Raj Thackeray LIVE Speech : तीन नंबरचा राष्ट्रवादी काँग्रेस एक आणि दोन नंबरच्या भाजप शिवसेनेला फिरवत होता : राज ठाकरे

Raj Thackeray : राज ठाकरे यांनी आज गुढीपाडव्याच्या निमित्तानं शिवाजी पार्कवर मनसे सैनिकांना मार्गदर्शन केलं. यावेळी मोठ्या प्रमाणावार मनसे सैनिक जमले होते.

Raj Thackeray LIVE Speech : तीन नंबरचा राष्ट्रवादी काँग्रेस एक आणि दोन नंबरच्या भाजप शिवसेनेला फिरवत होता : राज ठाकरे
Raj ThackerayImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 02, 2022 | 9:18 PM

मुंबई :  जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवाना, भगिंनींनो आणि मातांनो आपल्या सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा, खरतर साडे सहा वाजल्यापासून तयार होतो. मला सगळे जण सांगत होते की ट्राफिक जाम झाल्यानं अनेक जण अडकले आहेत त्यामुळं येऊ नका. त्यामुळं मला यायला उशीर झाला. महाराष्ट्राच्या (Maharashtra) कानाकोपऱ्यातून आलेल्या मनसे सैनिकांचं दर्शन घेता येतेय. तीन वर्षापूर्वी गुढीपाडव्याच्या दिवशी मेळावा झाला होता. त्यानंतर मेळावा घेता आला नाही. कोरोना, लॉकडाऊन, तो लॉकडाऊनचा काळ आठवला तरी काही वेळ बरं वाटतं पण काही वेळा त्रास होतो. आज गजबजलेलं शिवतीर्थ सामसूम होतं. शिवतीर्थ काय घेऊन बसलाय सगळं जग सामसूम होतं. एक माणूसही फिरताना दिसायचा नाही. एकतर कोरोनाची भीती होती नाहीतर पोलिसांचा दांडिया होता. त्या संपूर्ण काळात पोलिसांनी जे काम केलंय त्या मुंबई (Mumbai) महाराष्ट्राच्या पोलिसांना सलाम करतो. कोरोना काळात जीवाची पर्वा न करता ते रस्त्यावर होते, असं राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले.

लॉकडाऊनचा काळ गेला ते बरं झालं

दोन वर्षानंतर बोलताना इतकं आहे. इतकी मोरी तुंबलीय कुठनं बोळा घालावा हे कळत नाही, जितकं शक्य होईल ते साफ करु, भीतीदायक लॉकडाऊनचा काळ गेला. नैराश्य आणि भीती संपवून सगळे कामाला लागले. भीती आणि लॉकडाऊन विस्मरणात गेलं ते चांगलं झालं. लॉकडाऊन विस्मरणात गेला तसं अनेक गोष्टी विस्मरणात गेल्या. आपण फ्लॅशबॅक करु

पाहा व्हिडीओ:

एका दिवशी पाहाटे पाहतो तर काय जोडा वेगळाच

दोन वर्ष आपली शांततेत गेली. दोन वर्षापूर्वी झालेल्या घटना आपण विसरुन गेलो. 2019 साली झालेली विधानसभेची निवडणूक , वर्तमानपत्र आणि चॅनेल रोज नव्या बातम्या दाखवतो त्यामुळं विसरुन जातो. ते विस्मरणात जाऊन कसं चाललेल 2019 ची विधानसभा निवडणूक आठवा भाजप शिवसेना विरुद्ध काँग्रेस आणि राष्ट्रवादी होतं. निकाल लागल्यानंतर शिवसेनेला आणि उद्धव ठाकरेंना साक्षात्कार झाला. अडीच अडीच वर्ष ठरली होती. ज्या सभांमध्ये आपण बोलला नाहीत. नरेंद्र मोदी महाराष्ट्रात आल्यावर त्यांच्या सभेत तुम्ही बसला होता. मुख्यमंत्री भाजपचा असेल असे ते म्हणाले होते. अमित शाह म्हणाले भाजपचा मुख्यमंत्री होईल त्यावेळी काही बोलला नाहीत. निकाल लागल्यावर सरकार अडकतंय असं कळल्यावर साक्षात्कार झाला. अमित शाह यांच्याबरोबर एकांतात बोलला होतात. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची गोष्ट सर्वांसमोर झाली नाही. एका दिवशी पाहाटे पाहतो तर काय जोडा वेगळाच, पळून कुणाबरोबर गेली आणि लग्न कुणाबरोबर झालं, महाराष्ट्राला हे समजेना लग्न कुणाबरोबर केलं. हे समजना. मग आवाज आला ये शादी हो नही सकती. मग हिरमसून घरी गेले. हे सर्व घडत असताना कोणतरी डोळा मारतोय..

