देगलूरमध्ये भाजपचा पराभव का झाला ? प्रविण दरेकर यांनी सांगितलं नेमकं कारण, म्हणाले…

मोठ्या फरकाने पराभव झाल्यामुळे भाजपची रणनीती नेमकी कुठे चुकली ? जनतेने भाजपविषयीची आपले मते बदलली आहेत का ? असे प्रश्न विचारले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी भाजपचा पोटनिवडणुकीत पराभव का झाला याची नेमकी कारणं सांगतली आहेत. मुस्लीम समाजाने भाजपच्या द्वेषापोटी मतं केली असं दरेकर यांनी म्हटलंय.

देगलूरमध्ये भाजपचा पराभव का झाला ? प्रविण दरेकर यांनी सांगितलं नेमकं कारण, म्हणाले...
प्रविण दरेकर
Follow us
| Updated on: Nov 03, 2021 | 6:31 PM

मुंबई : देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपला जबर धक्का बसला. भाजपचे उमेदवार सुभाष साबने यांचा तब्बल 41 हजार मतांच्या फरकाने पराभव झाला. तर दुसरीकडे काँग्रेसचे उमेदवार जितेश अंतापूरकर हे विजयी ठरले. मोठ्या फरकाने पराभव झाल्यामुळे भाजपची रणनीती नेमकी कुठे चुकली ? जनतेची भाजपविषयीची आपली मते बदलली आहेत का ? असे प्रश्न विचारले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी भाजपचा पोटनिवडणुकीत पराभव का झाला असावा, याची नेमकी कारणं सांगतली आहेत. मुस्लीम समाजाने भाजपच्या द्वेषापोटी मतं केली असं दरेकर यांनी म्हटलंय.

प्रविण दरेकर नेमकं काय म्हणाले ?

“पंढरपुरात ताकदीने लढलो त्याचप्रमाणे देगलूरला ही लढलो. निवडणुकीत जय-पराजय होत असतो. त्याला अनेक कारणं असतात. गेल्यावेळी शिवसेना-भाजपला मतं पडली होती त्याच्यापेक्षा जास्त मतं यावेळी भाजपच्या उमेदवाराला पडली आहेत. निवडणुकीत मुस्लीम समाजाने भाजपच्या द्वेषापोटी मतदान केलं. तसेच वंचित बुहजन आघाडी 25 हजाराचे मत देईल, असा मला वाटलं होतं. पण पराभव हा पराभव असतो. तो आम्ही खुल्या मनाने स्वीकारला आहे,” असे प्रविण दरेकर म्हणाले. तसेच महाविकास आघाडीचा फॉर्म्यूला जमला म्हणतात. मग तो फॉर्म्यूला पंढरपुरात का जमला नाही, असा सवालदेखील त्यांनी केला.

जनतेने दिलेला कौल मान्य, कुठे चूक झाली यावर अभ्यास करणार- साबने

दरम्यान देगलूरमध्ये विधानसभा पोटनिवडणुकीचा नुकताच निकाल लागला. या निकालात काँग्रेसचे उमेदवार जितेश अंतापूरकर 41933 मतांच्या फरकाने विजय मिळवला. अंतापूरकर यांना एकूण 108840 मते मिळाली. तर भाजपचे उमेदवार सुभाष साबने यांना 66907 मते मिळाली. पराभव झाल्यानंतर साबने यांनी आम्हाला निकाल मान्य आहे. जनतेने दिलेला कौल आम्ही विनम्रपणे स्वीकारतो. तसेच काय चुका झाल्या यावर विचार करुन पुढच्या निवडणुकीसाठी जोमाने कामाला लागू असे साबने म्हणाले होते

इतर बातम्या :

Weather Forecast : कोकण, मराठवाडा ते दक्षिण महाराष्ट्रात जोरदार पाऊस, हवामान विभागाकडून अलर्ट जारी

एसटीच्या सरकारमधील विलिनीकरणाची मागणी मुख्यमंत्री, आघाडीच्या वरिष्ठांकडे मांडणार; दरेकरांच्या भेटीनंतर परबांचं आश्वासन

Jobs: ऐन दिवाळीत गोड बातमी, सिपेट प्रकल्प नाशिकमध्ये होणार; हजारो बेरोजगारांना नोकऱ्या मिळणार!

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.