Fuel Prices in Maharashtra: राहुल गांधींनी मोदींना ‘अफगाणिस्तान’ दाखवला, भाजपच्या नेत्यांनी मग त्यांना ‘महाराष्ट्र’ दाखवला, पेट्रोल-डिझेल वॉर सुरु
इंधन दरवाढीवरुन काँग्रेस नेते राहूल गांधी यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसनं आंदोलन केलं. तर, राहुल गांधी यांनी महागाई आणि वाढत्या इंधन दरांवरुन नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) हल्ले सुरु ठेवले आहेत.
मुंबई : उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यातील विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीला सुरुवात झाली. गेल्या 10 दिवसात 9 वेळा पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. इंधन दरवाढीवरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसनं आंदोलन केलं. तर, राहुल गांधी यांनी महागाई आणि वाढत्या इंधन दरांवरुन नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) हल्ले सुरु ठेवले आहेत. आज राहुल गांधी यांनी भारताच्या शेजारील देशातील पेट्रोलचे भारतीय चलनातील दर आणि भारतातील दर यांची तुलना केली. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी अफगाणिस्तान, पाकिस्तान, श्रीलंका, बांग्लादेश, भुतान, नेपाळ आणि भारतातील पेट्रोलच्या दरातील फरक ट्विटरवर मांडला आहे. तर, राहुल गांधी यांच्या ट्विटला भाजप आयटी सेलचे अमित मालवीय यांनी उत्तर दिलं आहे. अमित मालवीय (Amit Malviya) यांनी महाराष्ट्रात काँग्रेसच्या पाठिंब्यावरील सरकारनं पेट्रोलवरी व्हॅट कमी केला नसल्याचं दाखवून दिलं. तर, राजस्थानमध्येही विक्रीकर जादा असल्याचं मालवीय यांनी म्हटलंय.
राहुल गांधी यांचं ट्विट
Petrol Rate in Indian Rupees (₹)
Afghanistan: 66.99 Pakistan: 62.38 Sri Lanka: 72.96 Bangladesh: 78.53 Bhutan: 86.28 Nepal: 97.05 India: 101.81
प्रश्न न पूछो ‘फ़क़ीर’ से, कैमरा पर बाँटे ज्ञान। जुमलों से भरा झोला लेकर, लूटे हिंदुस्तान॥#MehangaiMuktBharat
— Rahul Gandhi (@RahulGandhi) March 31, 2022
राहुल गांधी यांनी शेजारच्या देशांमधील पेट्रोलचे दर सांगितले
राहुल गांधी यांनी अफगाणिस्तानात पेट्रोल 66.99, पाकिस्तानात 62.38, श्रीलंका 72.96, बांग्लादेश 78.53, भुतान 86.28, नेपाळ 97.05 आणि भारतात पेट्रोल 101.81 रुपये लीटरनं विकलं जात असल्याचं स्पष्ट केलं. तर, राहुल गांधी यांनी “प्रश्न न पूछो ‘फ़क़ीर’ से, कैमरा पर बाँटे ज्ञान । जुमलों से भरा झोला लेकर, लूटे हिंदुस्तान॥” या ओळी ट्विटरवर शेअर करुन टीका केली आहे.
अमित मालवीय यांचं राहुल गांधींना उत्तर
भाजप आयटी सेलचे अमित मालवीय यांनी राहुल गांधी यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना महाराष्ट्र आणि राजस्थानचा दाखला दिला आहे. काँग्रेसची सत्ता असलेल्या महाराष्ट्र आणि राजस्थानात सर्वाधिक दरानं पेट्रोल आणि डिझेल विकलं जातंय. यूपीएचं सरकार असताना त्यावेळी एलपीजी महाग विकला जात होता. मात्र, सध्या यूक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धामुळं आंतरराष्ट्रीय बाजारात क्रुड आईलच्या किमती वाढल्या असताना राहुल गांधी आंदोलन करत आहेत, असं अमित मालवीय म्हणाले आहेत.
अमित मालवीय यांचं ट्विट
Congress ruled Maharashtra and Rajasthan have the highest fuel prices. LPG was far more expensive when UPA was in power than it has ever been in the last 8 years. But Rahul Gandhi is protesting against fuel prices when crude has shot up world over because of Ukraine-Russia war… https://t.co/ab1axOswHe
— Amit Malviya (@amitmalviya) March 31, 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच राज्यांच्या निवडणुकांपूर्वी पेट्रोल आणि डिझेलवर कर कमी करण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानंतर भाजपशासीत राज्य सरकारांनी देखील पेट्रोल आणि डिझेलवरील विक्रीकर कमी केले होते.
इतर बातम्या :
MS Dhoni : एमएस धोनीचे आदर्श कोण?, धोनी कुणाला प्रेरणास्थान मानतो, वाचा धोनीविषयी काही खास गोष्टी