तीन नंबरचा पक्ष एक आणि दोन नंबरच्या पक्षाला फिरवत

भाजप एक नंबरचा पक्ष, शिवसेना दोन नंबरचा पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस तीन नंबरचा पक्ष होता. तीन नंबरचा पक्ष एक आणि दोन नंबरच्या पक्षाला फिरवत होता. महाराष्ट्राच्या जनतेला काय सांगता. तुमचं अडीच अडीच वर्ष ठरलं होतं. तुमचं आतलं झंगाट होतं. तुम्हाला मतदान भाजप आणि शिवसेना म्हणून केलं होतं. शरद पवारांसोबत जाण्यासाठी केल नव्हतं. आम्ही सगळं विसरुन जातो. तास तास दोन तास उभे होतो. भाषण ऐकली, मतादन केलं निर्णय आला त्यावेळी महाराष्ट्राचा निर्णय वेगळा दिसला. याच्यासाठी मतदान करता, गुलाम आहात यांचे कोणीही यावं आणि फरपटतं न्यावं. लोकांनी विसरुन जावं हे यांना हवं आहे.

हे सगळे कॅमेरेवाले आले की पक पक सुरु होते. या बाजूला कोणीतरी बोलायचं, त्याबाजून कुणीतरी बोलायचं. मूळ विषय बाजूला पडतो. मी माझ्या पत्रकार परिषदेत सांगितलं होतं की मुकेश अंबानी यांच्या घरासमोर गाडीत जिलेटिनच्या कांड्या ठेवल्या. सचिन वाझे शिवसेनेत होता, त्या पोलीस अधिकाऱ्यानं गाडी तिथं का ठेवली याचं कारण पुढं आलं नाही.

माझ्या परिचयाचे एक होते. आहेत ते. त्यांना गाणं गाण्याचा भयंकर शोक होता. चारपाच झाले ते गाणं म्हणायचे. रमय्या वस्तावया. ते ताण द्यायचे. ती तान साधारण एक मिनिटभर चालायची. त्यांना वाटायचं सूर चांगला होता. नंतर ते पुन्हा विचारायचं गाना कोनसा था. तशी ती तान आहे. त्यावर आज कोण बौोलत नाही. देशाच्या उद्योगपतीच्या घराजवळ गाडी सापडते त्याचं उत्तर मिळत नाही देशाला. गृहमंत्री आत जातो. पोलीस कमिशनरला काढून टाकलं जातं. एक अधिकारी तुरुंगात जातो. हे आठवतं का तुम्हाला. ज्याने गद्दारी केली त्याला विसरतो. याच गोष्टीचा ते फायदा घेत आले. नवीन टूम काढतात

छगन भुजबळ स्वातंत्र्यसैनिक होते का?

