AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RSS प्रमुखांचं पुन्हा वक्तव्य-भारत विविधतेला स्वीकारतो, 35 देशांच्या 10 लाख तरुणांना संबोधन

भारतीय स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे(RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज 35 देशातल्या जवळपास 10 लाख तरुण-तरुणींना ऑनलाईन संबोधीत केलं. याच कार्यक्रमाला अनेक शहरातून 40 विद्यार्थी नेते, काही मार्गदर्शक, अजय पीरामल, जनरल व्ही.पी. मलिक, पी.टी. उषा यांनीही सहभाग नोंदवला. जगभरात धार्मिक मुद्यांच्या आधारावर फुट पाडण्याचा प्रयत्न केला जातोय. त्याच पार्श्वभूमीवर मोहन भागवत यांनी भारत […]

RSS प्रमुखांचं पुन्हा वक्तव्य-भारत विविधतेला स्वीकारतो, 35 देशांच्या 10 लाख तरुणांना संबोधन
मोहन भागवत यांनी 10 लाख तरुणांना संबोधित केलं
| Edited By: | Updated on: Aug 15, 2021 | 10:26 PM
Share

भारतीय स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे(RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज 35 देशातल्या जवळपास 10 लाख तरुण-तरुणींना ऑनलाईन संबोधीत केलं. याच कार्यक्रमाला अनेक शहरातून 40 विद्यार्थी नेते, काही मार्गदर्शक, अजय पीरामल, जनरल व्ही.पी. मलिक, पी.टी. उषा यांनीही सहभाग नोंदवला.

जगभरात धार्मिक मुद्यांच्या आधारावर फुट पाडण्याचा प्रयत्न केला जातोय. त्याच पार्श्वभूमीवर मोहन भागवत यांनी भारत हा विविधतेला स्वीकारणारा देश असल्याचं वक्तव्य केलंय. ते असं म्हणाले की, भारताला एक व्हायचंय. कारण जग हे एकच आहे. जगात एक होण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. एक प्रकार असाही आहे की, जे फिट आहे त्याला ठेवायचं आणि जे अनफिट आहे त्याला काढून टाकायचं. पण तो आपला मार्ग नाही. याला युनाईट होणं म्हणत नाहीत. भारत हा सर्व प्रकारच्या विविधतांना स्वीकारतो आणि एखाद्या गोष्टीत फरक असेल तर तो न मिटवता एकत्र चालत रहातो.

नियंत्रीत उपभोक्तावाद आवश्यक मोहन भागवत यांच्या हस्ते मुंबईतल्या एक शाळेत ध्वजारोहण करण्यात आलं. त्यानंतर बोलताना ते म्हणाले, उत्पादनांच्या विकेंद्रीकरणातून भारतीय अर्थव्यवस्थेत रोजगार निर्मिती होईल. त्याला फायदा सर्वांना होईल. नैसर्गिक साधनसंपत्तीचा अती वापर होणार नाही याचीही काळजी घेणं गरजेचं आहे. त्यासाठी सरसंघचालकांनी नियंत्रीत उपभोक्तावाद आवश्यक असल्याचं सांगितलं.

तरच आपण आनंदी राहू आरएसएस प्रमुखांनी सांगितलं की, जीवनाचं मुल्यांकन हे आपण किती कमावतो यावरुन होऊ नये तर आपण परत किती देतो यावरुन व्हावं. आपण त्याच वेळेस आनंदी होऊ ज्यावेळेस आपण इतरांच्या कल्याणाचा विचार करु. अर्थातच आनंदी राहण्यासाठी आपल्याला आर्थिक स्थिती चांगली असणं गरजेचं आहे. त्यासाठी आर्थिक व्यवस्थाही तेवढीच मजबूत असावी लागते.

मोहन भागवत म्हणाले की, स्वदेशीचा अर्थ स्वत:च्या शर्थीवर व्यवहार, व्यापार करणं. ते पुढं असंही म्हणाले की, सरकारचं हे काम आहे की उद्योगांना मदत करणं. देशाला ज्या गोष्टींची गरज आहे त्याचं उत्पादन करण्याचा निर्देश देणंही सरकारचं काम आहे. संशोधनाच्या केंद्रस्थानी सुक्ष्म, लघू आणि मध्यम व्यवसाय(MSME)तसच सहकार क्षेत्र असायला हवं.

(rss-chiefs-statement-again-india-embraces-diversity-addressing-10-lakh-youth-from-35-countries)

Mahatma Gandhi : भारतीय स्वातंत्र्याच्या उत्सवात महात्मा गांधी उपस्थित का नव्हते?

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.