SC final decision on MLA Balaji Kalyankar : मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म, नगरसेवक ते आमदारकीचा प्रवास, कोण आहेत बालाजी कल्याणकर?

Supreme Court final decision on MLA Balaji Kalyankar disqualification case : शिंदे गटातील 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत निकाल उद्या सुप्रीम कोर्टात लागणार आहे. आमदार बालाजी कल्याणकर यांचा देखील या 16 आमदारांमध्ये समावेश आहे. संंपूर्ण राज्याचं लक्ष याकडे लागले आहे.

SC final decision on MLA Balaji Kalyankar : मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म, नगरसेवक ते आमदारकीचा प्रवास, कोण आहेत बालाजी कल्याणकर?
आमदार बालाजी कल्याणकरImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 11, 2023 | 1:44 PM

मुंबई : बालाजी कल्याणकर हे नांदेड जिल्ह्यातील एक उमदे नेतृत्व. ऐन तारुण्यातच त्यांना आमदारकीची लॉटरी लागली. अल्पावधीतच त्यांनी मिळालेल्या संधीचे सोनं केलं आणि आपल्या आमदारकीच्या अधिकारांचा जनतेच्या भल्यासाठी पुरेपूर वापर करण्याचा निर्धार केला. कल्याणकर हेसुद्धा मध्यमवर्गीय कुटुंबात लहानाचे मोठे झालेले. त्यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबात जगण्याचा संघर्ष काय असतो, याची जाणीव बाळगून त्यांचा राजकीय प्रवास सुरु आहे. 42 वर्षीय बालाजी कल्याणकर हे 2017 मध्ये नांदेड-वाघेला महापालिकेचे नगरसेवक बनले. येथून त्यांचे राजकीय करिअर वेगाने वर झेपावले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आता त्यांच्या अपात्रेसंदर्भात निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे आला आहे.

नगरसेवक झाल्यानंतर दोन वर्षातच आमदारकीपर्यंत मजल

नगरसेवक झाल्यानंतर पुढील दोन वर्षांतच त्यांनी आमदारकीपर्यंत मजल मारली आणि नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व त्यांच्याकडे आले. 2019 मध्ये नगरसेवक असताना त्यांना विधानसभेची उमेदवारी मिळाली. त्यावेळी काँग्रेसचे दोन टर्म आमदार राहिलेले डी. पी. सावंत हे कल्याणकर यांच्याविरुद्ध रिंगणात उतरले होते. मात्र कमालीची जिद्द आणि संघर्षाची हिंमत असलेल्या कल्याणकर यांनी डी. पी. सावंत यांचा 12 हजार मतांनी पराभव केला. यातूनच कल्याणकर यांची ताकद किती मोठी आहे हे राजकीय वर्तुळात सिद्ध झाले.

कट्टर शिवसैनिक अशी ओळख

कल्याणकर हे सुरुवातीपासूनच कट्टर शिवसैनिक म्हणून नावाजलेले होते. शिवसेना आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत विचारांची छाप त्यांच्यावर आहे. त्यामुळे त्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी एकनिष्ठ राहून एकनाथ शिंदे यांच्यासोबत पहिल्यांदा बंड केले. हिंदुत्वासाठी त्यांनी बंडाचा झेंडा हाती घेतला. यादरम्यान त्यांनाही प्रचंड रोषाला सामोरे जावे लागले. मात्र ते खचले नाहीत. त्यांनी एकनाथ शिंदे यांना दिलेली साथ कायम ठेवली आहे. आमदारकीची त्यांची पहिली टर्म आहे. नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघात त्यांच्या पाठिशी मोठा तरुणवर्ग आहे. राजकारणातील यशस्वी प्रवासाचे हेच खरे गमक आहे, असे कल्याणकर मानतात.

हे सुद्धा वाचा

LIVE Updates Supreme Court Decision on 16 MLA Disqualification Case Maharashtra | Shiv Sena | Eknath Shinde

'तेव्हापासूनच संतोष देशमुख अस्वस्थ अन् भिती...', पत्नीच्या प्रतिक्रिया
'तेव्हापासूनच संतोष देशमुख अस्वस्थ अन् भिती...', पत्नीच्या प्रतिक्रिया.
जरांगेंकडून लक्ष्मण हाकेंना धमकी, थेट व्हिडीओ शेअर करत म्हणाले...
जरांगेंकडून लक्ष्मण हाकेंना धमकी, थेट व्हिडीओ शेअर करत म्हणाले....
बायको सोबत होती म्हणून वाचला जीव, नाहीतर...., वसईत नेमकं काय घडलं?
बायको सोबत होती म्हणून वाचला जीव, नाहीतर...., वसईत नेमकं काय घडलं?.
धनंजय देशमुखांचे आंदोलन मागे, अखेर 4 तासांनंतर टाकीवरून उतरले खाली
धनंजय देशमुखांचे आंदोलन मागे, अखेर 4 तासांनंतर टाकीवरून उतरले खाली.
'प्लीज खाली या..', जरांगेंनंतर SP कॉवत यांच्याकडून देशमुखांना विनवण्या
'प्लीज खाली या..', जरांगेंनंतर SP कॉवत यांच्याकडून देशमुखांना विनवण्या.
'...तर यांचं जीनं मुश्किल करेन', जरांगेंचा धनंजय देशमुखांना थेट फोन
'...तर यांचं जीनं मुश्किल करेन', जरांगेंचा धनंजय देशमुखांना थेट फोन.
संतोष देशमुखांना हत्येच्या महिनाभर आधी धमकी, पत्नीच्या जबाबानंतर खळबळ
संतोष देशमुखांना हत्येच्या महिनाभर आधी धमकी, पत्नीच्या जबाबानंतर खळबळ.
मस्साजोगच्या ग्रामस्थांचं शोले स्टाईलनं आंदोलन; काय आहेत मागण्या?
मस्साजोगच्या ग्रामस्थांचं शोले स्टाईलनं आंदोलन; काय आहेत मागण्या?.
मुख्यमंत्री-ठाकरे गटाच्या भेटीगाठी वाढल्या; भाजप दक्ष, ठाकरेंवर लक्ष?
मुख्यमंत्री-ठाकरे गटाच्या भेटीगाठी वाढल्या; भाजप दक्ष, ठाकरेंवर लक्ष?.
'मुंडेचा एक क्ल्यू अन् कराडनं पोतं भरून शेतकऱ्यांचे पैसे घेतले'
'मुंडेचा एक क्ल्यू अन् कराडनं पोतं भरून शेतकऱ्यांचे पैसे घेतले'.