Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘3 सदस्यीय प्रभाग जड जाणार, भाजपसोबत युती केल्यास फायदा’, मनसे नेत्याचं मोठं विधान

मुंबई वगळता अन्य महापालिकांमध्ये 3 सदस्यीय प्रभाग जाहीर झाल्यामुळे आम्हाला जड जाणार आहे. त्यामुळे भाजपसोबत युती झाली तर त्याचा फायदा होणार आहे. भाजपसोबत गेलो तर सत्तेत सहभागी होऊन शहराचा विकास करता येणार आहे, असं वसंत मोरे यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना म्हटलंय.

'3 सदस्यीय प्रभाग जड जाणार, भाजपसोबत युती केल्यास फायदा', मनसे नेत्याचं मोठं विधान
वसंत मोरे, मनसे, पुणे शहराध्यक्ष
Follow us
| Updated on: Sep 27, 2021 | 3:54 PM

पुणे : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात मोठ्या राजकीय घडामोडी पाहायला मिळत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पुणै दौऱ्यात मोठी वाढ झालीय. तसंच मनसे पदाधिकाऱ्यांमध्ये पुन्हा एकदा ऊर्जा निर्माण करण्याचं काम राज ठाकरे करत आहेत. अशावेळी पुण्यातील मनसे नेत्यांनी पुणे महापालिका निवडणुकीसाठी भाजपसोबत युती करावी, असा आग्रह धरला आहे. त्याबाबत पुण्यातील मनसेचे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी उघड प्रतिक्रिया दिली आहे. (MNS pune president Vasant More’s opinion to form an alliance with BJP)

मुंबई वगळता अन्य महापालिकांमध्ये 3 सदस्यीय प्रभाग जाहीर झाल्यामुळे आम्हाला जड जाणार आहे. त्यामुळे भाजपसोबत युती झाली तर त्याचा फायदा होणार आहे. भाजपसोबत गेलो तर सत्तेत सहभागी होऊन शहराचा विकास करता येणार आहे, असं वसंत मोरे यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना म्हटलंय. मात्र, भाजपसोबत युती करायची की नाही याबाबतचा अंतिम निर्णय हा राज ठाकरे घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. तसंच मनसे नेते अनिल शिरोदे आणि बाबू वागस्कर यांच्याशी याबाबत बोलणं झाल्याची माहितीही मोरे यांनी दिली आहे.

राज ठाकरे काय भूमिका घेणार?

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी नुकताच पुण्याचा दौरा केला होता. आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी पुण्यातील प्रभाग रचनेत बदल होण्याची शक्यता आहे. यादृष्टीने मनसेकडून अंतर्गत चाचपणी मोहीम सुरु आहे. यावेळी मनसे नेत्यांच्या एका गटाने आगामी निवडणुकीसाठी भाजपसोबत युती करावी, असा आग्रह धरला आहे. त्यामुळे आता राज ठाकरे काय भूमिका घेणार, हे पाहावे लागेल.

45 जागा निवडून येणारच, मनसेचा दावा

गेल्या निवडणुकीत प्रभाग रचनेमुळे पक्षाचे नगरसेवक कमी झाले असं मनसे नेते सांगतात. मात्र, शहरातील पक्ष संघटनेचा प्रभावही कमी झाला होता. आगामी 2022 च्या महापालिका निवडणुकीत मनसे सर्व जागा लढवणार आहे. त्यातील 90 जागांवर मनसेनं लक्ष केंद्रीत केल्याचं सांगतानाच 45 जागा निवडून येणारच असा दावा मनसेचे नेते करत आहेत.

मनसे पुणे मनपा स्वबळावर लढवणार का?

पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत इतर कोणत्याही राजकीय पक्षाशी युती करायची की नाही, हा निर्णय परिस्थिती पाहून घेऊ, असे सूचक वक्तव्य मनसेप्रमुख राज ठाकर यांनी केले होते. महापालिका निवडणुकीत मनसे ‘एकला चलो रे’ असणार का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर राज ठाकरे यांनी फार बोलण्याचे टाळले. त्यावेळची परिस्थिती पाहून निर्णय घेऊ, असे मोघम वक्तव्य त्यांनी केले. म्हटलं तर महापालिका निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. कार्यालयाची गरज होती म्हणून नवं कार्यालय सुरू करण्यात आलं आहे. अजून निवडणुकांना वेळ आहे. सर्वच निवडणुका पुढे ढकलल्या जात आहेत. शेड्युलप्रमाणे फेब्रुवारीत निवडणुका व्हायला पाहिजे, पण पुढे काय होईल माहीत नाही, असं सांगतानाच निवडणुकीची रणनीती काय असेल हे तुम्हाला का सांगू?, असा सवाल त्यांनी एका प्रश्नावर उत्तर देताना केला होता.

पुणे महापालिकेतील पक्षीय बलाबल

भाजप – 99 राष्ट्रवादी – 42 काँग्रेस – 10 सेना – 10 मनसे – 2 एमआयएम – 1 एकूण जागा – 164

इतर बातम्या :

VIDEO : संजय राऊतांची भरसभेत घोडे लावण्याची भाषा, एक्सपर्ट असल्याचंही वक्तव्य, नेमकं काय घडलं?

55 ला आमचा मुख्यमंत्री होतो तर मग 40-45 ला महापौर का नाही? जे राज्यात केलं तेच पुणे पिंपरी चिंचवडमध्ये करणार राऊत?

MNS pune president Vasant More’s opinion to form an alliance with BJP

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.