महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजलं, पुण्याची प्रभागरचना 1 फेब्रुवारीला तर नागपूरचा निर्णय लवकरच

राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकांचे (Municipal Corporation Election) बिगुल वाजलं आहे. पुणे (Pune) आणि नागपूर (Nagpur) महानगरपालिकेची प्रभाग रचना पुढच्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता असल्याची माहिती आहे.

महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजलं, पुण्याची प्रभागरचना 1 फेब्रुवारीला तर नागपूरचा निर्णय लवकरच
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Jan 30, 2022 | 9:10 AM

पुणे : राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकांचे (Municipal Corporation Election) बिगुल वाजलं आहे. पुणे (Pune) आणि नागपूर (Nagpur) महानगरपालिकेची प्रभाग रचना पुढच्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता असल्याची माहिती आहे. पुणे महानगरपालिकेची प्रभागरचना 1 फेब्रुवारी रोजी जाहीर होणार असून त्यावरील अंतिम निर्णय हा 2 मार्चला होणार आहे. तर, नागपूर महापालिकेचे प्रभाग रचना ही सोमवारपर्यंत निश्चित होण्याची शक्यता आहे. प्रभाग रचना अंतिम होत असल्याने राजकीय पक्षांचे लक्ष या सर्व प्रक्रियेकडे लागलेलं आहे. सर्व राजकीय पक्ष महापालिका निवडणुकांच्या तयारीला लागले आहेत. प्रभाग रचनेनंतर आरक्षणाची सोडत जाहीर होणार असल्याचं राज्य निवडणूक आयोगानं कळवलेलं आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात जाहीर होणारी प्रभाग रचना राजकीय पक्षांची पुढची रणनीती ठरवण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. यावेळी प्रभाग रचनेत बदल झाल्यामुळे पुणे आणि नागपूर महापालिकेत सत्तांतर होणार का हेदेखील पाहावे लागेल

पुण्याची प्रभाग रचना 1 फेब्रुवारीला जाहीर होणार

अखेर पुणे महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रभाग रचनेचे बिगुल वाजले आहे. 1 फेब्रुवारीला पुण्यातील प्रभाग रचना जाहीर होणार आहे. 2 मार्चला प्रभाग रचनेवर अंतिम निर्णय होणार आहे. प्रभागरचनेकडे पुण्यातील सर्वपक्षीय इच्छुकांच्या नजरा लागल्या होत्या. महापालिकेने 20 जानेवारीला निवडणूक आयोगाला 24 बदलासह सुधारित आराखडा आयोगाला सादर केला होता.

नागपूरमध्ये नगरसेवक वाढणार

नागपूर महापालिकेची प्रभाग रचना सोमवार पर्यंत निश्चित होण्याची शक्यता आहे. निवडणूक जवळ येत असल्याने प्रत्येक पक्षाचं प्रभाग रचने कडे लक्ष लागलं आहे. प्रभाग रचनेत काय बदल होणार याविषयी उत्सुकता राजकीय पक्षांना लागली आहे. चार ऐवजी तीन सदस्यांचा प्रभाग झाल्याने प्रभागांची रचना बदलणार आहे. या वेळी वाढलेली लोकसंख्या बघता 151 ऐवजी 156 जागांवर निवडणूक होणार असल्याची माहिती आहे. नागपूरमध्ये 52 प्रभाग राहतील. महापालिका निवडणुकीच्यांदृष्टीने राजकीय आराखडा रंगणार आहे. नागपूरमध्ये भाजप सत्तेत आहे. तर, काँग्रेस विरोधी पक्षेत आहे.

इतर बातम्या:

Prakash Ambedkar : टिपू सुलतानच्या मुद्यावर भाजप तोंडघशी पडलंय, पेगाससवरुन ही प्रकाश आंबेडकरांचं टीकास्त्र

‘दे दना दन’! डेव्हिड धवननंतर सर्वाधिक सिनेमांचं दिग्दर्शन करणारा अवलिया; वाचा प्रियदर्शनचा फिल्मी प्रवास!

Pune and Nagpur Municipal Corporation Election wards will declare in next week

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.