शरद पवारांवर टीका करणाऱ्या पडळकरांना रामदास आठवलेंचा सल्ला
गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्याबाबत केलेलं वक्तव्य अयोग्य आणि अवमानकारक आहे, असं रामदास आठवले म्हणाले आहेत (Ramdas Athawale on Gopichand Padalkar).
मुंबई : भाजपचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या जहरी टीकेवर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे (Ramdas Athawale on Gopichand Padalkar). गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्याबाबत केलेलं वक्तव्य अयोग्य आणि अवमानकारक आहे, असं रामदास आठवले ट्विटरवर म्हणाले आहेत (Ramdas Athawale on Gopichand Padalkar). या वक्तव्याप्रकरणी रामदास आठवले यांनी पडळकरांना सल्ला दिला आहे.
“शरद पवार हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते आहेत. सर्व महाराष्ट्राला ते आदरणीय आहेत. त्यांच्याबद्दल गोपीचंद पडळकर यांनी केलेलं वक्तव्य अयोग्य आणि अवमानकारक आहे. एकमेकांचा आदर करणे ही महाराष्ट्राची परंपरा आहे. त्यामुळे पडळकरांनी ते वक्तव्य मागे घ्यावे”, असा सल्ला रामदास आठवले यांनी गोपीचंद पडळकर यांना दिला.
शरद पवार हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते आहेत. सर्व महाराष्ट्राला ते आदरणीय आहेत. त्यांच्याबद्दल गोपीचंद पडळकर यांनी केलेले वक्तव्य अयोग्य अवमानकारक आहे. एकमेकांचा आदर करणे ही महाराष्ट्राची परंपरा आहे.त्यामुळे पडळकरांनी ते वक्तव्य मागे घ्यावे असे
— Dr.Ramdas Athawale (@RamdasAthawale) June 26, 2020
पडळकर नेमकं काय म्हणाले?
“शरद पवार हे या महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे. कारण गेल्या अनेक वर्षापासून ते महाराष्ट्राचं नेतृत्त्व करतात. राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची भूमिका त्यांची राहिलेली आहे. ही भूमिका यापुढेही ते कायम ठेवतील”, असं गोपीचंद पडळकर म्हणाले.
देवेंद्र फडणवीस सरकारने धनगर समाजाला तरतूद केलेले एक हजार कोटी या महाविकास आघाडी सरकारने दिले नाहीत. शरद पवार हे नाशिकला अवकाळी झाल्यानंतर गेले, कोकणात वादळानंतर गेले, पण अद्याप त्यांना मदत मिळाली नाही. हा सगळा फार्स सुरु आहे, असा घणाघात गोपीचंद पडळकर यांनी केला.
दरम्यान, शरद पवारांवर गोपीचंद पडळकर यांनी केलेली वैयक्तिक टीका ही भाजपची भूमिका नाही, असं विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी स्पष्ट केले आहे.
गोपीचंद पडळकरांवर गुन्हा
दरम्यान, बारामतीत गोपीचंद पडळकरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पडळकरांच्या वक्तव्यावर त्यांच्याविरोधात दाखल झालेला हा राज्यातील पहिला गुन्हा आहे. राज्यात इतर ठिकाणी देखील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. बारामतीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्यावतीने शहर पोलीस स्टेशनला भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत तक्रार अर्ज दिला होता. तसेच जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत पोलीस स्टेशनवर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला. यानंतर पोलिसांनी संबंधित तक्रारीवरुन आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल केला. त्यांच्यावर 505(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
संबंधित बातम्या :
Gopichand Padalkar | पडळकरांची ग्रँड एण्ट्री, 100 गाड्यांचा ताफा, प्रतिमेला दुग्धाभिषेक
Nilesh Rane | राष्ट्रवादीवाल्यांना मस्ती, त्यांना जशास तसं उत्तर देऊ : निलेश राणे
शरद पवारांवरील जहरी टीका भोवण्याची चिन्हं, पडळकरांवर कारवाईचा गृहराज्यमंत्र्यांचा इशारा