AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विधानसभा निवडणुकीवेळी आयोगाकडून भाजपच्या IT सेलचा वापर, पृथ्वीराज चव्हाणांचा गंभीर आरोप

भारतीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रात 2019 च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान सोशल मीडियाचे कंत्राट भाजपच्या एका पदाधिकाऱ्याला दिल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे (Prithviraj Chavan allegations).

विधानसभा निवडणुकीवेळी आयोगाकडून भाजपच्या IT सेलचा वापर, पृथ्वीराज चव्हाणांचा गंभीर आरोप
| Updated on: Jul 24, 2020 | 3:33 PM
Share

मुंबई : भारतीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रात 2019 च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान सोशल मीडियाचे कंत्राट भाजपच्या एका पदाधिकाऱ्याला दिल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे (Prithviraj Chavan allegations). विशेष म्हणजे तो पदाधिकारी भाजपचा आयटी सेलचा राष्ट्रीय संयोजक होता, असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. याप्रकरणी भारतीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्याची माहिती चव्हाण यांनी दिली (Prithviraj Chavan allegations).

“याप्रकरणाची सखोल चौकशी व्हायला हवी. महाराष्ट्राच्या निवडणूक आयुक्तांनी 2019 सालाच्या निवडणुकीवेळी कुणाच्या दबावाखाली भाजपच्या पदाधिकाऱ्याच्या कंपनीला कंत्राट दिलं? त्यांच्यावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे कोणताही राजकीय दबाव होता का? त्यावेळी निवडणूक आयुक्त कोण होते? त्यांना कोणी नेमले होते? या सर्व गोष्टींची सखोल चौकशी व्हायला हवी. भारतीय संविधानानुसार ज्या संस्था उभ्या आहेत त्यांचा गैरवापर भाजपने केला”, असा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

पृथ्वीराज चव्हाण नेमकं काय म्हणाले?

२०१९ सालच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीदरम्यान भारतीय निवडणूक आयोगाचे सोशल मीडियावरील फेसबुक पेज हाताळणारी कंपनी भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्याची असल्याचं समोर आलं आहे. संबंधित व्यक्ती भारतीय जनता पक्षाच्या आयटी सेलचा राष्ट्रीय संयोजक होता. निवडणूक आयोगाने निष्पक्ष संस्था म्हणून काम करणं अपेक्षित आहे. पण हा प्रकार लोकशाहीमधील मुलभूत तत्त्वांना धक्का पोहचवणारा आहे.

महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी फेसबुकवर निवडणुकीबाबत जनजागृती करण्यासाठी Chief Electoral Officer Maharashtra या नावाने पेज सुरु केले होते. या पेजवर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक संदर्भात अनेक जाहिराती देण्यात आल्या होत्या. हे पेज तयार करताना वापरकर्त्याने “२०२ प्रेसमन हाऊस, विलेपार्ले, मुंबई” असा पत्ता दिला होता. हा पत्ता कोणाचा आहे याबाबत आम्ही शोध घेतला असता धक्कादायक माहिती समोर आली.

फडणवीस सरकारने सरकारच्या प्रसिद्धीच्या जाहिरातीचे काम “साईनपोस्ट इंडिया’ नावाच्या एका जाहिरात कंपनीस दिले होते. उपरोक्त पत्ता या साईन पोस्ट कंपनीचा आहे. हाच पत्ता ‘सोशल सेंट्रल’ नावाच्या डिजिटल एजन्सीद्वारेदेखील वापरला गेला आहे. ही कंपनी देवांग दवे याच्या नावावर असून तो भाजपच्या यूथ विंगच्या (BJYM) आयटी आणि सोशल मीडियाचा राष्ट्रीय संयोजक आहे.

देवांग दवेच्या वेबसाईटवर त्याच्या कंपनीच्या ग्राहकांची यादी आहे. त्यानुसार त्याची कंपनी ‘द फियरलेस इंडियन’, ‘सपोर्ट नरेंद्र मोदीं’ इत्यादी पेजेसची फाउंडर असल्याचं समोर आलं आहे. ही पेजेस भाजपाचा प्रचार करणारी असून विरोधी विचारसरणीच्या लोकांबद्दल या पेजेसवरुन द्वेष पसरवला जातो. त्याशिवाय इतरही काही सरकारी विभागांचे काम त्याच्या एजन्सीकडून केलं असल्याचं त्याच्या वेबसाईटवरुन समोर येतं.

घटनेच्या कलम 324 अनुसार निवडणुकांबाबतचे अधीक्षण, निर्देशन आणि नियंत्रण हे निवडणूक आयोगाकडे आहे. निवडणुका निष्पक्ष आणि निर्धोक वातावरणात पार पाडणे हे निवडणूक आयोगाचे कर्तव्य आहे. पण या प्रकारावरुन असे निदर्शनास येत आहे की, महाराष्ट्र निवडणूक आयोग आपले कर्तव्य पार पाडण्यास कमी पडत आहे. या प्रकरणाची तातडीने सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी विनंती मी देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना केली आहे.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.