रामदास आठवलेंचा आरपीआय उत्तर प्रदेशची निवडणूक लढवणार, दलित मतांवर फक्त मायावतींचा अधिकार नाही असे सांगत घोषणा

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत उतरण्यासाठी दंड थोपटले आहेत. त्यांनी उत्तर प्रदेशात जास्तीत जास्त 18 किंवा 8-10 जागा मिळाल्या तर भाजपसोबत युती करु, असं सांगितलं आहे. तसेच आगामी काळात उत्तर प्रदेशात एक लाख लोकांचं संमेलन घेणार असंदेखील जाहीर केलं आहे.

रामदास आठवलेंचा आरपीआय उत्तर प्रदेशची निवडणूक लढवणार, दलित मतांवर फक्त मायावतींचा अधिकार नाही असे सांगत घोषणा
RAMDAS ATHAWALE
Follow us
| Updated on: Oct 16, 2021 | 9:18 PM

नागपूर : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत उतरण्यासाठी दंड थोपटले आहेत. त्यांनी उत्तर प्रदेशात जास्तीत जास्त 18 किंवा 8-10 जागा मिळाल्या तर भाजपसोबत युती करु, असं सांगितलं आहे. तसेच आगामी काळात उत्तर प्रदेशात एक लाख लोकांचं संमेलन घेणार असंदेखील जाहीर केलं आहे.

यूपीतील दलित मतांवर फक्त मायावती यांचा अधिकार नाही

रामदास आठवले आज नागपुरात बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची (आठवले गट) आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी आरपीआय उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत भाग घेईल. यूपीतील दलित मतांवर फक्त मायावती यांचा अधिकार नाही. आम्ही यूपीमध्ये आगामी काळात एक लाख लोकांचं संमेलन घेणार आहोत, असं सांगितलं. तसेच उत्तर प्रदेशात बाह्मण समाजाचेही संमेलन घेऊ, असेही आठवले म्हणाले.

केंद्रीय तपास यंत्रणा निष्पक्ष आहेत

पुढे बोलताना त्यांनी केंद्रीय तपास यंत्रणेवर दावखण्यात येणाऱ्या अविश्वासावरही भाष्य केलं. त्यांनी केंद्रीय तपास यंत्रणा या निष्पक्ष आहेत. काही शंका असल्यास तपास यंत्रणा चौकशी करतात. आम्ही छापा टाकून काटा काढत नाही. काटा टाकून छापा टाकतो, असे भाष्य आठवले यांनी केलं.

उद्धव ठाकरे यांनी अडीच-अडीच वर्षांचा विचार करावा

तसेच पुढे बोलताना त्यांनी महाविकास आघाडीचे सरकार आणि सत्तेचे गणित यावर मत व्यक्त केले. उद्धव ठाकरे यांनी अडीच-अडीच वर्षांचा विचार करावा. अडीच वर्षे ते मुख्यमंत्री राहणार आणि अडीच वर्षे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपद सांभाळतील. सेना भाजपत समन्वय करायला मी तयार आहे. पण यांना समन्वय करायचा नाही, असे रामदास आठवले म्हणाले.

महाराष्ट्राचा बंगाल केला तर आम्ही बंगालचा महाराष्ट्र करु

तसेच आगामी महापालिका निवडणुकीवर बोलताना अनेक शिवसैनिक नाराज आहेत. आगामी महानगरपालिका निवडणुकीत रिपब्लिकन पक्ष भाजपसोबत निवडणूक लढणार आहे, असे आठवले यांनी सांगितले. तसेच उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचा बंगाल केला तर आम्ही बंगालचा महाराष्ट्र करु अशी मिश्किल टिप्पणी केली.

इतर बातम्या :

चालत्या कारची स्टेअरिंग अचानक लॉक झाली आणि महिला डॉक्टरने जीव गमावला, नेमकं काय घडलं ‘त्या’ रात्री?

आता अजित पवार मुख्यमंत्री होतील म्हणून त्यांना त्रास दिला जातोय का? चर्चेतला सवाल पवारांनी रोखठोक निकाली काढला

शरद पवार म्हणाले ठाकरेंचा हात सक्तीने वर केला, “साहेब ! किती हा भाबडेपणा” म्हणत फडणवीसांनी उडवली खिल्ली

(ramdas athawale rpi party going to contest uttar pradesh election)

दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर.