काँग्रेसचा पराभव का झाला? धन्यवाद प्रस्तावात नरेंद्र मोदींनीच सांगून टाकलं कारण! वाचा काय म्हणाले

PM Modi Speech in Parliament : मोदी म्हणालेत की, नागालँडच्या लोकांनी 1988मध्ये काँग्रेसला मत दिलं होतं. त्याला आता 24 वर्ष झालं आहे. ओडिसाने 1995मध्ये तुम्हाला मत दिलं होतं. त्यालाही 27 वर्ष झाले आहे. अजूनही ओडिसात तुमची एन्ट्री झाली नाही.

काँग्रेसचा पराभव का झाला? धन्यवाद प्रस्तावात नरेंद्र मोदींनीच सांगून टाकलं कारण! वाचा काय म्हणाले
नरेंद्र मोदी यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
Follow us
| Updated on: Feb 07, 2022 | 6:29 PM

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी धन्यवाद प्रस्ताव सोमवारी लोकसभेत सादर करताना विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी विरोधकांना तिखट शब्दांत सुनावलंय. मोदींची काँग्रेसच्या पराभवाची नेमकी कारणं काय आहेत, हे ही स्पष्ट शब्दांत सांगितलं. काँग्रेसमधील अनेकांची मानसिकता ही अजूनही 2014 मध्येच अडकली असल्याचा टोला मोदींनी यावेळी लगावला. कोणत्या राज्यातील लोकांनी काँग्रेस (Indian National Congress) सरकारप्रती किती आत्मीयता दाखवली आणि त्यांना का नाकारलं, याची थेट आकडेवारीच मोदींनी यावेळी आपल्या भाषणात वाचून दाखवली. जनतेमध्ये न मिसळलं, चुकीचा मानसिकता, लोकांचे प्रश्न समजून न घेणं, यावरुन त्यांनी काँग्रेसवर हल्लाबोल चढवला. काही राज्यांचा थेट उल्लेख करत मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला आणि सडकून टीका केली.

काँग्रेसच्या परभवाचा पाढा

देशभरातील निवडणुकांमध्ये होत असलेल्या काँग्रेसच्या पराभवाचा पाढाच वाचला. तुम्हाला लोकांची नस माहीत असती, तुम्ही जनतेत मिसळले असते तर तुम्हाला या गोष्टी कळल्या असत्या, असा सल्ला मोदींनी यावेळी दिला. तुमच्यापैकी अनेक लोकांचे सुई-काटे 2014मध्ये अडकलेले आहेत, अस म्हणत मोदींनी काँग्रेस नेत्यांना चिमटा काढलाय. 2014तून तुम्ही बाहेर पडत नाहीत. तुम्ही स्वत:ला एका मानसिक अवस्थेत अडकवून ठेवलं आहे. लोकांनी तुम्हाला ओळखलं आहे. काही आता ओळखत आहेत. तर काही भविष्यात ओळखतील, असं म्हणत मोदींनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडलंय.

परभवाची आकडेवारी

लोकसभेत मोदींनी काँग्रेसच्या निवडणुकांमधील कामगिरीची आकडेवारीच सादर केली. त्यांनी म्हटलंय की,…

नागालँडच्या लोकांनी 1988मध्ये काँग्रेसला मत दिलं होतं. त्याला आता 24 वर्ष झालं आहे. ओडिसाने 1995मध्ये तुम्हाला मत दिलं होतं. त्यालाही 27 वर्ष झाले आहे. अजूनही ओडिसात तुमची एन्ट्री झाली नाही. गोव्यात 1994मध्ये तुम्हाला पूर्ण बहुमत मिळालं होतं. 28 वर्ष झाली गोव्याने तुम्हाला स्वीकारलं नाही. 1988 त्रिपुराने मत दिलं होतं. 34 वर्षापूर्वी. अजूनही तिथे तुम्ही सत्तेत नाहीत. यूपी, बिहार आणि गुजरातमध्ये काँग्रेसचे हाल आहेत. म्हणजे शेवटी 1995मध्ये 37 वर्षापूर्वी मतदान केलं होतं. पश्चिम बंगालमध्ये 1972मध्ये म्हणजे 50 वर्षापूर्वी मतदान केलं होतं. तामिळनाडूच्या लोकांनी 1962 म्हणजे 60 वर्षापूर्वी संधी दिली होती. तेलंगना बनविण्यचां श्रेय घेता पण त्यांनीही तुम्हाला संधी दिली नाही. झारखंडचा जन्म झाला 20 वर्ष झाले. त्यांनीही पूर्णरुपने तुम्हाला स्वीकारलं नाही. तिथे मागच्या दरवाजाने तुम्ही सत्तेत असतात.

कृषी, कोरोना, गरिबी, भ्रष्टाचार, अर्थकारण, या सगळ्यावर मोदींनी विरोधकांवर हल्लाबोल करत त्यांना चिमटे काढलेत. आता मोदींच्या वक्तव्यांना विरोधक काय उत्तर देतात, हे पाहणंही महत्त्वाचंय. मोदींच्या भाषणावेळी वेळोवेळी विरोधकांनी त्यांना प्रत्युत्तर देत गोंधळ घालण्याचाही प्रयत्न केला. मात्र मोदींनी विरोधकांना न जुमानता आपला मुद्दा आक्रमकपणे मांडत विरोधकांवर निशाणा साधलाय.

पाहा मोदींचं संपूर्ण भाषण अनकट

संबंधित बातम्या :

मोदींच्या डोळ्यात डोळे घालून आदित्य ठाकरेंचा संवाद, राज्यपालांची नजर खाली! नेमकी काय चर्चा?

अमेरिकेला जाण्याआधी मोदी फोन करतात आणि लतादीदींना म्हणतात, ‘हॅलो, मैने फोन किया क्यूंकी…’

Modi | ‘आपका प्यार अजरामर रहे’ असं मोदींनी म्हटलं आणि एकच हशा पिकला! नेमकं घडलं काय?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.