AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अभिनेत्री क्रांती रेडकर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंच्या भेटीला, रामदास आठवलेंकडून पाठिंबा जाहीर

समीर वानखेडे यांच्या पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकर ठामपणे आपल्या पतीच्या पाठीशी उभ्या असल्याचं पाहायला मिळत आहे. क्रांती रेडकर आणि त्यांचे सासरे ज्ञानदेव वानखेडे हे आज केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या भेटीसाठी बांद्र्यातील निवासस्थानी दाखल झाले आहेत.

अभिनेत्री क्रांती रेडकर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंच्या भेटीला, रामदास आठवलेंकडून पाठिंबा जाहीर
क्रांती रेडकर, ज्ञानदेव वानखेडे रामदास आठवलेंच्या भेटीला
| Edited By: | Updated on: Oct 31, 2021 | 12:08 PM
Share

मुंबई : मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरणात कारवाई करणारे एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी आरोपांची मालिका सुरुच ठेवली आहे. समीर वानखेडे हे जन्माने मुस्लिमच आहेत. बनावट कागदपत्रांद्वारे त्यांनी नोकरी मिळवल्याचा गंभीर आरोप मलिक यांनी केलाय. त्याचबरोबर वानखेडे यांच्यावर खंडणी, लाचखोरीचेही आरोप करण्यात आले आहेत. अशावेळी समीर वानखेडे यांच्या पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकर ठामपणे आपल्या पतीच्या पाठीशी उभ्या असल्याचं पाहायला मिळत आहे. क्रांती रेडकर आणि त्यांचे सासरे ज्ञानदेव वानखेडे हे आज केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या भेटीसाठी बांद्र्यातील निवासस्थानी दाखल झाले आहेत. (Kranti Redkar and Dnyandev Wankhede meet Union Minister Ramdas Athavale)

त्यांची साथ आम्हाला हवी आहे. आम्ही आज त्यांना भेटण्यासाठी आलो आहोत. आमच्या अडचणी त्यांना सांगू. त्यांनी यापूर्वीही आम्हाला जाहीर पाठिंबा दर्शवला आहे. त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असावा अशी अपेक्षा आहे, असं क्रांती रेडकर म्हणाले. त्यावेळी नवाब मलिक यांनी रात्री यास्मिन वानखेडे यांच्याबद्दल ट्विट केलं आहे, त्याबाबत काय म्हणणं आहे? असा सवाल पत्रकारांनी केला. त्यावर बोलताना आम्हाला त्यांच्यासाठी वेळ नाही, असं उत्तर क्रांती रेडकरने दिलं.

रामदास आठवले काय भूमिका घेणार?

दरम्यान, क्रांती रेडकर यांच्यासह ज्ञानदेव वानखेडे आणि यास्मिन वानखेडे हे रामदास आठवले यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. समीर वानखेडे यांच्यावरील आरोप आणि त्यांच्या धर्मावरुन सुरु असलेलं राजकारण, या मुद्द्यांवर आठवले आणि वानखेडे कुटुंबियांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. या चर्चेनंतर आठवले काय भूमिका घेतात, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

समीर वानखेडे जन्माने मुस्लिमच – मलिक

राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर पुन्हा एकदा तोफ डागली आहे. समीर वानखेडे हे जन्माने मुस्लिम आहेत. त्यांचं संपूर्ण कुटुंबच मुस्लिम आहे. त्यांचे नातेवाईकही मुस्लिमच आहे, असं सांगतानाच बोगस दाखल्यावरूनच वानखेडे यांनी नोकरी मिळवली असल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला आहे.

नवाब मलिक यांनी मीडियाशी बोलताना हा दावा केला. समीर वानखेडेंचा मेव्हणा आहे. तो आता व्हेनिसला राहतो. तो त्यांचा नातेवाईक आहे. तो मुस्लिम आहे. काल राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदर यांनी मीडियाशी संवाद साधताना एक विधान केलं. वानखेडेंनी धर्मांतर केलं नाही असं ते म्हणाले. मी पुन्हा सांगतो वानखेडे जन्माने मुस्लिम आहेत. त्यांचे कुटुंब मुस्लिम होते, असं मलिक म्हणाले.

नावं बदलली, घटस्फोटही घेतला

वानखेडेंनी बोगस दाखल्यावर नोकरी मिळवली आहे. वानखेडे कुटुंबाने 2015पासून आपली ओळख लपवली. फेसबूकवर दाऊद वानखेडे असं नाव होतं. त्यांनी ते बदलून डिके वानखेडे लिहिलं. नंतर ज्ञानदेव लिहिलं. मुस्लिम लोकांसमोर विषय गेला तर नोकरी धोक्यात येईल म्हणून नाव बदललं. यास्मिनचं जास्मीन केलं. दाऊदचा ज्ञानदेव झाला. जावई, सून सोबत राहिले तर अडचणीचं होऊ शकतं म्हणून त्यांनी घटस्फोट घेतला. मेव्हण्यालाही घटस्फोट दिला, असं त्यांनी सांगितलं.

इतर बातम्या :

Photo : इंधन दरवाढीविरोधात युवासेनेचा एल्गार; पुणे, डोंबविली, सोलापूरसह राज्यभरात सायकल रॅली

सोमय्यांची धमकी पोकळ, मीच अधिवेशनात पोलखोल करणार, भाजप नेते तोंड लपवून पळतील; नवाब मलिकांचा हल्लाबोल सुरूच

Kranti Redkar and Dnyandev Wankhede meet Union Minister Ramdas Athavale

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.