Sambhaji Brigade | झंडुबाम घेऊन ठेवा, शिवसेना-संभाजी ब्रिगेड युती तुमची झोप उडवल्याशिवाय राहणार नाही, भाजपाला कुणी दिला इशारा?

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावन्नकुळे यांनी ही युती काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला मान्य आहे का? असा प्रश्न विचारत एक ट्विट केले.

Sambhaji Brigade | झंडुबाम घेऊन ठेवा, शिवसेना-संभाजी ब्रिगेड युती तुमची झोप उडवल्याशिवाय राहणार नाही, भाजपाला कुणी दिला इशारा?
भाजपवर संतोष शिंदे यांची टीका Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Aug 27, 2022 | 11:47 AM

मुंबईः शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडच्या (Sambhaji Brigade) युतीमुळे भाजपची झोप उडाल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी दिलाय. हिंदुत्वासाठी (Hindutwa) झगडणारी शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडची युती झाल्यामुळे सर्वत्र खिल्ली उडवली जातेय. विशेषतः भाजपने शिवसेनेवर खोचक टीका केली आहे. यावरून आता संभाजी ब्रिगेडने खास करून चंद्रशेखर बावन्नकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडची युती झाल्यामुळे चंद्रशेखर बावन्नकुळे यांना पोटशुळ उठलाय, अशी खोचक टीकाही शिंदे यांनी केलीय. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी एक पत्रकार परिषद घेऊन प्रादेशिक पक्षांची अस्मिता टिकवून ठेवण्यासाठी संभाजी ब्रिगेड पक्षाशी युती करत असल्याची घोषणा केली. तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही दोन्ही पक्ष एकत्रित लढणार, अशी भूमिका जाहीर केली.

काय म्हणाले संतोष शिंदे?

शिवसेनेशी संभाजी ब्रिगेडने केलेल्या युतीवर भाजप आणि मनसेकडून टीका केली जातेय. संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे म्हणाले, शिवसेना आणि आमच्या पक्षाची युती झाल्यामुळे भाजपची झोप उडाली आहे. चंद्रशेखर बावन्नकुळेंना यामुळे का पोटशुळ उठलाय? संभाजी ब्रिगेडची एवढी भीती वाटते का? एक लक्षात ठेवा, आताच झंडू बाम घेून ठेवा, कारण तुमची अजून झोप उडाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, असा इशारा शिंदे यांनी केलाय.

चंद्रशेखर बावनकुळेंची टीका काय?

संभाजी ब्रिगेडसोबत शिवसेनेने युतीची घोषणा केल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावन्नकुळे यांनी खोचक सवाल केला. ही युती काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला मान्य आहे का? असा प्रश्न विचारत त्यांनी एक ट्विट केले. माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी संभाजी ब्रिगेडसोबत युती करताना नक्कीच शरद पवार आणि सोनिया गांधी यांना विश्वासात घेतलं असणार, कारण या दोघांना विचारल्याशिवाय उद्धवजी काहीच करीत नाहीत, अशी थेट टीकाही त्यांनी केली.

गिरीश महाजन काय म्हणाले?

भाजप नेते गिरीश महाजन यांनीही शिवसेनेवर बोचरी टीका केली. शिवसेनेने गेल्या काही वर्षात सगळ्याच पक्षांशी युती केली, आता फक्त एमआयएमशी युती करणं बाकी आहे, असं वक्तव्य त्यांनी केलंय.. एकूणच ज्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेनेचा जन्म झाला, शिवसेना फोफावली, त्या भूमिकेपासून दूर असलेल्या संभाजी ब्रिगेडशी युती केल्यामुळे अनेकांच्या आश्चर्यकारक प्रतिक्रिया येत आहेत. मात्र शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडकरून वरचेवर स्पष्टीकरणंही दिली जात आहेत.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.