतरत उद्धव ठाकरे यांचं समर्थन करत घोषणाबाजी केली. यावेळी कार्यकर्त्यांच्या हातात आम्ही शिवसेनेसोबत असे फलक झलकत होते.

विदर्भात राजकीय वातावरण पेटलं, यवतमाळात राष्ट्रवादीनं जाळला राणेंचा पुतळा, वर्धेत ठाकरेंच्या समर्थनार्थ पोस्टरबाजी
यवतमाळात राष्ट्रवादीनं जाळला राणेंचा पुतळा
Follow us
| Updated on: Jun 24, 2022 | 6:36 PM

नागपूर : यवतमाळात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या विरोधात धमकीचे उद्गार काढले. याचा विरोध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले. यवतमाळ बसस्थानक चौकात नारायण राणे यांचा पुतळा जाळला. राष्ट्रवादीचे आशिष मानकर व पंकज मुंदे यांनी कार्यकत्यांसह राणे यांचा पुतळा जाळला. शरद पवार यांनी सरकारबाबत विचार मांडले. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी वक्तव्य केलं. पण, नैराश्येपोटी त्यांनी वक्तव्य केलं. त्याचा यवतमाळ राष्ट्रवादीतर्फे (NCP) निषेध करत आहोत. असे वैफल्यग्रस्त विधान करणं टाळावं. महाराष्ट्र पेटण्यापासून वाचवावा, असा इशारा यवतमाळच्या (Yavatmal) राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिलाय. आम्ही शरद पवार यांचे मावळे आहोत. आम्ही शरद पवार यांच्या केसालासुद्धा धक्का लागू देणार नाही, असंही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते म्हणाले.

ठाकरेंच्या समर्थनार्थ वर्धेत घोषणाबाजी

महाराष्ट्रात सुरू असलेले राजकीय संकटावरून शिवसेनेत दोन गट पडले आहे. एकनाथ शिंदे हे आपल्या समर्थीत आमदारांसोबत गुवाहाटी येथे गेले आहेत. सध्या उद्धव ठाकरे हे एकटे पडल्याचं चित्र आहे. उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ वर्धेच्या ठाकरे मार्केट येथे शिवसेना, युवासेना आणि महिला आघाडीने रस्त्यावर उतरत उद्धव ठाकरे यांचं समर्थन करत घोषणाबाजी केली. यावेळी कार्यकर्त्यांच्या हातात आम्ही शिवसेनेसोबत असे फलक झलकत होते. आम्ही ठाकरे यांच्या बाजूनं असल्याचं शिवसैनिकांनी सांगितलं. यावेळी शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

wardha shivsena

ठाकरेंच्या समर्थनार्थ वर्धेत घोषणाबाजी

आम्ही सच्चे शिवसैनिक

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर थेट मातोश्रीवरून आज शिवसेना पक्ष प्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील संपूर्ण शिवसैनिकांना भावनिक आवाहन केले. त्या आवाहनाला भंडाऱ्यात शिवसैनिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आलं. आम्ही शिवसेनेचे खंदे समर्थक आहो. शिवसेनेवर कितीही बिकट परिस्थिती आली तरी आम्ही उद्भव ठाकरे आणि पक्षाला कधीही सोडून जाणार नाही, असा विश्वास भंडारा शिवसैनिकांनी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना दिला. या वेळी शिवसेना समर्पित भंडारा विधानसभा क्षेत्राचे अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी पक्षाला सोडून शिंदे गटात शामिल झाल्याने तीव्र संतापही व्यक्त केली आहे. येणाऱ्या निवडणुकीत त्यांना धडा शिकवण्याची समजही त्यांनी नरेंद्र भोंडेकर यांना दिली आहे. यावेळी संपर्क प्रमुख नरेश डहारे, महिला सेना अध्यक्षा रश्मी पातुरकर व सुधीर उरकुडे उपस्थित होते.

हे सुद्धा वाचा

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.