सरकारच्या कामावर समाधानी आहात का? राज ठाकरे म्हणतात….
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना राज्य सरकारच्या कामावर समाधानी आहात का? असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावर राज ठाकरे यांनी मार्मिक उत्तर दिलं (Raj Thackeray on Thackeray Government).
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (7 मे) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर (Raj Thackeray on Thackeray Government) सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली. या बैठकीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी राज ठाकरे यांना राज्य सरकारच्या कामावर समाधानी आहात का? असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावर राज ठाकरे यांनी मार्मिक उत्तर दिलं (Raj Thackeray on Thackeray Government).
“सरकार उपलब्ध संसाधनाच्या आधारे काम करत आहे. सरकारच्या कामात काही चुका आणि त्रुटीदेखील असू शकतात. मात्र, ही वेळ त्रुटी आणि चुका दाखवण्याची नाही”, असं उत्तर राज ठाकरे यांनी पत्रकारांना दिलं.
मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत राज्य सरकारला काही सूचना केल्याची माहिती राज ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. “गर्दीच्या ठिकाणी सुरक्षा वाढवावी, छोटे दवाखाने सुरु करावेत, जे परप्रांतीय मजूर बाहेर गेले आहेत, त्यांची तपासणी करुन, नोंदणी करुन महाराष्ट्रात घ्यावं”, असं राज ठाकरे यांनी सांगितलं. MPSC विद्यार्थ्यांना घरी पोहोचवावं, अशी सूचनाही सरकारला केल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं. लॉकडाऊनचा एक्झिट प्लॅन काय? असा प्रश्न विचारल्याचं ते म्हणाले.
राज ठाकरे यांच्या नऊ सूचना
1) कंटेन्मेंट झोनमध्ये काही गोष्टी गृहीत धरलं जातं आहे तिथे अधिक फोर्स वाढवा, पोलीस थकले आहेत. ते सुद्धा तणावात आहेत. अशा ठिकाणी काही भाग जे आहेत, महाराष्ट्रात काही ठिकाणी गृहित धरलं जातंय तिथे SRPFलावून दरारा निर्माण करावा. लोक बाहेर येऊ नयेत, कोरोना पसरु नये.
2) हा रमजानचा महिना आहे, अनेक लोक बाहेर पडत आहेत. अनेक सण आपण घरात साजरे केले. मुस्लिम समाजानेही तसा विचार करावा, जर ऐकत नसेल तर फोर्स लावावी
3) छोटे दवाखाने सुरु करावेत. दवाखाने सुरु करताना तिथे पोलीस असावा, रांगांचं नियंत्रण त्यांनी करावा
4) स्पर्धा परीक्षाचे जे तरुण अडकले आहेत, त्यांना घरी पोहोचवण्याची व्यवस्था करावी
5) परप्रांतिय कामगार आहेत ते परत येताना त्यांची महाराष्ट्रात येताना तपासणी करावी. ते ज्या राज्यातून येत आहेत, त्यांची परिस्थिती माहित नाहीत. त्यामुळे तपासणी करावी. त्याचवेळी परत येताना त्यांची राज्य स्थलांतरित कायद्याखाली नोंदणी करावी. आजपर्यंत जो गोंधळ झाला होता, आता तो सुधारण्याची वेळ आहे.
6) आता परप्रांतिय गेले आहेत, त्यामुळे कामगारांअभावी महाराष्ट्रातील उद्योग बंद, आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील जे तरुण आहेत, त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवून त्यांना रोजगार द्यावा. परप्रांतिय जे बाहेर गेले आहेत, त्यांच्यामुळे महाराष्ट्रातील तरुणांना रोजगार मिळेल, संधी आहे ती घालवू नये..
7) शाळा कशाप्रकारे सुरु करणार? ई लर्निंग वगैरे प्रत्येक ठिकाणी शक्य नाही. शहरातही अनेक ठिकाणी अशक्य आहे. ती बाब पालकांपर्यंत पोहोचवंणं
8) मनपा, सुरक्षा कर्मचारी यांच्याबाबत सुरक्षेची काळजी घ्यावी. सफाई कामगार आजारी पडत आहेत, त्यांनी हात वर केले, तर शहरांची अवस्था काय होईल? त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष द्या
9) सर्वात महत्त्वाची सूचना – हा लॉकडाऊन आहे त्याबाबत सरकारचा एक्झिट प्लॅन काय? जेव्हा केव्हा लॉकडाऊन काढणार, त्याबाबत एक्झिट प्लॅन असावा. जोपर्यंत लस येत नाही तोपर्यंत तुम्ही लॉकडाऊन ठेवू शकत नाही. तो आयत्यावेळी सांगून उपयोग नाही, त्याची आधी कल्पना द्यावी. तो कसा काढणार, काय सुरु होईल, काय बंद होईल, ते लोकांना सांगावं.
संबंधित बातम्या :