संजय राठोड यांनी राजीनामा दिल्यास पुढचे पर्याय काय?; वाचा सविस्तर

राज्यातील अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्या सोमवारपासून सुरू होत असून पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी वन मंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्यासाठी ठाकरे सरकारवर दबाव वाढला आहे. (pooja chavan suicide case: what is option front of maharashtra minister sanjay rathod?)

संजय राठोड यांनी राजीनामा दिल्यास पुढचे पर्याय काय?; वाचा सविस्तर
संजय राठोड
Follow us
| Updated on: Feb 28, 2021 | 11:52 AM

मुंबई: राज्यातील अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्या सोमवारपासून सुरू होत असून पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी वन मंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्यासाठी ठाकरे सरकारवर दबाव वाढला आहे. त्यामुळे राठोड हे कोणत्याहीक्षणी मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे राठोड यांनी राजीनामा दिल्यास त्यांच्या पुढे काय पर्याय असू शकतात याबाबतचा घेतलेला हा आढावा. (pooja chavan suicide case: what is option front of maharashtra minister sanjay rathod?)

महंतांशी चर्चा करूनच राजीनामा?

विरोधकांकडून राजीनाम्यासाठी दबाव वाढल्याने शिवसेनेची प्रतिमा मलिन होत आहे. त्यामुळे शिवसेनेच्या एका गटाकडून राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी होत असल्याचं सूत्रांनी सांगितलं. आता पक्षातूनच राठोड यांच्या राजीनाम्यावर बोललं जात असल्याने राठोड हे आधी पोहरादेवीला जाऊन महंतांशी चर्चा करतील. त्यानंतर ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून राजीनामा देतील, असं सूत्रांनी सांगितलं. समाजाची पुन्हा एकदा सहानुभूती मिळवण्यासाठीच राठोड हे पोहरादेवीला जाणार असल्याचंही सांगितलं जात आहे.

दोन पर्याय, पहिला फक्त मंत्रिपद सोडण्याचा

राठोड यांना मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देण्यास सांगितल्यास त्यांच्याकडे दोन पर्याय राहणार आहे. पहिला म्हणजे केवळ मंत्रिपदाचा राजीनामा देणं आणि दुसरा म्हणजे मंत्रिपद आणि आमदारकीचा राजीनामा देऊन पुन्हा निवडणुकीला सामोरे जाणं. राठोड हे पहिला पर्यायाचा विचार करण्याची शक्यता कमी असल्याचं बोललं जात आहे. फक्त मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यास पुन्हा मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता कमी राहणार आहे. त्यामुळे राठोड केवळ मंत्रिपदाचा राजीनामा देतील असं वाटत नसल्याचं राजकीय निरीक्षकांचं म्हणणं आहे.

आमदारकी आणि मंत्रिपदाचाही राजीनामा देणार?

राठोड हे आमदारकी आणि मंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याची शक्यता अधिक वर्तवली जात आहे. आमदारकी आणि मंत्रिपदाचा राजीनामा देऊन राठोड पुन्हा निवडणुकीला सामोरे जातील. त्यातून जनता आणि समाज आपल्याच पाठिशी असल्याचंही दाखवून देण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. तसेच पुन्हा निवडून आल्यानंतर त्यांचा मंत्रिमंडळात परतण्याचा मार्गही मोकळा होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

या अडचणीही आहेत

राठोड यांनी राजीनामा दिल्यास त्यांना पुन्हा तिकीट देण्यात शिवसेनेकडून विरोध होऊ शकतो. पूजा चव्हाण प्रकरणात शिवसेनेची प्रतिमा मोठ्या प्रमाणावर मलिन झाली आहे. त्यामुळे शिवसेनेची प्रतिमा आणखी मलिन होऊ नये म्हणून राठोड यांना तिकीट देण्यास शिवसेनेतून विरोध होऊ शकतो, असंही सूत्रांनी सांगितलं.

महंत काय म्हणतात?

पोहरादेवीच्या महंतांनी राठोड यांच्या राजीनाम्याच्या मागणीला विरोध केला आहे. चौकशी झाल्याशिवाय आणि त्यातून काही निष्पन्न झाल्याशिवाय राठोड यांचा राजीनामा घेऊ नये. एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला दुसरा न्याय देऊ नये, असं महंत जितेंद्र महाराज यांनी सांगितलं. मात्र, उद्या राठोड यांना मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची वेळ आलीच तर त्यांनी मंत्रिपदासह आमदारकीचाही राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी जितेंद्र महाराज यांनी केली आहे. (pooja chavan suicide case: what is option front of maharashtra minister sanjay rathod?)

संबंधित बातम्या:

मोठी बातमी ! आधी मुख्यमंत्र्यांची भेट, नंतर पोहरादेवीला जाणार, संजय राठोड यांचं ठरलं

राठोडांच्या राजीनाम्यावरुन भाजप आक्रमक; महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक, आज मोठ्या घडामोडी घडणार

आता कोणत्याही क्षणी संजय राठोड यांची विकेट, संजय राऊत यांचे सूचक ट्विट

(pooja chavan suicide case: what is option front of maharashtra minister sanjay rathod?)

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.