दाऊदशी संबंध अलेल्या नवाब मलिकांचा तेही आत गेले. याच शिवतिर्थावर मुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाला होता. राष्ट्रवादी काँग्रेसकडून पहिला मंत्री जाहीर केला ते छगन भुजबळ होते. दोन अडीच वर्ष तुरुंगात गेले त्या भुजबळांचा शपथविधी झाला. ते काही स्वातंत्र्य सैनिक नव्हते. सत्ता आल्यावर त्यांना मंत्रिपद द्यावं. हे तुमच्या नाकावर टिच्चून करतात. कोण तुम्ही. एका दिवसाचे मतदार, लाचारासारखे रांगेत उभं राहायचं आणि मंत्री करायचं. जो माणूस तुरुंगात होता. त्याला पहिला मंत्री करेल. गृहमंत्री आत गेला काही फरक पडत नाही. काय करणार तुम्ही. मुंबईत बॉम्बस्फोट घडवणाऱ्या दाऊदशी संबंध असलेले नवाब मलिक जेलमध्ये गेले. त्यांची हिंमत बघा.गाडीत बसताना ते तुम्हाला अंगठा दाखवतात. ते तुम्हाला मेंढरा सारखं वापरतात. आमच्या हातात सत्ता द्या आम्ही वाटेल त्या करू, असं तर आज दोन वर्षानंतर बोलतोय. यो दोन वर्षानंतर काही गोष्टी आपल्या नजरेतून सुटू नयेत म्हणून काही विषय काढून ठेवले होते.

आम्ही का भाषण करतो,लोक का येतात, भाषण ऐकतो आणि विसरुन जातो. लोकशाही कशी असते हे इंग्लंडकडे पाहा. विस्टन चर्चिल यांची फेमस पोझ होती. व्ही फॉर विक्टरी, युद्ध जिकल्यानंतर इग्लंडमध्ये निवडणुका झाल्या आणि विस्टन चर्चिल निवडणुका हरले. विस्टन चर्चिल युद्ध काळात चांगले होते, शांततेच्या काळात चांगले नाहीत, असं जनता म्हणाली. तो समाज प्रगल्भ होता. जोजो माणूस इतिहास विसरला त्याचा भूगोल निसटला आहे.

महाराष्ट्र आपण कुठं आणून ठेवला

इतकी वैभवशाली परंपरा असणारा महाराष्ट्र आपण कुठं आणून ठेवला. गृहमंत्री 100 कोटी मागितले म्हणून जेलमध्ये जातो. नवाब मलिक आत गेले तरी सरकार सुरू आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या नाही. आपल्या राज्यात चालू आहे. हे महाराष्ट्रात चालू आहे. शिवछत्रपती हे डेकोरेशन नाही. यांचा विचार पुढं न्यायाचा असेल तर असली माणसं सत्तेत चालणार नाहीत. रामाजी अनंत सुभेदाराला शिवाजी महाराजांनी सुभेदाराला पत्रं लिहिलं होतं. त्यात पत्राच्या एका ओळीत कशी सत्ता असावी, सत्ताधारी कसा असावा हे एका ओळीत सांगितलं होतं. कारभार ऐसे करावा रयतेच्या भाजीच्या देठासही हात न लागणं. रयत म्हणजे कोण रयत, रयत म्हणजे शेतकरी, आजबाजूचा समाज, इतर विविध काम करणारा त्याच्या भाजीच्या देठासही हात न लगणे. आज महाराष्ट्रात आमच्याकडे काय सगळीकडे बोंबाबोंब सुरु आहे. एसटी कर्मचारी संप सुरू, पोलीस ओरडत आहेत. शेतकरी आत्महत्या थांबत नाही. हजारोनं शेतकरी आत्महत्या करत आहेत. शिक्षणाचा बट्टयाबोळ झाले आहेत. एसएसी झालेल्या मुलांना दहावी झालेल्यांना नोकऱ्या मिळणार नाहीत आता. सीबीएसीवाल्यांना नोकऱ्या मिळणार आहेत. महाराष्ट्रात नोकऱ्यात जर समजा नोकऱ्यात प्राधान्य मिळणार असेल तर मराठी माणसाला पहिलं प्राधान्य हवं, बाकीच्यांना नंतर असेल. ही फालतू लफडी इकडे आणू नका. प्रत्येक राज्याने आपआपली गोष्ट जपली पाहिजे, अस राज ठाकरे म्हणाले.

