दहीहंडीवरुन कार्यकर्त्यांच्या अंगावर गुन्हे दाखल, राज ठाकरे म्हणतात अस्वलाच्या अंगावरील केस मोजत नाहीत

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी दहीहंडीवरील बंदीवरुन सरकारवर सडकून टीका केलीय. सरकारने कितीही निर्बंध लावले तरी आम्ही सण साजरा करणार. काय होईल ते बघू, असं मत राज ठाकरे यांनी व्यक्त केलं. दहीहंडीवरुन पोलिसांकडून गुन्हे दाखल होत असल्याच्या मुद्द्यावर राज ठाकरे यांनी जोरदार टोलबाजी केली.

दहीहंडीवरुन कार्यकर्त्यांच्या अंगावर गुन्हे दाखल, राज ठाकरे म्हणतात अस्वलाच्या अंगावरील केस मोजत नाहीत
Follow us
| Updated on: Aug 31, 2021 | 12:20 PM

मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी दहीहंडीवरील बंदीवरुन सरकारवर सडकून टीका केलीय. सरकारने कितीही निर्बंध लावले तरी आम्ही सण साजरा करणार. काय होईल ते बघू, असं मत राज ठाकरे यांनी व्यक्त केलं. दहीहंडीवरुन पोलिसांकडून गुन्हे दाखल होत असल्याच्या मुद्द्यावर राज ठाकरे यांनी जोरदार टोलबाजी केली. जसे अस्वलाच्या अंगावर किती केस असतात ते मोजत नाहीत, तसेच आमच्या अंगावर किती केसेस आहेत हे आम्ही मोजत नाही, म्हणत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

राज ठाकरे म्हणाले, “अस्वलाच्या अंगावर केस किती तसं आम्ही आमच्यावरील केस मोजत नाही. हे सर्व सूडबुद्धीने सुरु आहे. हे विरोधी पक्षात असते तर काय केलं असतं? मंदिरं उघडली गेलीच पाहिजेत. आजचा दिवस होऊदे, आम्ही बैठक घेऊन मंदिराची भूमिका घेऊ, मंदिराबाहेर घंटानाद करु. नियम सर्वांसाठी एक लावा, वेगवेगळे नको.”

“यांच्यासाठी सगळं सुरु, आम्ही दहीहंडी करायची नाही का?”

“सर्व काही सुरु आहे. नारायण राणेंबाबतीत झालं, हाणामाऱ्या झाल्या, भास्कर जाधवांच्या मुलाने मंदिरात अभिषेक केला, यांच्यासाठी सगळं सुरु, फुटबॉल, क्रिकेट सुरु आहे, आम्ही दहीहंडी करायची नाही का?” असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला.

“बाहेर पडायला यांची फाटते त्यात आमचा काय दोष?”

राज ठाकरे म्हणाले, “बाहेर पडायला यांची फाटते, त्यात आमचा काय दोष? हे सर्व निवडणुकीसाठी सुरु आहे, यांची आखणी झाली की निवडणुका जाहीर करायच्या, बाकीचे तोंडावर पडतील म्हणून. मी तर बाहेर पडतोच आहे, शुक्रवारी चाललो आहे.”

बोटं छाटणारा बाहेर येऊ दे, यांची सर्व बोटं छाटली जातील, राज ठाकरे गरजले

राज ठाकरे म्हणाले, “ठाण्यात परप्रांतीय फेरीवाल्याने अधिकाऱ्यावर हल्ला केला. पोलिसांकडून ज्या दिवशी सुटेल त्यादिवशी आमच्याकडून मार खाईल. यांची मस्ती उतरवली पाहिजे. यांची सर्व बोटं छाटली जातील, फेरीवाला म्हणून फिरता येणार नाही तेव्हा यांना कळेल. यांची हिम्मत कशी होते? निषेधाने हे सुधारणारे नाहीत.”

“आज पकडलेत, उद्या बेल होईल, पुन्हा हे बोटं छाटायला बाहेर”

“यांची हिम्मत कशी होते? तुम्ही बोटं छाटता? आज पकडलेत, उद्या बेल होईल, पुन्हा हे बोटं छाटायला बाहेर. सरकार कशासाठी आहे? सरकारने यावर बंधणं आणली पाहिजेत. हे काय फक्त मुंबईत होत नाही. इतक्या वर्षात कुणाची हिम्मत झाली नाही बोटं छाटायची. हे सहीसलामत बेलवर सुटणार. यांना भीती काय आहे हे पोलिसातून बाहेर आल्यावर कळेल,” असा संताप राज ठाकरे यांनी व्यक्त केला.

संबंधित बातम्या वाचा :

राज ठाकरेंची पुन्हा परप्रांतीयविरोधी भूमिका? राज म्हणतात, बोटं छाटणारा बाहेर येऊ दे!

तुमची बाहेर पडायला फाटते त्यात आमचा काय दोष, राज ठाकरेंची सरकारवर जळजळीत टीका

भाजपच्या भूमिकेला मनसेची पहिली साथ? मंदिर उघडण्यासाठी राज ठाकरे आक्रमक

संबंधित व्हिडीओ पाहा :

Raj Thackeray criticize Government over police FIR on MNS activist

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.