Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rohit Patil | ‘निकालानंतर माझा बाप आठवल्याशिवाय राहणार नाही’ असं रोहित पाटील म्हणाले होते, झालंही तसंच!

Rohit Pawar First Reaction on Election win : या निकालानंतर त्यांनी पहिली प्रतिक्रिया देताना आपल्या वडिलांचं एकहाती सत्ता मिळवण्याचं स्वप्न पूर्ण करु शकलो आणि आज मी माझ्या वडिलांना खरंच मीस करतोय, असं म्हटलंय.

Rohit Patil | 'निकालानंतर माझा बाप आठवल्याशिवाय राहणार नाही' असं रोहित पाटील म्हणाले होते, झालंही तसंच!
आर आर आबांचे पुत्र रोहित पाटील
Follow us
| Updated on: Jan 19, 2022 | 6:23 PM

कवठेमहाकांळ : राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर आर पाटील (RR Patil) यांचे सुपुत्र रोहित पाटील(Rohit Patil) यांनी कवळेमहाकांळ निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानंतर प्रचारादरम्यान विरोधकांना उत्तर देताना केलेलं विधान तंतोतंत खरं ठरलंय. विरोधकांनी टीका करताना रोहित पाटील यांच्यावर निशाणा साधताना ‘त्याला बाप आठवेल’ असा टोला लगावला होता. दरम्यान, या विरोधकांच्या वक्तव्यांना उत्तर देताना विरोधकांना निकालानंतर माझा बाप आठवल्याशिवाय राहणार नाही, असं विधान केलं होतं. निवडणूक निकालानंतर अगदी तसंच झालंय. रोहित पाटील यांनी कवठेमहाकांळ नगरपंचायीतवर विजयी झेंडा फडकवला आहेच. या निकालानंतर त्यांनी पहिली प्रतिक्रिया देताना आपल्या वडिलांचं एकहाती सत्ता मिळवण्याचं स्वप्न पूर्ण करु शकलो आणि आज मी माझ्या वडिलांना खरंच मीस करतोय, असं म्हटलंय. आज मला निश्चितच आबांची आठवण येतेय, असंही ते म्हणाले आहेत. दरम्यान, या विजयचा सगळ्यात जास्त आनंद आबांशिवाय दुसऱ्या कुणालाच झाला नसता, असं त्यांनी पहिली प्रतिक्रिया देताना म्हटलंय. कवठेमहाकांळ नगरपंचायतीत रंगतदार लढत पाहायला मिळाली होती. या निवडणुकीत रोहित पाटील यांनी नेतृत्त्व करत नगरपंचायतीवर विजय मिळला आहे.

पहिलं काम कोणतं करणार?

कवठेमहांकाळमध्ये पाणी प्रश्नवर सगळ्यात आधी काम करणार असल्याची प्रतिक्रिया रोहित पाटील यांनी दिली आहे. कवठेमहाकाळमधील पाणी प्रश्न अजूनही काही ठिकाणी कायम आहे. त्याच प्रश्नावर सुरुवातील सोडवण्यासाठी आम्ही आधीच काम करायला सुरुवात केली होती. आताही तेच काम सगळ्यात आधी तेच काम पूर्ण करण्यासाठी झटणार आहोत, असंही ते म्हणालेत. आपला विजय हा लोकांमुळेच शक्य झाला असून या विजयाचं श्रेयदेखील रोहित पाटील यांनी त्यांनाच दिलंय.

या निवडणुकीत काही प्रसंग असे होते, की आम्हाला अनेकदा प्रचार करु दिला नव्हता. संघर्ष पेटला होता. लोकांनी ही निवडणूक हातात घेतली होती. या निवडणुकीत झालेला विजय हा कवठेमहाकाळमधील लोकांचा विजय आहे, असं रोहित पाटील यांनी म्हटलंय. लोकांच्या प्रश्नांवरच आम्ही लढलो. सातत्यानं आम्ही लोकांमध्येच राहिलो होतो. लोकांच्या प्रश्नांचं आम्ही निरसन करत गेलो, त्यामुळे लोकं आमच्या पाठीशी उभी राहिली. कवळेमहाकाळ शहरात निवडणूक लढवत असताना आपलं शहर कसं असलं पाहिजे आणि आजपासून पुढच्या वीस-तीस वर्षात शहर कसं डेव्हलप झालं पाहिजे, याचं व्हिजन आम्ही ठेवलंय. त्यानुसार आम्ही काम करणार आहोत, असा विश्वास त्यांनी निवडणुकीत मिळवलेल्या विजयानंतर व्यक्त केलाय.

वाचा निकालाचे लाईव्ह अपडेट्स – Nagar Panchayat Election Results 2022 LIVE : मोताळा नगरपंचायतीवर काँग्रेसची सत्ता, काँग्रेसचा 12 जागांवर विजय, शिवसेनेला तीन जागा

इतर राजकीय बातम्या :

Uttar Pradesh Election: मुलायमसिंह यादवांच्या घरातच फूट; सून अपर्णा यादव भाजपात; निवडणुकीच्या धामधुमीत समाजवादी पार्टीची कोंडी

Nagar Panchayat Election result 2022: कर्जत नगर पंचायतीत राष्ट्रवादीची एकहाती सत्ता; रोहित पवारांचा राम शिंदेंना कात्रजचा घाट

कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा.
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं.
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली.
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल.
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना.
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया.