Sharad Pawar | का पवार पवार आहेत? रात्री सरकार बरखास्त, सकाळी मॅच बघायला गेले, वाचा संपूर्ण किस्सा

रात्रीतून सरकार बरखास्त झाल्याचं कळाल्यावर आपण किती संयमानं ती स्थिती हाताळली. पण भाजपाला (BJP) अद्याप ते जमत नाहीये. असा टोला लगावताना शरद पवार यांनी 1978 सालचा किस्सा सांगितला.

Sharad Pawar |  का पवार पवार आहेत? रात्री सरकार बरखास्त, सकाळी मॅच बघायला गेले, वाचा संपूर्ण किस्सा
Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 25, 2022 | 1:42 PM

मुंबईः सत्ता गेल्यामुळे भाजप नेते अस्वस्थ असून त्यातूनच महाराष्ट्रात राजकारण केलं जातंय, असा आरोप करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad awar) यांनी देवेंद्र फडणीसांचं (Devendra Fadanvis) नाव न घेता चांगलंच सुनावलं. सत्ता गेल्यानंतर सगळेच अस्वस्थ होतात. पण माझ्यासारखं सगळ्यानाच जमत नाही, असं सांगत शरद पवार यांनी 1978 सालीच आठवणदेखील सांगितली. त्यावेळी रात्रीतून सरकार बरखास्त झाल्याचं कळाल्यावर आपण किती संयमानं ती स्थिती हाताळली. पण भाजपाला (BJP) अद्याप ते जमत नाहीये. महाराष्ट्रातील स्थिती पाहता, इथं योग्य प्रकारचं वातावरण निर्माण करायला त्यांचीही मदत होईल, अशी अपेक्षा शरद पवार यांनी व्यक्त केली. पुण्यात आज शरद पवार यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरं दिली.

पवारांनी सांगितली आठवण…

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली जातेय, यावर बोलताना शरद पवार म्हणाले, ‘ 1978 साली माझं सरकार बरखास्त केलं, ही बातमी 12.30 वाजता मुख्य सचिवांनी सांगितली, 12.30 वाजता 3-4 इसमांना बोलवलं, दुसऱ्या जागी सामान हलवलं, सकाळी 7 वाजता दुसऱ्या जागी राहायला गेलो, सरकारची गादी सोडली, त्यादिवशी 10 वाजता इंडिया इंग्लडची मॅच होती, ती मॅच पाहायला मी वानखेडेवर गेलो. ती मॅच एन्जॉय केली, त्यावेळी सत्ता असली किंवा नसली तरी इतकं अस्वस्थ होण्याची गरज नाही. हल्ली काही लोक फार अवस्थ आहेत, आणि त्याला मी दोष देऊ शकत नाही. कारण निवडणुका होण्याच्या पूर्वीच मी येणार, येणार…या प्रकारच्या घोषणा त्यांनी केल्या, आणि ते घडू शकलं नाही, त्याच्यामुळे अवस्थता असते, पण अपेक्षा करुया, आमच्या या स्नेह्यांना सुद्धा या परिस्थितीत काय परिणाम होतात हे लक्षात येईल. आणि इथं योग्य वातावरण निर्माण करायला त्यांचंही सहकार्य लाभेल, असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं.

‘वीज संकटावर सोबत मार्ग काढू’

देशातील भारनियमनाच्या संकटावर बोलाताना शरद पवार म्हणाले, ‘ देशातल्या अनेक राज्यात विजेच्या क्रायसेस आहे, गुजरात, कर्नाटक, आंध्रमध्ये विजेची कमतरता, 2 कारणं, उष्णता जास्त, त्यामुळे विजेची डिमांड वाढते, काही गोष्टींची कमतरता आहे. आता केंद्र सरकार काय म्हणतं, राज्य सरकार काय म्हणतं, यामध्ये मी पडू इच्छित नाही, सगळ्यांनी सोबत बसून मार्ग काढला पाहिजे, आपले मुख्यमंत्री आपल्या वेळेपैकी बराच वेळ याला देत आहे, त्यामुळे यावर मार्ग निघेल, यंदा पाऊस चांगला असं भाकीत वर्तवलं आहे, तसंच राहिलं तर हे फारकाळ राहणार नाही.

इतरांच्या दारात हनुमानचालिका कशासाठी?

हनुमान चालिसावरून राणा दाम्पत्य आणि शिवसैनिक, पोलिसांमध्ये जो गोंधळ निर्माण झाला, त्यावर बोलताना शरद पवार म्हणाले, ‘ मुख्यमंत्र्यांवर धोरणात्मक टीका करण्याचा अधिकार प्रत्येकाचा आहे, पण त्यांचं एकेरी नाव घेऊन, त्यांच्यावर टीका करणं शोभत नाही. मुख्यमंत्री हे नाव नाही, एक संस्था आहे, त्यावर अशी टीका करणं योग्य नाही. कुणाला एखादा धार्मिक कार्यक्रम करायचा असेल तर तुमच्या निवासी करु शकता, पण तो कार्यक्रम माझ्या दारात तरी येऊन करतो म्हटलं तर माझ्या सहकाऱ्यांमध्ये अस्वस्थता झाली, तर त्याला दोष देता येणार नाही. बघू हे वातावरण आता निवळेल.. अशी अपेक्षा शरद पवार यांनी व्यक्त केली.

इतर बातम्या-

Video : छोटा पुष्पा!, “मै झुकुंगा नहीं साला…”, लहानग्याची निरागसता पाहून तुम्ही प्रेमात पडाल!

Tu Tevha Tashi: संदीप खरेंची मुलगी रुमानी म्हणतेय, “मनोरंजनक्षेत्राशी संबंधित पालक असतील तर..”

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.