आमच्याकडे जातीचं हत्यार

उत्तर प्रदेशचा निकाल लागला. तिथे विकास होतोय. हेच पाहिजे. मोदी सत्तेत आल्यावर उत्तर प्रदेएश बिहार झारखंडकडे त्यांनी पहावं. या तीन राज्यातून लोक बाहेर पडतात हे मी 2014 मध्ये बोलत होतो. तिकडे विकास होतोय हे ऐकून आनंद वाटतो. प्रत्येक राज्यात व्हाव. सर्वांचं ओझं घ्यायला महाराष्ट्र बसला नाही. तुम्ही या गोष्टी बघत नाही. वर्तमान पत्रातील ओळी वाचता त्यातील मधल्या ओळी वाचत नाही. काय खेळ सुरू आहे यांचा. आमच्याकडे हत्यार आहे. उत्त्तम हत्यार आहे. जातीचं हत्यार आहे.

आज भाषण करताना अनेक लोकांनी मला विचारलं, हिंदुत्त्वावर काय बोलणार असं विचारलं. अयोध्येला जाणार की नाही जाणार आहे पण तारीख सांगणार नाही. जातीपातीत अडकून बसणार असाल तर काय बोलायचं. हिंदू हा हिंदू मुस्लीम दंगलीत हिंदू असतो, 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टला तो भारतीय होतो. चीननं आक्रमण केलं त्याला आपण कोण आहोत कळत नाही. ना हिंदू आणि ना भारतीय असतो त्यावेळी मराठी, गुजराती, बंगाली असतो. मराठी झाल्यावर मराठा, ब्राह्मण, आग्री, कोळी होतो.

बाबासाहेब पुरंदरे सॉफ्ट टार्गेट

काही लोकांना ही गोष्ट हवी आहे. 1999 ला राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म झाल्यानंतर जातीपातीचं राजकारण सुरु झालं. 1999ला राष्ट्रवादीचा जन्म झाल्यावर त्यांनी दुसऱ्या जातीचा द्वेष करायला सांगितलं. कधी मराठा आरक्षणाचं गाजर दाखवायचं. बाबासाहेब पुरंदरे यांना सॉफ्ट टार्गेट करण्यात आलं. शिवरायांनी आम्हाला जातपात गाडून एक व्हा असं सांगितलं त्या महाराष्ट्रात जातीपातीवरुन राजकारण सुरु आहे. जातीतून बाहेर पडणार नाही आम्ही हिंदू कधी होणार आहे. बाहेरच्या राज्यात जे राजकारण होत आहे ते महाराष्ट्रात होत असेल तर आपण विकास कधी करणार आहोत. अनिल शिदोरे उत्तर प्रदेशच्या ढाब्यावर गेल्यावर त्यांना जात विचारण्यात आली. तिथं जात विचारण्यात आली मग चहा देण्यात आला. ही परिस्थिती महाराष्ट्रात आणायची आहे का? जेम्स लेन कोण? जेम्स लेण कोण? जॉर्ज बर्नॉड शॉ होता. पुस्तकात काहीतरी वेडं वाकडं छापून आणायचं आणि त्या भिकारड्यानं जिजाऊंबद्दल वेडवाकडं लिहिलं. देशाबाहेरचा व्यक्ती इथं येतो आणि लिहितो. आम्हाला कसलंच भान नाही, वेडेपेसे झालोय. निवडणुकीच्या वेळी पैसे देऊन एकमेकांची डोकी फोडायला समोर येतो.

आपापली संस्कृती जोपासली तर राज्य मोठं होईल

हिंदू म्हणून आपण कधी एक होणार आहोत. ही विविधता म्हणतो, गुजरात, बंगाल, तामिळनाडूची संस्कृती होती. हा देश 1947 ला निर्माण झाला त्यापूर्वी भूमी होती. 1012 ला गझनीचा मुहम्मद आला .1292 च्या सुमारा अल्लाउद्दीन खिलजी आला. शिवछत्रपतींचा विचार घेऊन आम्ही अटकेच्या किल्ल्यावर भगवा झेंडा फडकावला. मधला 125 वर्षांचा काळ सोडला तर 800 ते 900 वर्ष देश पारतंत्र्यात होता. मोघल आपली संस्कृती घालवू शकले नाहीत. प्रत्येक राज्यानं आपापली संस्कृती जोपासली तर राज्य मोठं होईल, देश मोठा होईल. यातून हिंदू मोठा होईल.

