पंकजाताई स्वार्थी राजकारणासाठी मराठ्यांच्या भावनेशी…, पंकजा मुंडे यांच्यावर पहिल्यांदाच टीका; कुणी केली पोलखोल?

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात चांगलीच जुंपली आहे. त्यात आता सकल मराठा समाजाने उडी घेतली आहे.

पंकजाताई स्वार्थी राजकारणासाठी मराठ्यांच्या भावनेशी..., पंकजा मुंडे यांच्यावर पहिल्यांदाच टीका; कुणी केली पोलखोल?
pankaja mundeImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 01, 2023 | 6:45 AM

सोलापूर : जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत फेटा बांधणार नाही, असा निर्धार भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केला आहे. त्यावर भाजपचेच नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पंकजा मुंडे यांना कानपिचक्या दिल्या आहेत. मराठा समाजाला आरक्षण हवंच आहे, पण त्याचा भावनिक मुद्दा करू नका, असा सल्ला राधाकृष्ण विखे यांनी पंकजा यांना दिला आहे. विखे-पाटील यांच्या नंतर सकल मराठा समाजाने तर थेट पंकजा मुंडे यांच्यावरच टीका केली आहे. पंकजाताई तुमच्या स्वार्थी राजकारणासाठी मराठा समाजाच्या भावनेशी खेळू नका, असा सल्ला देत सकल मराठा समाजाने पंकजा मुंडे यांच्यावर टीका केली आहे. मराठा समाजाकडून पहिल्यांदाच पंकजा मुंडे यांच्यावर थेट टीका होत आहे.

सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांनी पंकजा मुंडे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. तसेच पंकजा मुंडे यांना एक खुलं आव्हानच दिलं आहे. पंकजा ताई स्वतःच्या स्वार्थी राजकारणासाठी मराठा समाजाच्या भावनेशी खेळ खेळू नका. तुमचं मराठा समाजाबद्दल खरं प्रेम असेल तर 50% ओबीसी कोट्यातून आरक्षणाची मागणी करा, असं खुलं आव्हानच माऊली पवार यांनी पंकजा मुंडे यांना दिलं आहे. त्यावर पंकजा मुंडे काय भाष्य करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

हे सुद्धा वाचा

मोर्चातही सामील झाला नाही

यावेळी माऊली पवार यांनी पंकजा मुंडे यांच्या मराठ्यांवरील बेगडी प्रेमाची पोलखोलच केली. 2018 साली मराठा समाजाच्या आरक्षण समितीत आपण होतात. आरक्षण देणार म्हटल्यावर आपण बैठकीतून उठून गेलात. लाखोंनी मराठा समाज रस्त्यावर उतरल्यावर पाठिंब्याचं एक पत्रही तुम्ही काढले नाही किंवा बीडच्या क्रांती मोर्चात सहभागी झाला नव्हता. आता स्वतःच्या स्वार्थी राजकारणासाठी फेटा बांधणार नाही असे सांगताय. मराठा समाजावर असा कोरडा प्रेम करू नका, अशी टीका पवार यांनी केली.

तर प्राणाची आहुती देऊ

जर मराठा समाजाला आरक्षण मिळावे असे वाटत असेल तर 50% ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षणाची मागणी करा. तसे केल्यास सकल मराठा समाज आपल्या राजकीय भवितव्यासाठी प्राणाची आहुती देईल. मात्र स्वतःच्या स्वार्थी राजकारणासाठी मराठा समाजाच्या भावनेशी खेळ खेळू नका, असं कळकळीचं आवाहनही त्यांनी केलं आहे.

प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.