मी सुद्धा भाजपाचा राजीनामा देतेय, रोहिणी खडसेंचाही एल्गार
एकनाथ खडसे यांच्यासोबत त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यादेखील राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत (Rohini Khadse on Eknath Khadse NCP join).
जळगाव : “मला विधानसभा निवडणुकीत तिकीट दिल्यानंतरदेखील निवडणूकीत पराभूत करण्यासाठी प्रयत्न केला गेला. याची तक्रार पुराव्यासह करुनदेखील भाजप पक्षश्रेष्ठींनी कोणतीही दखल घेतली नव्हती. मी देखील सक्रिय राजकारणात असून आता भाजपचा राजीनामा देऊन राष्ट्रवादीचे काम करणार आहे”, अशी प्रतिक्रिया भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या आणि जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’सोबत बोलताना दिली (Rohini Khadse on Eknath Khadse NCP join).
“ज्या व्यक्तीने 40 वर्ष पक्षनिष्ठेने काम केलं त्यांना हा निर्णय घेताना दुःख होणं स्वाभाविक आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत नाथाभाऊंनी उत्तर महाराष्ट्रात पक्ष उभा केला”, अशी भावना रोहिणी खडसे यांनी व्यक्त केली (Rohini Khadse on Eknath Khadse NCP join).
ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा अधिकृत राजीनामा दिला आहे. याबाबत त्यांनी स्वत: पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. त्यांच्यासोबत भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. मात्र, त्यांच्या सूनबाई खासदार रक्षा खडसे यांनी राजीनामा दिलेला नाही. तर एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे या देखील राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.
खडसेंच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांचे राजीनामे
दरम्यान, खडसेंच्या समर्थनार्थ मुक्ताईनगरमध्ये कार्यकर्त्यांचे सामूहिक राजीनामे देण्याची मालिका सुरु झाली आहे. तसेच खडसेंच्या या निर्णयानंतर मुक्ताईनगरमध्ये दिवाळीपूर्वी फटाक्यांची आताषबाजी करण्यात आली.
जळगाव ग्रामीण जिल्हा अध्यक्ष शिवराज सिंग पाटील यांनी भाजपचा राजीनामा दिला आहे. माझ्याकडे जळगाव ग्रामीण जिल्हा अध्यक्षपद आहे. मी भाजपचा 2000 पासूनचा सक्रीय कार्यकर्ता आहे. आमचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर भाजपने वेळोवेळी केलेल्या अन्यायाला कंटाळून मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे, असे शिवराज पाटील यांनी सांगितले.
संबंधित बातम्या
Eknath Khadse | काही मिळालं, नाही मिळालं याचं दु:ख नाही, फडणवीसांनी छळले : एकनाथ खडसे
EXCLUSIVE | एकनाथ खडसेंचं ठरलं, शुक्रवारी दुपारी 2 वाजता राष्ट्रवादीत प्रवेश!