मुंबईत फुकट घरं मिळतंय म्हणल्यावर लोंढेच्या लोंढे महाराष्ट्रात

एका राज्याला दुसरं राज्य ओरबाडायचं आहे. दुसऱ्यांना तिसरं राज्य ओरबाडायचं आहे. शेतकरी आत्महत्या करतोय, मुलांना शिक्षण मिळतं नाही यामध्ये परकीय लोकांचा हात आहे का? इथल्या दळभद्री लोकांच्या धोरणांचा परिणाम आहे.नाशिक महापालिकेत मनसेनं जे काम केल त्याअगोदर झालं ते त्यापूर्वी आणि त्यानंतर झालं नाही. लफंगेगिरी करुन सत्ता मिळवायची असेल तर तेच करु मग चांगुलपणाची अपेक्षा करु नका, असं राज ठाकरे म्हणाले. आज माझ्या महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणूस रस्त्यानं चालतोय फुटपाथ नाही. गाड्या चालवायच्या ट्राफिक जाम झाले. झोपडपट्ट्या वाढत आहेत. 1995 साली झोपडपट्टया होत्या आता झोपडपट्ट्या बघा. 1995 पूर्वी बाळासाहेब ठाकरे यांच्याशी बोललो होतो. झोपडपट्टीवासियांना मोफत घरं चांगली गोष्ट नाही, असं सांगितलं होतं. 1995 नंतर मुंबईत फुकट घरं मिळतंय म्हणल्यावर लोंढेच्या लोंढे महाराष्ट्रात आले.

अनेक गरीब झोपडपट्टयांमध्ये राहत आहेत. पूर्वापार लोकं झोपटपट्टयांमध्ये राहतात. पोलिसांना घरं द्या,आमच्या राजू पाटील यांनी विरोध केला. मला वाटतं आपण देवाण घेवाण करावी आमदारांना घरं द्यावीत आणि त्यांची फार्म हाऊस आपल्याकडे घ्यावी. आमदारांना आणि खासदारांना दिली जाणारी पेन्शन बंद करावी. उपकार करतात काय? महाराष्ट्र आणि देशातील आमदार आणि खासदार लोकांचं काम करतात तर पेन्शन कशाला हवीय. आता कोणत्या आमदारांनी घरं मागितली होती. मुख्यमंत्र्यांना झालं काय? त्या घरामध्ये कट दिसला. सध्या कट दिसतात. ईडीनं कट केला मग मुख्यमंत्री संतापले.

हल्ली आई वडील यशवंत जाधव हो सांगतात

मंबई महापालिकेचे यशवंत जाधव यांच्यावर रेड पडली. दोन दिवस रेड सुरु होती. काय मोजत होती. हल्ली आई वडील यशवंत जाधव हो सांगतात. मुंबई महापालिकेत पैसे खा खा खाल्ले. मुंबईचे भूतकाळातील फोटो येतात ते पाहताना मुंबई किती छान वाटते. लोकं बसमध्ये कसे चढतात. घाटकोपरला चाललोय की अहमदाबादला चाललोय हे समजत नाही. बेस्टचा रंग गेलाय, खड्ड्यामधून चालतोय . तुमची कमजोरी यांना सत्तेत आणते. या मुंबईत मी कॉलेजला जात होतो त्यावेळी बांद्र्यावरुन हार्बरनं जात होतो. तिथं सात आठ झोपड्या होत्या. त्याला बेहरामपाडा म्हणायचे. मातोश्रीतून बाहेर पडल्यावर पुढं गेलं की बेहराम पाडा, झोपडपट्टी वाढत आहे. ती परिस्थिती मुंब्रा येथील आहे. नरेंद्र मोदी यांनी विनंती आहे, ईडी, आयटीच्या धाडी टाकताय ना, झोपडपट्टीत असलेल्या मदरशांवर धाडी टाका, तुम्हाला काय चाललंय त्या कळतील. कशाला हवाय पाकिस्तान, पाकिस्तानची गरज नाही, उद्या जर काय घडलं तर आतमध्ये आवरता आवरता नाकीनऊ येईल इतक्या गोष्टी घडल्या आहेत. अनेक मशिदी अशा आहेत त्यामध्ये काय चाललंय ते कळत नाही. पाकिस्तानातून आलेली लोकं आहेत. बांग्लादेशातून आलेली लोकं आहेत. आधार कार्ड आहे, रेशनकार्ड नसेल रेशनकार्ड दिली जात आहेत. त्यांना सगळ्या गोष्टी पुरवणारे आमचेच. एकदा पोलिसांशी बोला आणि कानोसा घ्या, तुम्हाला धडकी भरेल धडकी. मशिदीवरती लागणारे भोंगे, माजा प्रार्थनेला विरोध नाही, मशिदीवरती लागलेले भोंगे उतरावेवे लागतील. या सरकारला हा निर्णय घ्यावा लागेल. अन्यथा मशिदीसमोर हनुमान चालिसा लावू, असं आव्हान राज ठाकरेंनी दिला.

