दादरा नगर हवेलीवर सेनेचा भगवा, कलाबेन डेलकर यांची विजयी डरकाळी, शुभेच्छा देताना दरेकरांकडून टोले आणि टोमणे

दादरा नगर हवेलीच्या लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेने भगवा फडकवला. दिवंगत मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर यांनी भाजप उमेदवाराचा दणदणीत पराभव केला. दादरा नगर हवेलीच्या विजयासह शिवसेनेने प्रथमच महाराष्ट्राबाहेर लोकसभा जागा जिंकण्याची किमया केली.

दादरा नगर हवेलीवर सेनेचा भगवा, कलाबेन डेलकर यांची विजयी डरकाळी, शुभेच्छा देताना दरेकरांकडून टोले आणि टोमणे
प्रवीण दरेकर
Follow us
| Updated on: Nov 03, 2021 | 8:13 AM

मुंबई : दादरा नगर हवेलीच्या लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेने भगवा फडकवला. दिवंगत मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर यांनी भाजप उमेदवाराचा दणदणीत पराभव केला. दादरा नगर हवेलीच्या विजयासह शिवसेनेने प्रथमच महाराष्ट्राबाहेर लोकसभा जागा जिंकण्याची किमया केली. शिवसेनेच्या दैदिप्यमान विजयानंतर नेतेमंडळी सेना पक्षनेतृत्वाचं आणि खासदार संजय राऊत यांचं कौतुक करतायत, त्यांना शुभेच्छा देतायत. महाराष्ट्राबाहेर शिवसेनेचा पहिला खासदार निवडून आलाय. आम्हाला आनंद आहे, दु:ख असण्याचं काहीच कारण नाही, असं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले. पण या शुभेच्छांबरोबरच त्यांनी सेनेला चिमटेही काढले आहेत, तसंच टोलेही लगावले.

शिवसेनेचं दिवाळीला सीमोल्लंघन

दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांनी फेब्रुवारी महिन्यात मुंबईतील मरीन ड्राईव्ह लगतच्या एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं होतं. त्यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर 30 ऑक्टोबर रोजी मतदान पार पडलं तर काल मतमोजणीही झाली. या निवडणुकीत सेनेच्या कलाबेन डेलकर यांनी भाजपच्या महेश गावीत यांचा 51 हजार मतांनी पराभव केला.

महाराष्ट्राबाहेर शिवसेनेचा पहिला खासदार विजयी झाल्याने साहजिक या विजयाची देशभर चर्चा आहे. अनेक राजकीय पक्षाचे नेते शिवसेनेला शुभेच्छा देतायत. इकडे महाराष्ट्रातील विरोधी पक्ष भाजपनेही शिवसेनेला सीमोल्लंघनाच्या शुभेच्छा दिल्या. प्रवीण दरेकर यांनी शुभेच्छा देताना मात्र जोरदार फटकेबाजी केली.

प्रवीण दरेकर यांची टोलेबाजी

“शिवसेनेच्या कामगिरीसाठी आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. आम्हाला दु:ख वाटण्याचं कारण नाही, आम्हाला आनंदच आहे. महाविकास आघाडी सरकार स्थापन करताना शिवसेनेने मराठी अस्मिता, हिंदुत्व हे सगळं गुंडाळून ठेवलं. ज्यांनी आयुष्यभर हिंदुत्वाला विरोध केला, मराठी अस्मितेला विरोध केला, स्वाभिमानाला विरोध केला त्यांच्याशीच सेनेने हातमिळवणी केली. दादरा नगर हवेलीची जागा जिंकल्याने सेना जर राष्ट्रीय राजकारणात जाणार असेल तर त्यांना आमच्या शुभेच्छा…!”

सहानुभूतीची लाट, प्रचाराचा अजेंडा आणि अचूक नियोजन

मोहन डेलकर यांच्या निधनामुळे येथील मतदारांच्या मनात सहानुभूतीची लाट होती. मात्र, भाजपने या निवडणुकीला पक्षीय रंग दिला. महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी तळ ठोकून होते. तर शिवसेनेकडून संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांनी कलाबेन यांच्यासाठी प्रचार केला. त्यामुळे फडणवीसांचा संपूर्ण रोख शिवसेनेवर टीका करण्याचा राहिला. परिणामी भाजपचा संपूर्ण प्रचार भरकटला आणि नेमकं तेच कलाबेन यांच्या पथ्यावर पडलं. शिवसेनेनेही भाजपवर टीका केली. पण कलाबेन यांनी पक्षावर टीका करण्याऐवजी त्यांच्यावर झालेला अन्याय लोकांपुढे मांडण्यावर जोर दिला. त्याचा त्यांना फायदा झाल्याचंही राजकीय निरीक्षकांचं म्हणणं आहे.

Pravin Darekar Reaction On Dadra Nagar haveli Loksabha bypoll Election Shivsena Kalaben Delkar Won

हे ही वाचा :

दादरा नगरमध्ये भाजप का हरली?, कलाबेन डेलकरांच्या विजयामागचं कारण काय?; शिवसेनेला बळ मिळणार?

देगलूरच्या विजयानंतर अशोक चव्हाण यांना थेट सोनिया गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरेंचा फोन; करेक्ट कार्यक्रमामुळे अभिनंदनाचा वर्षाव!

By Election 2021 Result : 13 राज्यात विधानसभेच्या 29 जागांसाठी पोटनिवडणुका, कोणाचा विजय कोण पराभूत ? पूर्ण यादी

Subhash Sabne | पराभवानंतर सुभाष साबने यांचे मोठे विधान, शिवसैनिकांच्या नाराजीवर म्हणाले…

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.