पंकजा मुंडे यांना भाजपमध्ये खूप त्रास होईल तेव्हा मीच… महादेव जानकर यांचा इशारा काय?

राष्ट्रीय समाज पक्ष आगामी लोकसभेच्या निवडणुका सबळावर लढणार आहे. आम्ही लोकसभेच्या 543 जागा आम्ही लढवणार असून चार राज्यांमध्ये आमच्या पक्षाला मान्यता मिळाली आहे.

पंकजा मुंडे यांना भाजपमध्ये खूप त्रास होईल तेव्हा मीच... महादेव जानकर यांचा इशारा काय?
mahadev jankarImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 23, 2023 | 7:58 AM

नगर | 23 जुलै 2023 : भाजप नेत्या पंकजा मुंडे या पक्षात अस्वस्थ असल्याच्या चर्चा आहेत. पंकजा मुंडे या आपल्या नाराजीवर वेळोवेळी भाष्यही करत असतात. मात्र, भाजपमध्येच आपण राहणार असल्याचंही त्या वारंवार सांगत असतात. त्यांच्या नाराजीच्या चर्चा येत असल्याने त्यावर चर्चा होत असतात. पंकजा मुंडे यांचे मानलेले भाऊ राष्ट्रीय समाज पार्टीचे नेते महादेव जानकर यांनी आता या मुद्द्यावर भाष्य करतानाच पंकजा मुंडे या भाजपमध्ये नाराज असल्याचे संकेतही दिले आहेत. ते नगर दौऱ्यावर मीडियाशी बोलत होते.

पंकजा मुंडे सध्या भाजपमध्ये राष्ट्रीय सचिव आहेत. मात्र राष्ट्रीय समाज पक्षात आल्यानंतर बहीण म्हणून काय करायचं ते तेव्हा मी ठरवेल. पंकजा मुंडे सध्या भाजपच्या राष्ट्रीय सचिव आहेत. त्यामुळे आता मी फक्त तिला दिल्या घरी सुखी रहा असेच म्हणेल. मात्र जेव्हा पंकजा मुंडे यांना खूप त्रास होईल तेव्हा साडी चोळी घेऊन मी तिला आणायला जाईल, असं महादेव जानकर म्हणाले. जानकर यांच्या या विधानाने तर्कवितर्क लढवले जात आहेत.

हे सुद्धा वाचा

अजितदादांना फोडण्याची गरज नव्हती

यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधलाय. देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, एकनाथ शिंदे आल्यावर फायदा होईल. आता म्हणतात, अजित पवार आल्यावर फायदा होईल. तसेच परत दोन महिन्यांनी म्हणतील, आता साराच आपला बेस निघून गेलाय, असा टोला जानकर यांनी फडणवीस यांना लगावलाय. भाजप जर एवढा मोठा पक्ष होता तर अजित पवारांना फोडण्याची गरज नव्हती, असा चिमटाही त्यांनी काढला.

आताचे नेते मुंडेंपेक्षा हुश्शार

गोपीनाथ मुंडे यांच्यामुळेच मी भाजप युतीबरोबर गेलो होतो. गोपीनाथ मुंडे लोकनेते होते. मात्र आताचे नेते हे गोपीनाथ मुंडे यांच्यापेक्षा हुशार आहेत. त्यांना वाटत असेल आमची गरज नाही. त्यामुळे त्यांच्या मागे लागण्यात काय अर्थ आहे? असा सवाल त्यांनी केला.

उत्तर प्रदेशातून लढणार

राष्ट्रीय समाज पक्ष आगामी लोकसभेच्या निवडणुका सबळावर लढणार आहे. आम्ही लोकसभेच्या 543 जागा आम्ही लढवणार असून चार राज्यांमध्ये आमच्या पक्षाला मान्यता मिळाली आहे. काही राज्यांमध्ये आम्हाला विजय देखील मिळेल, असं सांगतानाच स्वतः महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमधून निवडणूक लढवणार असल्याची माहिती जानकर यांनी दिलीये.

रथ यात्रेतून कुणालाही विरोध नाही

राष्ट्रीय समाज पक्षाने सध्या राज्यभर यात्रा सुरू केली आहे. ही यात्रा काही कुणाला विरोध करण्यासाठी नाही. जनतेच्या हितासाठी काढली आहे. शेतकऱ्यांच्या, युवकांच्या सर्वसमान्यांच्या प्रश्नांसाठी आम्ही राज्यातील 48 लोकसभा मतदार संघात ही रथ यात्रा काढली आहे, असंही ते म्हणाले.

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.