असल्या समाजाचं नेतृत्त्व करायला नको वाटतं

धर्म बनला तेव्हा लाऊड स्पीकर होता का? बाहरेच्या देशात लाऊड स्पीकर दिसतातका? तुमच्या परमेश्वराची प्रार्थना करायची असल्यास घरात करा.प्रत्येकानं आपला धर्म घरात ठेवला पाहिजे. आमच्याकडे मंदिरं आहेत टाका धाडी, आमच्याकडे काहीच मिळणार नाही. जातीपातीत अडकून पडलेला समाज नाही आवडतं. असल्या समाजाचं नेतृत्त्व करायला नको वाटतं होतं. त्या दिवशी मुख्यमंत्री ठणकावून सांगत होते विधानसभेत माझ्या कुटुंबाला हात लावत असाल तर मला अटक करा. पहिल्यांदा कुटुंबाला सांग महापालिकेत जाऊ नको म्हणून. पालिकेचे व्यवहार बघायचे. यांना ईडीची नोटीस आली. मलाही आली. गेलो ना. यांना चार महिन्यापूर्वी आली. गेले नाही. संपत्ती जप्त केली तेव्हा मुख्यमंत्र्यांना राग आला. तेव्हा म्हणतात कुटुंबावर येणार असेल तर मला अटक करा. हे सर्व 2019 चं आहे. अडीच वर्षाचं मुख्यमंत्रीपद हवं होतं ना भोगा. राजकारण तुम्हाला करायचं असेल तर राजकारण समोरच्या लोकांनाही येतं. या असल्या नादान राजकारणाला तुम्ही बळी पडू नका अशी अपेक्षा आहे. हे सगळे जण बाळासाहेब ठाकरेंच्या नावाखाली वाटेल ते करत आहेत. हजारो कोटी रुपये तुमचे लुटतं आहेत. महापौर बंगला आहे, माझे काका असून त्याला विरोध केला होता. बाळासाहेब ठाकरेंचं स्मारकं मोठं बांधायचं असेल तर मोठं बांधा. आजही हे सगळे तिकडे असतात. परदेशी गाड्या लागलेल्या असतात. बिल्डरांच्या घशात मुंबई घालत असताना बाळासाहेबांचं स्मारक करायला प्लॉट सापडला नाही का? ज्यांनी तुमच्याशी गद्दारी केलीय त्यांना मतदान करणार नाही, असं वागा. वचक हा तुमचाच असला पाहिजे.

इतर बातम्या:

Raj Thackeray LIVE : शिवसेनेवर जोरदार तोफ डागली, राज ठाकरेंचं तुफानी भाषण Live

bullet train project: बुलेट ट्रेनचा उपयोग काय?, मुंबईवर प्रेम असेल तर कांजूरची जागा द्या; मुख्यमंत्र्यांकडून मोदींच्या ड्रीम प्रोजेक्टवर पुन्हा टीका

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.