AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, झेपत नसेल तर राजीनामा द्या, महापौर मोहोळ म्हणाले, ‘तुमचं पुण्यात येणं कमी झालंय, तेव्हा…’

महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सुप्रिया सुळे यांना सडेतोड प्रत्युत्तर दिलंय. मला सल्ला देण्याऐवजी स्वत: आत्मपरीक्षण करावं, असं मोहोळ म्हणाले. (Pune Mayor Murlidhar Mohol Answer NCP MP Supriya Sule)

सुप्रिया सुळे म्हणाल्या, झेपत नसेल तर राजीनामा द्या, महापौर मोहोळ म्हणाले, 'तुमचं पुण्यात येणं कमी झालंय, तेव्हा...'
मुरलीधर मोहोळ आणि सुप्रिया सुळे
| Edited By: | Updated on: Jun 25, 2021 | 2:02 PM
Share

पुणे :  पुण्यातील आंबील ओढ्यालगत (Ambil Odha Pune) असलेल्या घरांवर काल पुणे महानगरपालिकेने (Pune Municipal Carporation) कोणताही विचार न करता, सहानभूती न दाखवता बुलडोझर चालवला. महापालिकेच्या असंवेदनशील कृतीवर बोलताना राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) चांगल्याच भडकल्या. झेपत नसेल तर पुण्याच्या महापौरांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली. त्यावर महापौर मुरलीधर मोहोळ (murlidhar Mohol) यांनी सुप्रिया सुळे यांना सडेतोड प्रत्युत्तर दिलंय. मला सल्ला देण्याऐवजी स्वत: आत्मपरीक्षण करावं, असं मोहोळ म्हणाले. (Pune Mayor Murlidhar Mohol Answer NCP MP Supriya Sule over Ambil Odha Action)

सुप्रिया सुळेंचं पुण्यात येणं कमी झालंय

आंबिल ओढ्यालगतच्या घरांवर कोणाच्या दबावाखाली कारवाई करण्यात आली हे सर्वांना माहिती आहे. सुप्रिया सुळे यांचं पुण्यात येणं कमी झालेलं आहे. तेव्हा सुप्रिया सुळे यांनी माहिती घेऊन बोललं तर बरं होईल, असं महापौर मोहोळ म्हणाले.

राजीनाम्याच्या मागणीवर महापौरांचं सुप्रिया सुळेंना सडेतोड प्रत्युत्तर

झेपत नसेल तर पुण्याच्या महापौरांनी राजीनामा द्यावा, अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यावर निशाणा साधला होता. त्यांच्या टीकेला महापौर मोहोळ यांनी तडेतोड प्रत्युत्तर दिलंय. मला झेपत नसेल तर राजीनामा देण्याचा सल्ला देण्याऐवजी स्वतः आत्मपरीक्षण करावं, असं उत्तर मुरलीधर मोहोळ यांनी सुप्रिया सुळेंना दिलं.

सुप्रिया सुळे काय म्हणाल्या होत्या…?

आंबिल ओढ्यालगत असलेल्या घरांवर पुणे महापालिकेने (Pune Municipal corporation) केलेल्या कारवाईवरुन, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्लाबोल केला होता. पुण्याच्या महापौरांना झेपत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. त्या पुण्यात बोलत होत्या. “पुण्याच्या घटनेची चौकशी व्हावी. महापौरांनी उत्तर द्यावे. आंबिल ओढ्यावरील कारवाई कुणी केली हे सर्वांना माहिती आहे. पुणे महापालिकेत सत्ता कुणाची आहे तर भाजपची. त्यामुळे महापौरांना जर झेपत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

(Pune Mayor Murlidhar Mohol Answer NCP MP Supriya Sule over Ambil Odha Action)

संबंधित बातमी :

झेपत नसेल तर राजीनामा द्या, पुण्याच्या महापौरांवर सुप्रिया सुळे कडाडल्या

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.