ज्या पक्षाने छळलं त्याच पक्षात नाथाभाऊंनी जाणं हे दुर्दैवी : रावसाहेब दानवे

एकनाथ खडसे ज्या पक्षात जात आहेत त्याच पक्षाने त्यांचा छळ केला आहे", असा दावा रावसाहेब दानवे यांनी केला आहे (Raosaheb Danve on Eknath Khadse BJP resign)

ज्या पक्षाने छळलं त्याच पक्षात नाथाभाऊंनी जाणं हे दुर्दैवी : रावसाहेब दानवे
raosaheb danve
Follow us
| Updated on: Oct 21, 2020 | 3:55 PM

जालना : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत जाणं ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. विशेष म्हणजे भाजपपेक्षा हे त्यांच्यासाठी जास्त दुर्दैवं आहे. ज्या पक्षाने त्यांच्यावर आरोप केले, त्या पक्षानेच त्यांच्यावर ही पाळी आणली. ते ज्या पक्षात जात आहेत त्याच पक्षाने त्यांचा छळ केला आहे. त्यांनी त्याच पक्षात जाणं ही दुर्दैवाची बाब आहे”, असं मत केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मांडलं (Raosaheb Danve on Eknath Khadse BJP resign).

एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात विविध चर्चांना उधाण आलं. एकनाथ खडसे शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. यावर केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली (Raosaheb Danve on Eknath Khadse BJP resign).

“नाथाभाऊ भारतीय जनता पक्षाचे चांगले नेते होते. या पक्षातच त्यांची जडणघडण झाली. या पक्षाने त्यांना ओळख दिली. त्यांना मंत्री केलं, त्यांच्या सूनेला आमदार केलं. एकनाथ खडसे यांना विविध पदांवर काम करण्याची संधी पक्षाने दिली”, असं दानवे म्हणाले.

“एकनाथ खडसे यांनी थोडं थांबायला हवं होतं. त्यांच्यावर जे आरोप-प्रत्यारोप झाले होते, कोर्टात खटला सुरु होता, ते निपटू द्यायला हवं होतं. मग त्यांना पक्षाने निश्चितच न्याय दिला असता. न्यायालतील खटल्यांचा निकाल न लागता त्यांना न्याय दिला असता तर याच पक्षाने आमच्यावर टीका केली असती”, असंदेखील रावसाहेब दानवे म्हणाले.

एकनाथ खडसेंचा भाजपला रामराम

भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर अखेर शिक्कामोर्तब झालं. याबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अधिकृत घोषणा केली. एकनाथ खडसे यांनी भाजपचा त्याग केला. शुक्रवारी दुपारी दोन वाजता खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितलं. तसंच खडसेंनी देखील पत्रकार परिषद घेऊ आपण राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचं जाहीर केलं.

फडणवीसांनी छळलं, त्यांच्यामुळेच भाजपला सोडचिठ्ठी

“मी भाजपच्या प्राथमिक सदस्याचा राजीनामा आज दिला. गेल्या 40 वर्षात मी भाजपचं काम केलं. भाजप जिथे पोहोचला नव्हता, तिथे आम्ही पोहोचवली. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी छळले, माझ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करायला लावला” असं एकनाथ खडसे म्हणाले. (Eknath Khadse first reaction after left BJP)

काही मिळालं, नाही मिळालं याचं दु:ख नाही, देवेंद्र फडणवीसांनी छळले. मी फक्त फडणवीसांवर नाराज आहे, असं एकनाथ खडसे म्हणाले. माझ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आणि तो देवेंद्र फडणवीसांना गुन्हा दाखल करायला लावला याचा मनस्ताप झाला, असं खडसे म्हणाले.

संबंधित बातम्या

Eknath Khadse | काही मिळालं, नाही मिळालं याचं दु:ख नाही, फडणवीसांनी छळले : एकनाथ खडसे

EXCLUSIVE | एकनाथ खडसेंचं ठरलं, शुक्रवारी दुपारी 2 वाजता राष्ट्रवादीत प्रवेश!

एकनाथ खडसेंच्या राजीनाम्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले… 

एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…!

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.