खासदार राहुल शेवाळे यांच्या पत्नी खंबीरपणे पाठीशी, ‘महिलेचा आरोप म्हणजे प्रतिमा मलिन प्रकरणाचा प्रयत्न’

सामाजिक आणि राजकीय जीवनात गेल्या 25 वर्षांहून जास्त काळ कार्यरत असणाऱ्या लोकप्रतीनिधीची प्रतिमा जाणीवपूर्वक मलिन करण्याचे हे षडयंत्र आहे, असा आरोप कामिनी शेवाळे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे त्या महिलेवर केलाय.

खासदार राहुल शेवाळे यांच्या पत्नी खंबीरपणे पाठीशी, 'महिलेचा आरोप म्हणजे प्रतिमा मलिन प्रकरणाचा प्रयत्न'
राहुल शेवाळे, कामिनी शेवाळेImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Jul 19, 2022 | 3:40 PM

मुंबई : एकनाथ शिंदे गटाचे लोकसभेतील गटनेते आणि खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी एका महिलेनं राहुल शेवाळे यांच्याविरोधात बलात्काराचा आरोप केला होता. त्या महिलेनं आता थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना पत्र लिहिलं आहे. संबंधित महिलेनं मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आपल्याला न्याय मिळावा अशी मागणी केलीय. इतकंच नाही तर माझी विनंती ऐकली नाही आणि पोलिसांनी गुन्हा नोंदवला नाही तर आपल्यासमोर आयुष्य संपवण्याशिवायी पर्याय नसल्याचा इशाराही त्या महिलेनं पत्राद्वारे दिला आहे. अशावेळी राहुल शेवाळे यांच्या पत्नी कामिनी शेवाळे (Kamini Shewale) या ठामपणे पतीच्या मागे उभ्या असल्याचं पाहायला मिळतंय. सामाजिक आणि राजकीय जीवनात गेल्या 25 वर्षांहून जास्त काळ कार्यरत असणाऱ्या लोकप्रतीनिधीची प्रतिमा जाणीवपूर्वक मलिन करण्याचे हे षडयंत्र आहे, असा आरोप कामिनी शेवाळे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे त्या महिलेवर केलाय.

‘लोकप्रतीनिधीची प्रतिमा जाणीवपूर्वक मलिन करण्याचे षडयंत्र’

खासदार राहुल शेवाळे यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन जे आरोप सुरू आहेत, ते पूर्णतः निराधार आहेत. सामाजिक आणि राजकीय जीवनात गेल्या 25 वर्षांहून जास्त काळ कार्यरत असणाऱ्या लोकप्रतीनिधीची प्रतिमा जाणीवपूर्वक मलिन करण्याचे हे षडयंत्र आहे. सदर महिला गेल्या काही महिन्यांपासून खासदार राहुल शेवाळे आणि आमच्या कुटुंबीयांना धमक्या देत असून याविरोधात आम्ही माननीय अंधेरी महानगर दंडाधिकारी यांच्या न्यायालयात रितसर तक्रार दाखल होती. याची दखल घेऊन 11 जुलै 2022 रोजी सदर महीलेविरोधात मुंबईच्या साकीनाका पोलीस ठाण्यात FIR नोंदविण्यात आली आहे. यानुसार सदर महिलेविरोधात लवकरच योग्य ती कारवाई पोलिसांकडून केली जाईल, याचा आम्हाला विश्वास आहे, असं कामिनी शेवाळे यांनी म्हटलंय.

कामिनी शेवाळेंचा महिलेवर आरोप

सदर महिलेने गेल्या काही महिन्यांपासून मला आणि माझ्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देखील दिली होती. खंडणी वसूल करण्याच्या इराद्याने धमकावणे, प्रतिष्ठित व्यक्तीची प्रतिमा मलिन करणे यासाठी सदर महीले विरोधात शारजा, दुबई येथे देखील काही महिन्यांपूर्वी गुन्हा नोंदविण्यात आला होता आणि तिला सुमारे 80 दिवसांचा तुरुंगवास देखील भोगावा लागला होता. तसेच सदर महिलेच्या कुटुंबाची पार्श्वभूमी देखील गुन्हेगारी स्वरूपाची आहे. एका महिलेचा बलात्कार करून खून केल्याप्रकरणी सदर महिलेचा भाऊ दिल्लीतील तुरुंगात शिक्षा भोगत असल्याची देखील माहिती आहे.

आमची बाजू देखील मांडली जाईल

प्रसिद्धी माध्यमांना मी नम्र विनंती करते की, खासदार राहुल शेवाळे यांची राजकीय आणि सामजिक प्रतिष्ठा मलिन करण्यासाठी जाणीवपूर्वक रचले गेलेले हे षडयंत्र असून हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने याबाबतच्या कोणत्याही निराधार, एकतर्फी आणि खोट्या वृत्तांची दखल घेऊ नये. तसेच या प्रकरणी कोणतेही वृत्त प्रसारित करताना माझ्याशी किंवा माझ्या कार्यालयाशी संपर्क साधून आमची बाजू देखील मांडली जाईल, अशी आशा बाळगते, असंही कामिनी शेवाळे म्हणाल्या.

Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.