अमरिंदर सिंह विरुद्ध सिद्धू, पंजाबमध्ये निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये घमासान, नेमका वाद काय?

Punjab Congress crisis : पुढील वर्षी होत असलेल्या पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी (Punjab Assembly election) अंतर्गत वाद मिटवण्याचं मोठं आव्हान काँग्रेस नेतृत्त्वासमोर आहे.

अमरिंदर सिंह विरुद्ध सिद्धू, पंजाबमध्ये निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये घमासान, नेमका वाद काय?
Amarinder Singh_Navjot Singh Sidhu
Follow us
| Updated on: Jun 04, 2021 | 3:45 PM

चंदीगढ/ नवी दिल्ली : पंजाब काँग्रेसमध्ये (Punjab Congress) अंतर्गत वादाने टोक गाठलं आहे. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह (Punjab CM captain Amarinder Singh) आणि नवज्योतसिंह सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांच्यात बेबनाव आहे. पुढील वर्षी होत असलेल्या पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी (Punjab Assembly election) अंतर्गत वाद मिटवण्याचं मोठं आव्हान काँग्रेस नेतृत्त्वासमोर आहे. त्यामुळेच तीन सदस्यीय समिती नेमून त्याबाबतचा अहवाल सादर करायचा आहे. ( Punjab Congress crisis)

पंजाबमधील बंडखोरी रोखण्यासाठी त्रिसूत्री फॉर्म्युला तयार करण्यात येत आहे. त्यानुसार दोन उपमुख्यमंत्री आणि नवा प्रदेशाध्यक्ष निवडण्यात येणार आहे. याशिवाय नवज्योतसिंह सिद्धू यांना प्रचार समिती प्रमुख बनवलं जाऊ शकतं.

नेमका वाद काय?

पंजाबमध्ये एकीकडे विधानसभा निवडणुकीची मोर्चेबांधणी होत असताना, काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. पंजाब काँग्रेस दोन गटात विभागली आहे. एक गट नवज्योत सिद्धू यांचा तर दुसरा मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांचा आहे. अमरिंदर सिंह यांना मुख्यमंत्रिपदावरुन हटवण्याची मागणी होत आहे. त्यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत अनेक आमदारांनी आवाज उठवला आहे.  हे प्रकरण इतकं वाढलं आहे की, काँग्रेसच्या केंद्रीय समितीला हस्तक्षेप करावा लागला.

दोन उपमुख्यमंत्री, एक SC समाजातील

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या निर्देशानुसार तीन सदस्यीय समितीने गुरुवारपर्यंत पंजाब काँग्रेसमधील जवळपास 100 नेत्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. आज या समितीने मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांची बाजू जाणून घेतली. त्यानंतर आता ही समिती आपला अंतिम अहवाल पक्षनेतृत्त्वाला पाठवणार आहे. सूत्रांच्या मते, या रिपोर्टमध्ये तीन प्रस्तावांची शिफारस केली जाऊ शकते. यानुसार कॅप्टन अमरिंदर सिंह यांची खुर्ची शाबूत राहील, मात्र त्यांच्याखाली दोन उपमुख्यमंत्र्यांची नियुक्ती होऊ शकते. ज्यामधील एक SC समाजातील असेल. याशिवाय नवा प्रदेशाध्यक्षही नियुक्त केला जाऊ शकतो.

दलित समाजाची नाराजी?

पंजाबमध्ये दलित समाज काँग्रेसपासून दुरावत असल्याचं चित्र आहे. पंजाबमध्ये 32 टक्के दलित समाज आहे. मात्र तिथे निर्णयप्रक्रियेत डावललं जात असल्याचा आरोप आहे. दुसरीकडे अकाली दल, भाजप आणि आम आदमी पक्षाने दलित मुख्यमंत्री आणि दलित उपमुख्यमंत्री असा प्रचार सुरु केला आहे. त्यामुळे काँग्रेसची डोकेदुखी वाढली आहे.

कॅप्टन अमरिंदर सिंह यांची भूमिका

मीडिया रिपोर्टनुसार, अमरिंदर सिंह यांनी उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षपद शीख समुदायाकडे देणं हे पक्षाला परवडणारं नाही हे आधीच कळवलं आहे. स्वत: मुख्यमंत्रीपद हे शीख समाजाकडे आहे, त्यामुळे अन्य पदे अन्य जातींकडे विभागायला हवी असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे राजकीय आणि सामाजिक समीकरण जुळवणं मोठं आव्हान आहे.

सिद्धू यांना कोणती जबाबदारी?

दरम्यान, नवज्योत सिंह सिद्धू यांना काँग्रेसकडून निवडणूक प्रचार प्रमुख हे पद दिलं जाऊ शकतं. 2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतर सिद्धूंनी पंजाब कॅबिनेटमधून राजीनामा दिला होता. तेव्हापासून त्यांच्याकडे कोणतंच पद नाही. त्यामुळे सिद्धू स्वत:च्या पक्षाला आणि सरकारला आरसा दाखवण्याचं काम करत आहेत. त्यामुळे पंजाब काँग्रेसमधील वादामागे सिद्धूंचाच हात असल्याचा आरोप अमरिंदरसिंह समर्थकांचा आहे.

वाद कसा शमणार?

मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांच्याविरोधात अनेक आमदारांनी आवाज उठवत कार्यशैलीवर बोट ठेवलं आहे. पंजाबमधील गुन्हेगारी, ड्रग्ज प्रकरणं, खाण माफियांवर कारवाई यासारख्या जाहीरनाम्यातील आश्वासनं पाळली नसल्याचा आरोप आहे. अशावेळी सिद्धू यांच्याकडे प्रचार समितीचं पद देऊन वादावर पडदा टाकला जाऊ शकतो.

संबंधित बातम्या 

पंजाब सरकार खासगी रुग्णालयांना वाढीव किमतीला लसी विकतंय, शिरोमणी अकाली दलाचा मोठा आरोप

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.