लखनौमध्ये प्रियांका गांधींच्या रोड शोला तुफान गर्दी
लखनौ :पूर्व उत्तर प्रदेशच्या सरचिटणीसपदाची धुरा स्वीकारल्यानंतर प्रियांका गांधी या पहिल्यांदाच उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आल्या होत्या. प्रियांका गांधी यांच्या सक्रीय राजकारणात प्रवेश करण्याची घोषणा झाल्यानंतर देशभरातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वारे वाहू लागले आहे. त्यातच लोकसभा आणि विधानभेतील जागांच्या दृष्टीने देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये प्रियांका गांधी यांच्या आगमनामुळे पक्षाला गतवैभव मिळेल, अशी काँग्रेसला […]
लखनौ :पूर्व उत्तर प्रदेशच्या सरचिटणीसपदाची धुरा स्वीकारल्यानंतर प्रियांका गांधी या पहिल्यांदाच उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आल्या होत्या. प्रियांका गांधी यांच्या सक्रीय राजकारणात प्रवेश करण्याची घोषणा झाल्यानंतर देशभरातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वारे वाहू लागले आहे. त्यातच लोकसभा आणि विधानभेतील जागांच्या दृष्टीने देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये प्रियांका गांधी यांच्या आगमनामुळे पक्षाला गतवैभव मिळेल, अशी काँग्रेसला अपेक्षा आहे. आज प्रियांका गांधी यांच्या लखनौ येथे झालेल्या रोड शोला मोठा प्रतिसाद मिळाला.
Congress President @RahulGandhi GS Incharges UP East & West @priyankagandhi & @JM_Scindia greet the thousands of well wishers gathered along the path of their roadshow in Lucknow. #NayiUmeedNayaDesh pic.twitter.com/BvDyDjLSAX
— Congress (@INCIndia) February 11, 2019
LIVE UPDATES :
- प्रियांका गांधींच्या रोड शोला तुफान प्रतिसाद, लखनौमधील रस्ते काँग्रेस कार्यकर्त्यांनी तुडूंब भरले
- VIDEO :
#WATCH Congress General Secretary for Uttar Pradesh East Priyanka Gandhi Vadra, General Secretary for Uttar Pradesh West Jyotiraditya Scindia and party President Rahul Gandhi, hold roadshow in Lucknow. pic.twitter.com/ipMSlxaJyD
— ANI UP (@ANINewsUP) February 11, 2019
- लखनौमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांची तुफान गर्दी
- लखनौमध्ये काँग्रेसच्या रोड शोला सुरुवात, राहुल गांधी, प्रियांका गांधी, ज्योतिरादित्य शिंदे यांचा रोड शोमध्ये सहभाग
- राहुल गांधी, प्रियांका गांधी, ज्योतिरादित्य शिंदे यांचं लखनौमध्ये जंगी स्वागत
- ‘आ गई बदलाव की आँधी, राहुल संग प्रियांका गांधी’ अशा कार्यकर्त्यांच्या घोषणा
- प्रियांका गांधी, राहुल गांधी, ज्योतिरादित्य शिंदे लखनौमध्ये पोहोचले