AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Narendra Modi TV9 Interview : नरेंद्र मोदींची पहिली रोखठोक मुलाखत, पंतप्रधानांनी सांगितला 2014, 2019 आणि 2024 च्या निवडणुकीतला फरक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी TV9 ला एक्सक्लूझिव्ह मुलाखत दिलीय. या मुलाखतीत त्यांनी देश आणि राज्यातील विविध राजकीय घडामोडींवर अतिशय रोखठोकपणे उत्तरे दिली आहे. मोदींनी काही प्रश्नांवर अतिशय मार्मिक तर काही प्रश्नांचं उत्तर देताना मोदी स्वत: भावनिक झाले आहेत.

Narendra Modi TV9 Interview : नरेंद्र मोदींची पहिली रोखठोक मुलाखत, पंतप्रधानांनी सांगितला 2014, 2019 आणि 2024 च्या निवडणुकीतला फरक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘टीव्ही 9 मराठी’चे व्यवस्थापकीय संपादक उमेश कुमावत यांच्यासह TV9 ग्रुपच्या पाच व्यवस्थापकीय संपादकांना एक्सक्लूझिव्ह मुलाखत दिलीय
| Updated on: May 02, 2024 | 9:34 PM
Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्वात मोठं न्यूज नेटवर्क TV9 ला एक्सक्लूझिव्ह मुलाखत दिलीय. ‘टीव्ही 9 मराठी’चे व्यवस्थापकीय संपादक उमेश कुमावत यांच्यासह TV9 ग्रुपच्या पाच व्यवस्थापकीय संपादकांनी ही मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 2014 ची लोकसभा निवडणूक, 2019 ची आणि 2024 ची लोकसभा निवडणूक या तीन निवडणुकांमध्ये नेमका फरक काय वाटतो? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर मोदींनी सविस्तर प्रतिक्रिया दिली. “पहिली गोष्ट म्हणजे निवडणूक माझ्यासाठी नवीन नाही. मी अनेक वर्षापासून संघटनेत राहून निवडणूक लढवण्याचं काम केलं. त्यानंतर माझ्यावर आयुष्यात पहिल्यांदा गुजरातमधून निवडणूक लढवण्याची वेळ आली. आता मी आणखी एका वेगळ्या भूमिकेत आहे. देश आणि दुनियाच्या नजरेत एका विशेष जबाबदारीसह मी या निवडणुकीच्या मैदानात आहे”, अशी प्रतिक्रिया नरेंद्र मोदी यांनी दिली.

“२०१४च्या निवडणुकीत जेव्हा आम्ही मैदानात होतो, त्यावेळी लोकांच्या मनात अनेक प्रश्न होते. मोदी नवे आहेत. कोण आहेत? गुजराती बोलतात. पण लोकांच्या मनात आशा होती. २०१४मध्ये आशा होती. काही तरी करेल. जेव्हा २०१९च्या निवडणुकीत गेलो तेव्हा जी आशा होती, त्याचं विश्वासात रुपांतर झालं होतं आणि ते परिश्रम, परफॉर्मन्स, कन्सिस्टन्सी, क्लिअॅरिटी हे सर्व लोकांनी पाहिलं आणि विश्वास वाढला. २०१४ जे आशेने सुरू झालं होतं. विश्वासाच्या काळापर्यंत आलं होतं आता गॅरंटी झाली आहे”, असा दावा नरेंद्र मोदी यांनी केला.

‘देशाला मी सांगतोय येस… हे होऊ शकतं’

“२०२४ची निवडणूक.. देशाला मी सांगतोय येस… हे होऊ शकतं. कारण माझा दहा वर्षाचा अनुभव आहे. काय होऊ शकतं आणि काय होऊ शकत नाही. मला माहीत आहे. २०१४मध्ये मला सेवा करण्याची मोठी संधी होती. मी सेवाभावासाठी समर्पित केलं होतं. २०१९ला मी जेव्हा लोकांकडे गेलो. तेव्हा रिपोर्टकार्ड घेऊन गेलो. तेव्हा म्हटलं मी एवढं काम केलंय. तेव्हा, लोकांना वाटलं दिशा तर योग्य आहे. एवढ्या काळात एवढं करून दाखवलं म्हणजे अजून करेल. २०२४मध्ये आम्ही जात होतो. जी सामान्य माणसाची आवश्यकता आहे ती मी अड्रेस केली. आता त्यांच्या अपेक्षांना अड्रेस करायचं आहे. त्यांच्या एस्परेशन्सला अड्रेस करायचं आहे. आता मला एका नव्या उंचीवर घेऊन जायचं आहे”, असं नरेंद्र मोदींनी सांगितलं.

मोदींचा विरोधकांवर निशाणा

“२०१४च्या निवडणुकीत आमच्यासमोर जी आघाडी होती. ते सरकारमध्ये होते. त्यांच्याकडे सर्व सरकारी साधनं होती. सत्ता वाचवण्यासाठी ते प्रयत्नही करत होते. मी मुख्यमंत्री होतो, तर त्यांनी मला टार्गेटही करून ठेवलं होतं. अनेक संकटाच्या काळातून आम्ही निघून जनतेच्या आशीर्वादाने पुढे आलो. अजून पुढे जाऊ असं मला वाटतं”, अशी प्रतिक्रिया नरेंद्र मोदींनी दिली.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.