Sada Sarvankar : शिवसेनेतून काढण्याआधीच पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, सदा सरवणकरांनी दिला विभागप्रमुखपदाचा राजीनामा

Sada Sarvankar : शिवसेनेने आजही काही जणांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. पालघर जिल्हा संपर्कप्रमुख रवींद्र फाटक आणि पालघर जिल्हाप्रमुख राजेश शहा यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

Sada Sarvankar : शिवसेनेतून काढण्याआधीच पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, सदा सरवणकरांनी दिला विभागप्रमुखपदाचा राजीनामा
आ. सदा सरवणकरImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 12, 2022 | 12:18 PM

मुंबई: एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी बंड केल्यामुळे शिवसेनेत मोठी फूट पडली आहे. त्यामुळे शिवसेनेत (shivsena) एकच खळबळ उडाली आहे. शिंदे समर्थक शिवसेना पदाधिकारी शक्तीप्रदर्शनही सुरू केलं आहे. त्यामुळे शिवसेनेची डोकेदुखी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईपासून ठाण्यापर्यंत ते थेट यवतमाळ पर्यंतच्या पदाधिकाऱ्यांवर शिवसेनेने कारवाई सुरू केली आहे. पक्ष शिस्तीचा भंग केल्याच्या आरोपावरून या पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. मात्र, शिवसेनेचे बंडखोर आमदार सदा सरवणकर (sada sarvankar) यांनी त्यांच्यावर कारवाई होण्यापूर्वीच स्वत: हून शिवसेनेच्या विभागप्रमुखपदाचा राजीनामा दिला आहे. एवढेत नव्हे तर त्यांच्यासोबतच्या नऊ पदाधिकाऱ्यांनीही पदांचे राजीनामे दिले आहेत. त्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सदा सरवणकर यांनी पदाचा राजीनामा दिल्याने शिवसेनेची चांगलीच कोंडी झाली आहे.

सदा सरवणकर हे शिवसेनेचे आमदार आहेत. तसेच शिवसेनेचे विभागप्रमुख आहेत. दादर, प्रभादेवी, माटुंगा आणि माहीम परिसरात सरवणकर यांचं वर्चस्व आहे. हा भाग शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याचं मानलं जात आहे. मात्र, सरवणकर यांनी बंड करून एकनाथ शिंदे गटात सामिल झाले. त्यानंतर शिंदे गटाचं राज्यात सरकार आलं. त्यामुळे शिवसेनेने पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी सुरू केली होती. रोज दोन चार पदाधिकाऱ्यांची शिवसेनेकडून हकालपट्टी सुरू असतानाच सदा सरवणकर यांनी विभागप्रमुख पदाचा राजीनामा देऊन खळबळ उडवून दिली आहे.

हे सुद्धा वाचा

शाखाप्रमुखांचाही राजीनामा

सदा सरवणकर यांच्यासोबत तीन शाखाप्रमुख, शाखा समन्वयक, उफविभाग समन्वयक, दोन महिला शाखा संघटक आणि एका महिला उपविभाग समन्वयकाने पदाचा राजीनामा दिला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे हे राजीनामे पाठवण्यात आले आहेत.

यांचे राजीनामे

सदा सरवणकर – विभागप्रमुख मिलिंद तांडेल – शाखाप्रमुख संदीप देवळेकर – शाखाप्रमुख संतोष तेलवणे – शाखाप्रमुख अजय कुसूम – शाखा समन्वयक कुणाल वाडेकर – उपविभाग समन्वयक अरुंधती चारी – महिला शाखासंघटक मंदा भाटकर – शाखा संघटक शर्मिला नाईक – महिला उपविभाग समन्वयक

तांडे आणि वैद्य वाद

दरम्यान, आज माहिमध्ये सदा सरवणकर समर्थक मिलिंद तांडेल आणि शिवसेनेचे नेते मिलिंद वैद्य यांच्यात वाद झाला. पोस्टर लावण्याच्या कारणावरून या दोघांमध्ये वाद झाला. मात्र, नंतर हा वाद मिटल्याचं सूत्रांनी सांगितलं.

समझौता घडवून आणणाऱ्याची हकालपट्टी

शिवसेनेने आजही काही जणांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. पालघर जिल्हा संपर्कप्रमुख रवींद्र फाटक आणि पालघर जिल्हाप्रमुख राजेश शहा यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर त्यांची समजूत काढण्यासाठी मिलिंद नार्वेकर सुरतला गेले होते. त्यांच्यासोबत रवींद्र फाटकही होते. आज फाटक यांचीच शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.