Sanjay Raut ED Raid : सकाळपासून संध्याकाळपर्यंत राऊत सर्वच प्रश्नांची उत्तरे देतात, त्यांच्यासाठी ईडीबिडी काय?; रामदास कदमांचा टोला
Sanjay Raut ED Raid : ते माझं ऐकतील तर ते संजय राऊत कसले? संजय राऊत माझे जवळचे मित्र आहेत. पण ते माझ ऐकत नव्हते. त्यांनी राष्ट्रवादी सोबत युती घडवून आणली. मी भाजपसोबत युती करण्याच्या प्रयत्नात होतो. तर ते राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्याच्या प्रयत्नात होते.
मुंबई: शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांच्या घरावर ईडीने छापेमारी केल्यानंतर शिवसेनेचे बंडखोर नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी राऊत यांना टोले लगावले आहेत. आज कारवाई झाली. मी दाव्याने सांगतो राऊत स्ट्राँग आहेत ते घाबरणारे नाहीत. ते चौकशीला समोरे जातील. ईडीला (ED) सर्व प्रश्नांची उत्तरे देतील. सकाळापासून रात्रीपर्यंत त्यांना पाहतो तेव्हा सर्व प्रश्न आणि त्याची उत्तरे त्यांच्याकडे असतात. हे ईडीबीडी कसली काय? सगळ्याला उत्तरे देतील ते, असा टोला रामदास कदम (ramdas kadam) यांनी लगावला. ते मीडियाशी संवाद साधत होते. आजच्या कारवाईचं मी समर्थन करणार नाही. पण राऊत कारवाईला सामोरे जातील, ईडीला सहकार्य ककरतील. ते सर्वांना उत्तरे देतील हे मी दाव्याने सांगतो. नवाब मलिकांना अटक झाली. कारण संबंध होता. पण इथे काहीच नसेल तर घाबरायचं कशाला? असा सवालही रामदास कदम यांनी केला.
ते माझं ऐकतील तर ते संजय राऊत कसले? संजय राऊत माझे जवळचे मित्र आहेत. पण ते माझ ऐकत नव्हते. त्यांनी राष्ट्रवादी सोबत युती घडवून आणली. मी भाजपसोबत युती करण्याच्या प्रयत्नात होतो. तर ते राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्याच्या प्रयत्नात होते. त्यात त्यांना यश आलं. त्यांनी उद्धव ठाकरेंना कन्व्हिन्स केलं. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीची आघाडी झाल्याचं रामदास कदम यांनी सांगितलं.
पत्राचाळ घोटाळ्याची मीच मागणी केली होती
संजय राऊत कोणाला भीत नाहीत. ते सर्वांना सामोरे जातीलय आपण जर का काही केल नाही तर घाबरायच कारण नाही. त्यांनी बाळासाहेबांची शपथ घेतली याच मला वाईट वाटलं. त्यांनी शरद पवारांची शपथ घ्यायला पाहिजे होती, असा चिमटा त्यांनी काढला. पत्राचाळीचा हजार कोटींचा घोटाळा आहे. याची चौकशी व्हावी अशी मागणी यापूर्वी केली होती. यात गोरेगावचा आमचाही एक नेता होता, असा दावा त्यांनी केला आहे.
उद्धव साहेबांच्या भोवती कोण बडवे आहेत?
उद्धव साहेबांच्या भोवती कोण बडवे आहेत? गद्दार कोण आहेत? संजय राऊत शिवसैनिक नाहीयत तर पवारांचे कार्यकर्ते आहेत. अनिल परब यांना हाताशी धरून माझ्या मुलाला संपवण्याचा कट करण्यात आला, असा दावाही त्यांनी केला.
तेव्हा राऊत का बोलले नाही?
अजित पवारांकडून निधी वाटपात अन्याय होत होता. शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना राष्ट्रवादीला सर्वाधिक निधी दिला जात होता. असं असताना संजय राऊत का बोलले नाही? सेना संपली तरी चालेल पण राष्ट्रवादीवर नाही बोलणार. शिवसेना फोडण्याचे संपवण्याचे काम संजय राऊत तुम्ही केलेत.