Sandeep Deshpande : तुरुंगातून लेख लिहायला राऊत स्वातंत्र्य सैनिक आहेत काय?; संदीप देशापांडेंचा सवाल

Sandeep Deshpande : संजय राऊत यांना अटक केलीये.अटक आरोपीला लेख लिहिण्याची परवानगी कशी? तुम्ही लोकमान्य टिळक, सावरकर आहात का? की तुम्हाला लेख लिहीण्याची परवानगी दिलीये. तुम्ही काही स्वातंत्र्य सैनिक नाही. तुमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत.

Sandeep Deshpande : तुरुंगातून लेख लिहायला राऊत स्वातंत्र्य सैनिक आहेत काय?; संदीप देशापांडेंचा सवाल
तुरुंगातून लेख लिहायला राऊत स्वातंत्र्य सैनिक आहेत काय?; संदीप देशापांडेंचा सवालImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 07, 2022 | 10:33 AM

मुंबई: एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन एक महिना लोटला तरी राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. त्यामुळे सत्ताधाऱ्यांवर विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे. आमदार रविकांत तुपकर यांनीही आता मंत्रिमंडळ विस्तारासाठी मोर्चे काढायचे का? असा इशारा राज्यातील सत्ताधाऱ्यांना दिला आहे. 36 दिवस उलटूनही मंत्रिमंडळ विस्तार का होत नाही? असा सवालही त्यांनी केला आहे. आता मनसेनेही राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर तोफ डागली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ विस्ताराचा लवकरात लवकर निर्णय घ्यावा. लोकांची सहनशक्ती संपत चालली आहे, असा इशारा मनसेचे नेते संदीप देशपांडे (sandeep deshpande) यांनी दिला आहे. तुरुंगातून लेख लिहायला संजय राऊत (sanjay raut) हे काय स्वातंत्र्य सैनिक आहेत काय? असा सवालही देशपांडे यांनी केला.

संदीप देशपांडे यांनी मीडियाशी संवाद साधताना हा हल्लाबोल केला. आज सामना मध्ये संजय राऊत यांच ‘रोखठोक’ हे सदर आले आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक झालेले राऊत हे काही स्वातंत्र सेनानी नाहीत की त्यांना जेलमधून लेखनाची परवानगी मिळावी की त्यांच्या नावावर दुसरंच कोणी लिहीत आहेत?, असा सवाल संदीप देशपांडे यांनी केला आहे.

हे सुद्धा वाचा

जेलमध्ये बसून पब्लिसिटीचा स्टंट

संजय राऊत यांना अटक केलीये.अटक आरोपीला लेख लिहिण्याची परवानगी कशी? तुम्ही लोकमान्य टिळक, सावरकर आहात का? की तुम्हाला लेख लिहीण्याची परवानगी दिलीये. तुम्ही काही स्वातंत्र्य सैनिक नाही. तुमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. नसेल तर हे लेख कुणी लिहिले? जेलमध्ये बसून पब्लिसीटी घेण्याचा हा प्रकार आहे का?, असा सवाल त्यांनी केला. गैर काय म्हणजे? जेलमधून त्यांना लेख लिहीण्याची ईडीने परवानगी दिलीये का? ईडीने स्पष्ट करावं, अशी मागणीही त्यांनी केली.

जनता लटकली आहे

राज्यात मंत्रिमंडळाची स्थापना झालेली नाही. लोकांमध्ये संताप निर्माण झाला आहे. उदय सामंत यांनी सांगितलं की सीईटी आणि इयत्ता बारावीचे मार्क वैद्यकीय प्रवेशासाठी गृहित धरले जातील. सामंत यांनी हे सांगितलं. पण हा प्रश्न अजून प्रलंबित आहे. त्यामुळे सरकारने त्यावरही निर्णय घ्यावा. राज्यात मंत्रीच नसल्याने जनता लटकली आहे, असा सवाल संदीप देशपांडे यांनी केला आहे.

एकमेकांची डोकी फोडा

मंत्रिमंडळ अस्तित्वात नसल्याने जनतेचा संयम संपत आहे. त्याच्याशी शिवसेना आणि शिंदे गटाचा काय संबंध? लोकांना त्याच्याशी काय घेणंदेणं नाही. समस्या कोण सोडवणार आहे? शिंदे गटाने आणि शिवसेनेने एकमेकांची डोकी फोडावीत, हातपाय तोडावेत त्याच्याशी जनतेला काहीच घेणंदेणं नाही. लवकरच मंत्री मंडळ येणं गरजेचं. लोकांचा अंत पाहू नका, असा इशाराही त्यांनी दिला.

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.